रायझोबियम जीवाणू सहयोगी पद्धतीने पिकाच्या मुळावर नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. रायझोबियमच्या उपजातीचे वर्गीकरण हे त्या जीवाणूची विविध कडधान्याच्या मुळावर गाठी निर्माण करण्याच्या क्षमतेवरून केले आहे. रायझोबियम जीवाणूच्या ठराविक उपजाती ठराविक पिअकांच्या मुळावर गाठी निर्माण करू शकतात. अशा प्रकारे रायझोबियम जीवाणूचे ७ प्रकार पडतात.
अ.क्र. |
गट |
जीवाणू |
पिके |
१ |
चवळी |
रायझोबियम स्पेसीज |
चवळी, मुग, तूर, उडीद, वाल, मटकी, गवार, भुईमुग, कुलथी, |
२ |
हरभरा |
रायझोबियम लोटी |
हरभरा |
३ |
वाटाणा |
रायझोबियम लेग्यूमिनोसारम |
वाटाणा, मसूर |
४ |
घेवडा |
रायझोबियम फेजीओलाय |
सर्व प्रकारचे घेवडे |
५ |
सोयाबीन |
रायझोबियम जापोनिकम |
सोयाबीन |
६ |
अल्फाल्फा |
रायझोबियम मिलीलोटी |
मेथी, लसूणघास |
७ |
बरसीम |
रायझोबियम ट्रायफोली |
बरसीम घास |
पेरणीपूर्वी बियाण्यावर रायझोबियमची बीजप्रक्रिया करून पेरल्याने रोपाच्या मुळावर कार्यक्षम गुलाबी गाठी तयार होतात. त्यामध्ये रायझोबियम जीवाणूच्या मदतीने हवेतील मुक्त नत्राचे स्थिरीकरण होते. तो नत्र नंतर पिके आपल्या वाढीसाठी उपयोगात आणतात.
माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड
स्त्रोत : जीवाणू खते
अंतिम सुधारित : 6/26/2020
कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित ब...
मातीमध्ये जीवाणूंची मोठी जैवविविधता असून, त्यांची ...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
ऍझोटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळा...