पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानही कमी होते. याचा गाई व म्हशींची प्रकृती तसेच दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन गाई, म्हशी आणि गोठ्याची स्वच्छता, संतुलित आहार, जंतनिर्मूलन, प्रजनन व्यवस्थापन आणि स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यावे.
१) पावसाळ्यामध्ये गाई-म्हशींना अपचन, पोटफुगी व पातळ हगवण अशा समस्या उद्भवतात. म्हणून पावसाळ्यात सकस व संपूर्ण आहाराचे व्यवस्थापन करावे. गाई व म्हशींकरिता आहार तयार करताना त्यामध्ये प्रामुख्याने हिरवा चारा २० ते २५ किलो, वाळलेला चारा (कडबा कुट्टी/ सोयाबीन किंवा चण्याचा भुसा) ६ ते ८ किलो, खनिज मिश्रण ५० ते ६० ग्रॅम, जीवनसत्त्वे १०० ग्रॅम/ प्रति १०० किलो खाद्य एवढ्या प्रमाणात दिल्यास गाई-म्हशींना जीवनावश्यक खाद्य घटक योग्य प्रमाणात मिळतात, त्यामुळेच त्यांचे आरोग्य चांगले राहते.
२) दुधाळ गाई- म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी योग्य प्रमाणात खुराकाची गरज असते. अशा वेळी प्रति दोन लिटर दूध उत्पादनामागे एक किलो खुराक दिल्यास दुधाची प्रत व स्निग्धांश टक्केवारी, तसेच प्रमाण टिकून राहते.
-- डॉ. शीला बनकर, डॉ. विजय बसुनाथे
------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...