অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला पिकांच्यामध्ये सापळा पिके

भाजीपाला पिकांच्यामध्ये सापळा पिके

किड नियंत्रण

  1. कोबीवर्गीय पिकांमध्ये- उदा. कोबी, फ्लॉवर आदी पिकांमध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग म्हणजे डायमंड बॅक मॉथ (प्लुटेला झायलोस्टेला) या पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव सुरवातीच्या काळापासून कमी करता येऊ शकतो. अशा कोबीवर्गीय पिकामध्ये पुनर्लागवड करण्यापूर्वी मोहरी 15 ते 20 दिवस अगोदर आधी पेरावी. मोहरी पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव कीटकनाशकांच्या फवारणीने सहज नियंत्रित करता येतो.
  2. टोमॅटो पिकात फळ पोखरणाऱ्या अळीचा (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वर्षभर आढळतो. या अळीच्या नियंत्रणासाठी पिकाभोवती मक्‍याच्या ओळी लावल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. टोमॅटो पिकात झेंडूच्या ओळी लावल्यासही या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. फुलांच्या गर्द रंगाकडे आकर्षून मादी झेंडूच्या झाडांवर अंडी घालते. याशिवाय सूत्रकृमींच्या वाढीसदेखील आळा बसतो.
  3. वांगी पिकातही झेंडू लागवडीचा फायदा घाटेअळीच्या; तसेच सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे होतो.
  4. कोणत्याही पिकाच्या भोवती चवळीचे पीक घेतल्यास त्या पिकाच्या माव्यापासून संरक्षण होते. चवळी हे अतिशय लुसलुशीत असे पीक असून, यावर मावा कीड फार लवकर आकर्षित होत असल्याने मावा खाणारे परभक्षी कीटक चांगल्या प्रकारे वाढतात.

सापळा पिकांची लागवड करण्यापूर्वी

  1. सापळा पिकाची लागवड जास्त दाट न करता व्यवस्थित अंतर ठेवून करावी.
  2. मुख्य पिकांच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर सापळा पिकांची लागवड करावी. या पिकांवर येणाऱ्या किडींचे नियंत्रण सहज झाले पाहिजे.
  3. सापळा पिकावरील अन्य किडी, रोग मुख्य पिकावर प्रस्थापित न होता लवकर नियंत्रणात आणाव्यात.

 

संपर्क - प्रा. तुषार उगले - 8275273668 
कीटकशास्त्र विभाग, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate