कृत्रिम साखरेस वास आणि रंग नसतो. सहजपणे पाण्यात विरघळते. कृत्रिम साखर ही द्रव, भुकटी, गोळी या तीन स्वरूपात उपलब्ध आहे. प्रक्रिया उद्योगात काही प्रमाणात साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम साखर वापरली जात आहे. डॉ. संदीप रामोड, अरुण देशमुख दुग्धजन्य पदार्थ तयार करताना साखरेचा वापर करतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थास गोड चव येते, स्वाद वाढतो. साखरेचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पदार्थाची टिकवण क्षमता वाढते. दुग्धजन्य पदार्थ तयार करताना शक्यतो उसापासून तयार केलेली साखर वापरली जाते. परंतु आता या साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम साखर वापरली जाते. कृत्रिम साखरेस वास आणि रंग नसतो. तसेच सहजपणे पाण्याच विरघळणारी असून या साखरेपासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करताना जिभेवर गोड चव येते नंतर गोड चव लागत नाही. त्यापुढे पदार्थांचा स्वाद छान लागतो. कृत्रिम साखर द्रव, भुकटी, गोळी या तीन स्वरूपात उपलब्ध आहे.
१. अस्पारटेम
२. असेसल्फेम पोटॅशिअम
३. सॅकरीन
४. सुक्रॅलोज
१. स्टीव्होसाईड
२. थायोमाटीन
कोणत्याही वातावरणात आहे त्या स्वरूपात राहू शकते. उष्णतेस तग धरते.
१. गोड सुपारी, चुईंगम, आवळा कँडी, टूथपेस्ट, कोल्ड्रिंक्स, औषधे, इत्यादी मध्ये गोडी येण्यासाठी वापरतात.
२. स्टीव्होसाईड कृत्रिम साखर साबण व शाम्पू यामध्ये वापर करतात.
३. साखरेच्या तुलनेत खूपच कमी लागते उदा. साखर १ किलो तर कृत्रिम साखर १ ग्रॅम असे प्रमाण असते.
४. दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापर करतात.
उदा. दुधपेढा, बर्फी, गुलाबजामून, रसमलाई, कुल्फी, रसगुल्ला, मैसूरपाक, बुंदीलाडू, सुगंधी दूध, योगर्ट, चहा आणि कॉपी इत्यादी. विविध कृत्रिम साखरेचे गुणधर्म - गुणधर्म ---- ॲसपारटेम ---- असेसल्फेम- के ---- सॅकरीन ---- सुक्रॅलोज ---- स्टीव्हिया गोडवा (साखरेशी) ---- २०० पट ---- २०० पट ---- ४००-५०० पट ---- ६००-८०० पट ---- २५०-३०० पट दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतरची चव ---- नाही ---- थोडी असते ---- कडवट लागते ---- नाही. ---- नाही कोणत्या पदार्थांत वापर करता ---- पेढा, गुलाबजाम, योगर्ट, गोड दही, चहा, कॉफी, चुईंगम आणि सॉप्ट ड्रिंक्स इत्यादी. ---- रसगुल्ला, पेढा, जामून, हलवा बर्फी, इत्यादी ---- कँडी, औषधे, टुथपेस्ट, गोड सुपारी इत्यादी ---- जामजेली, मैसुरपाक, जाम कँडी, बिस्कीट, टोस्ट इत्यादी ---- आइस्क्रीम, सोडा, सॉप्ट, ड्रिंक्स, चहा, कॉफी, टुथपेस्ट, सुगंधी दूध, कुल्फी, गोड दही इत्यादी. किती प्रमाणात वापरावे (मिलिग्रॅम प्रतिकिलो वजन) ---- ५० ---- १५ ---- ५ ---- ५ ----१०
१) ही साखर जास्त भाजल्यास या साखरेचा उपयोग होत नाही.
२) काही व्यक्तींना डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. ही साखर पदार्थांचे सेवन करताना सुरवातीस गोड लागते. मात्र नंतर काहीशी कडवट चव लागते.
३) अतिसेवनाने जुलाब होण्याचीही शक्यता असते.
४) गर्भार व शिशू मातांना या साखरेच्या सेवनाने हानी होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसारच याचा वापर करावा.
डॉ. संदीप रामोड - ९८६०९११९३८. (लेखक गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घ...
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे ...
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण...