लाव पक्षी पालन हा कमी जागेत, कमी खर्चात रोजगारासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
लाव संवर्धनाचे फायदे
- कमीतकमी जागेची गरज
- कमी भांडवलाची गरज
- लाव पक्षी तुलनात्मकरीत्या बळकट असतात
- पांच आठवड्यांसारख्या लहानशा वयात विक्रीसाठी तयार
- जलद लैंगिक परिपक्वता – वयाच्या सहा किंवा सातव्या आठवड्यात अंडी देण्यास सुरूवात करतात
- अंडी घालण्याचा दर उच्च – वर्षाला 280 अंडी
- लावेचे मांस कमी चरबीयुक्त आणि चिकनपेक्षा जास्त चविष्ट असते. हे खाल्ल्याने मुलांचे शरीर आणि मेंदूचा विकास चांगला होतो.
- पोषणाच्या दृष्टीने, लावेची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा कोठेही कमी नाहीत. शिवाय, त्यांच्यात कमी कोलेस्ट्रॉल असते.
- लावेचे मांस आणि अंडी ही गरोदर व स्तनपान देणार्या स्त्रीसाठी पोषक आहार आहे.
पाळणे
ह्याचे दोन प्रकार आहेत
डीप लिटर पध्दत
- एक चौरस फूट जागेमध्ये 6 लाव पक्षी राहू शकतात.
- 2 आठवड्यांनतर, लावांना पिंजर्यात वाढवता येते. ह्यामुळे वजन चांगले वाढते कारण इथेतिथे निष्कारण हिंडण्यात त्यांची शक्ती खर्च होत नाही.
पिंजरा पध्दत
वय
|
पिंजरयाचा आकार
|
पक्ष्यांची संख्या
|
पहिले 2 आठवडे
|
3 x 2.5 x 1.5 फूट.
|
100
|
3- 6 आठवडे
|
4 x 2 .5 x 1.5 फूट.
|
50
|
- प्रत्येक युनिट सुमारे 6 फूट लांबीचे आणि 1 फूट रूंद असते, आणि 6 सबयुनिटसमध्ये विभाजित केलेले असते. जागा वाचविण्यासाठी, जास्तीतजास्त 6 पिंजरे एकमेकांवर रचून ठेवता येतात. एका रांगेत 4 ते 5 पिंजरे ठेवता येतात. पिंजर्यांचा तळ काढता येण्याजोगा व लाकडी असतो जेणे करून पक्ष्यांचे मलमूत्र स्वच्छ करता येते. लांब अरूंद हौद (ज्यांमध्ये आहार असतो) पिंजर्यांच्या समोर ठेवतात. पाण्याचे हौद पिंजर्यांच्या मागच्या बाजूला ठेवतात. व्यावसायिक पातळीवर अंडी देणार्या पक्ष्यांना दर पिंजरा 10-12 पक्षी याप्रमाणे वसाहतींमध्ये ठेवतात. ब्रीडिंगसाठी, नर लावांना 1 नरास 3 माद्या ह्याप्रमाणे पिंजर्यांमध्ये पाठवितात.
आहार व्यवस्थापन
आहारातील घटक
|
चिक मॅश
|
ग्रोअर मॅश
|
|
0-3 आठवडे
|
4-6 आठवडे
|
ज्वारी
|
27
|
31
|
सोरगम
|
15
|
14
|
तेलरहित तांदुळाचा भुसा
|
8
|
8
|
शेंगदाण्याची पेंड
|
17
|
17
|
सूर्यफुलाची पेंड
|
12.5
|
12.5
|
सोया आहार
|
8
|
-
|
मत्स्य आहार
|
10
|
10
|
खनिजांचे मिश्रण
|
2.5
|
2.5
|
शंखाची भुकटी
|
-
|
5
|
- आहार सामग्रीचे कण बारीक असावे.
- एक 5 आठवडे वयाचा लाव पक्षी सुमारे 500 ग्राम आहार घेतो.
- 6 महिन्यांचे लाव पक्षी, दररोज सुमारे 30-35 ग्राम आहार घेतात.
- लाव पक्ष्यांना 12 अंड्यांच्या उत्पादनासाठी 400 ग्राम आहाराची गरज असते.
- ब्रॉयलर स्टार्टर मॅशचा वापर 75 आहारांमध्ये 5 किलोग्राम तेल पेंड मिसळून करतात. आहाराच्या कणांचा आकार आहारास परत एकदा दळून घेऊन कमी करता येतो.
लाव फार्मचे व्यवस्थापन
- सहा आठवड्यांचे झाल्यावर, मादी लाव पक्ष्याचे वजन 175-200 ग्राम असते आणि नरांचे सुमारे 125-150 ग्राम असते.
- मादी लाव पक्षी 7 आठवड्यांचे झाल्यावर अंडी घालण्यास सुरूवात करतात आणि वयाच्या 22 आठवड्यांपर्यत अंडी घालतात.
- साधारणपणे, अंडी घालण्याची वेळ संध्याकाळची असते.
- लावेच्या अंड्याचे वजन 9 ते 10 ग्राम असते.
- नर लाव पक्ष्याची छाती बहुतेक अरूंद आणि भुर्या व पांढर्या रंगाच्या पिसांनी आच्छादित असते. पण मादी लावेची छाती रूंद असून त्यावर काळे ठिपके असलेली भुरी पिसे असतात.
- चार आठवड्यांचे झाल्यावर नर आणि मादी यांना वेगवेगळे ठेवावे.
- अंडी उत्पादक लावांना दिवसातून सोळा तास प्रकाश मिळायला हवा.
लाव पिलांचे व्यवस्थापन
एक दिवसाच्या लाव पिलाचे वजन साधारणपणे 8-10 ग्राम असते. म्हणून ह्या पिलांना जास्त तपमानाची गरज असते. पुरेसे तपमान नसणे आणि वेगवान थंड हवेच्या संपर्कात आल्यास ही पिले दाटीने एकत्र येतात (क्लस्टरिंग) आणि परिणामी त्यांचा मरण दर वाढतो.
पुनरुत्पादन
लावेची अंडी
- वयाच्या 7व्या आठवड्यात लाव पक्षी अंडी घालू लागतात. वयाच्या 8व्या आठवड्यापर्यंत त्यांनी 50 टक्के अंडी उत्पादन केलेले असते.
- प्रजननक्षम अंडी घालण्यासाठी, नर लावांना माद्यांबरोबर वयाच्या 8 ते 10 आठवडे एकत्र ठेवायला पाहिजे.
- नर-मादी सरासरी 1:5 आहे. [chk orig text – in ‘cage system’ above it says 1:3 ratio]
- लावांमध्ये उबविण्याचा काळ 18 दिवस असतो.
- 500 मादी लावांपासून आपण दर आठवड्यास 1500 लाव पिले मिळवू शकतो.
लावांचे रोग
- मादी ब्रीडर लावेमध्ये जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता झाल्यास, त्यांच्या प्रजननक्षम अंड्यापासून प्राप्त झालेली पिले बहुतेक अशक्त व कमकुवत पायांची होतात. ह्यापासून बचाव करण्यासाठी मादी लावांना पुरेशी खनिजे आणि जीवनसत्वयुक्त आहार द्यायला पाहिजे.
- साधारणपणे लाव पक्षी चिकनच्या तुलनेत जास्त रोगप्रतिरोधक असतात. त्यामुळे लावांसाठी लसीकरणाची गरज भासत नाही.
- लाव पिलांच्या योग्य व्यवस्थापनासाठी, फार्मच्या जागेला निर्जंतुक करणे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविणे आणि उच्च गुणवत्तायुक्त आहार दिल्यास लाव पक्ष्यांचा रोगांपासून बचाव होईल.
लावेचे मांस
लावेचे मांस
ड्रेस्ड लावेचे मांस जिवंत लावेच्या वजनाच्या 70-73% असते. 140 ग्राम वजनाच्या लावेपासून 100 ग्राम मांस मिळते.
लाव संवर्धनातील आव्हाने
- नर लाव पक्षी मानवाला त्रासदायक वाटणारा आवाज काढतात.
- नर व मादी लाव पक्ष्यांना एकत्र वाढवितांना, नर लाव पक्षी इतर नरांचे डोळे फोडून त्यांना आंधळे करतात. क्वचित समयी, काही नर मृत देखील आढळतात.
स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.