सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त कल असतो, तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते.
प्रजननाची क्रिया ही जनावरांच्या इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून असते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो, त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.
उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्यतो सकाळ अथवा संध्याकाळी करावे. म्हशींना डुंबण्यास द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे, शक्य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.
आपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील. त्यासाठी मोठ्या जनावरांतील रोगनिहाय लसीकरण आणि लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
डॉ. सारीपुत लांडगे
लसीकरण शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळी करावे. लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येते. लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापरावी. शक्यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे. गाभण जनावरांत लसीकरण करू नये.
दूरध्वनी क्र. - 022-24132792, 24131180
(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे कार्यरत आहेत.)
संपर्क
1) दूरध्वनी क्र. - 02169-244227, 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
2) दूरध्वनी क्र. - 02385- 257448, 256630
पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर
3) दूरध्वनी क्र. - 0724- 2258643
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला
स्त्रोत: अग्रोवन,
२ एप्रिल २०१२
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...