অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पपईपासून तयार करा चेरी

पपईपासून तयार करा चेरी

पपईमध्ये अ, ब आणि ड ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पपईपासून घरच्याघरी चेरी तयार करता येते. महिला बचत गटासाठी हा एक चांगला लघुउद्योग होऊ शकतो. 
पूर्ण परिपक्व कच्ची पपई एक किलो, साखर एक किलो, पाणी पाव लिटर - पाकासाठी, अर्धा लिटर - चुन्याच्या निवळीसाठी, चुना 40 ग्रॅम, सायट्रिक ऍसिड दहा ग्रॅम.

यंत्रसामग्री

स्टेनलेस स्टीलचे गंज, चाकू, तराजू व मापे, सीलिंग यंत्र, मसलीन कापड, डबल नेटेड गाळणी

कृती

  • प्रथम पूर्ण परिपक्व, निरोगी आणि आकाराने मोठी पपई स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी.
  • कच्च्या पपईची साल व बियांचा भाग काढून पपईचे तुकडे करावे. त्यांचे वजन करावे.
  • चुन्याचे आठ टक्के तीव्रतेचे द्रावण तयार करावे. त्यात पपईचे तुकडे 30 मिनिटे ठेवावेत. त्यानंतर हे तुकडे दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  • नंतर हे तुकडे मसलिन कापडामध्ये बांधून उकळत्या पाण्यात पाच-दहा मिनिटे धरावेत. म्हणजेच ते ब्लांचिंग करून घ्यावेत. नंतर हे तुकडे थोडा वेळ थंड पाण्यात ठेवावेत.
  • या तुकड्यांना दातेरी चाकूच्या साहाय्याने छिद्रे पाडावीत.
  • नंतर साखरेचा एकतारी पाक (45-50 ब्रिक्‍स) तयार करून गाळून घ्यावा. नंतर पपईचे तुकडे पाकामध्ये 12 ते 18 तास ठेवावेत.
  • दुसऱ्या दिवशी या पाकातील तुकडे वेगळे करून पाकात आवश्‍यकतेनुसार साखर मिसळावी. दोन तारी पाक ( 60-65 ब्रिक्‍स) तयार करावा. पाक गाळून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात पपईचे तुकडे टाकावेत.
  • तिसऱ्या दिवशी त्या पाकातील तुकडे वेगळे करून पाक पक्का होईपर्यंत (75-78 ब्रिक्‍स ) उकळावा. एक किलो पाकासाठी पाच ग्रॅम या प्रमाणात सायट्रिक ऍसिड मिसळावे. सायट्रिक ऍसिड वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
  • पाक गाळून घ्यावा. थंड झाल्यावर त्याच्यात रंग मिसळून पपईचे तुकडे टाकावेत. मिश्रण दोन-तीन दिवस तसेच ठेवावे.
  • पाकात तुकडे चांगले मुरल्यावर हे तुकडे पाकातून काढून हवेत वाळवावेत किंवा ड्रायरमध्ये 60 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाला 22 ते 24 तास ठेवावेत.
  • तयार झालेली पपईची चेरी सीलिंग यंत्राने पॉलिथिन पिशवीमध्ये पॅक करावी.

लेखिका- सुनीता चौहान

संपर्क - 9422304948 
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate