सरळ जमिनीखाली पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाचा वापर अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केला आहे. या पद्धतीचे प्रयोग मका पिकामध्ये मोठ्या क्षेत्रावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे हवा व पाण्याच्या स्रोताचे प्रदूषण रोखण्यासोबतच पिकांसाठी पोल्ट्री खतातील पोषक घटक अधिक कार्यक्षमपणे उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे.
अनेक वेळा शेतकरी रासायनिक खतांना पर्याय म्हणून पोल्ट्री खताचा वापर करतात. त्यातून पिके आणि मातीसाठी योग्य ते पोषक घटक उपलब्ध होतात. मात्र, शेतामध्ये पोस्ट्री खताचा वापर केल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे शेतामध्ये काम करणे अवघड होते. त्यामुळे पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन प्रणालीचा वापर करण्यासाठी संशोधकांनी अधिक प्रमाणात पोल्ट्री खताची उपलब्धता असलेल्या डावियस प्रांताची निवड केली होती. केन्टूकी विद्यापीठातील मृदा व विस्तार संशोधक इडविन रिट्चे यांनी सांगितले, की जमिनीसाठी पोल्ट्री खत हे अत्यंत उपयोगी असे खत आहे. त्यातून पिकांना योग्य ती मूलद्रव्ये उपलब्ध होतात. मात्र, जमिनीवर पोल्ट्री खताच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते. त्यामुळे सरळ जमिनीमध्ये वाळलेले पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाचा वापर करण्यात आला.
सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाच्या निर्मितीसाठी संशोधक करामात सिस्टानी हे आपल्या विद्यार्थ्यांसोबत गेल्या १० ते १२ वर्षांपासून संशोधन करीत आहेत. त्या विषयी माहिती देताना सिस्टानी म्हणाले की, या आधी पोल्ट्री खताचा सरळ जमिनीखाली वापर करण्याचे प्रयोग गवते आणि कपाशी पिकासाठी करण्यात आला आहेत. या वेळी प्रथमच मका पिकासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन-
अंतिम सुधारित : 4/26/2020
ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वा...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि ...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...