वाइन द्राक्ष पिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कार्यक्षम पद्धतींचा शोध घेण्यासाठी बास्क इन्स्टिट्यूट फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट (नेकर टेक्निलिया) यांनी तीन वर्षांच्या एका प्रकल्पाची आखणी केली आहे, त्यामुळे पिकातील फवारण्यांची संख्या कमी झाल्यास आर्थिकदृष्ट्या उपयुक्त राहणार असून, पर्यावरणावरील विपरीत परिणाम कमी होणार आहेत.
द्राक्ष पिकामध्ये करपा (मिल्ड्यू) आणि भुरी (ओडीयम) या दोन रोगांमुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होते. या रोगांच्या नियंत्रणासाठी सातत्याने आणि अधिक तीव्रतेने फवारण्या कराव्या लागतात. मात्र, त्याच वेळी पिकातील अवशेषांसंदर्भात काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे या सातत्याने केल्या जाणाऱ्या फवारण्यांमुळे आर्थिक आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. द्राक्ष शेतीतील फवारण्यांची संख्या कमी करण्यासाठी बास्क इन्स्टिट्यूट फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट (नेकर टेक्निलिया) यांनी तीन वर्षांच्या प्रकल्पाची आखणी केली आहे. प्रकल्पाचे नाव फिटोवीड असे आहे. विशेषतः वाइनच्या द्राक्ष पिकामध्ये पीक संरक्षणासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. बास्क येथील कृषी वातावरण विभागानुसार, या धोरणामध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामध्ये किमान बुरशीनाशकांचा वापर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील.
अनेक वेळा रोगांची लक्षणे बागेमध्ये दिसल्यानंतर रोगांचा प्रसार वेगाने होत असतो. तंत्रज्ञानाचा वापर करून करपा आणि भुरी या दोन्ही रोगांचे लवकर निदान करण्यासाठी प्रयत्न केले जातील. डोळ्यांना रोगांची लक्षणे दिसण्याआधीच बुरशीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी संशोधक प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे रोगांच्या नियंत्रणासाठी अधिक काटेकोरपणा आणणे शक्य होईल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...