जनावरांमध्ये हा एक संसर्गजन्य साठीचा रोग बॅसिलस अॅन्थसिस जीवाणुमुळे होतो. हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असून, जनावरांना रोगाची लक्षण दिसतात न दिसतात तोपर्यंत तडकाफडकी ती मरून पडतात. म्हणूनच याला फाशी म्हणतात. फाशी म्हणजे तत्काळ मरणं.
लक्षणे
- १०६ – १०७ अंश फॅ. ताप येतो.
- श्वासोच्छवासाचा भयंकर त्रास होतो.
- जनावराच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात.
- जबरदस्त पोट दुखतं.
- एकाएकी कळा येतात.
- जनावरांच्या योनी भोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागात पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो.
- शेणात रक्त आढळते.
- शेण बाहेर टाकताना जनावर कळा देतं.
- पोटफुगी होते.
- जनावर आचगे देउन मृत्युमुखी पडतं. बैल शेतात काम करताकरता किंवा चरताचरता रानात कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. मेल्यावर जनावराच्या शरीरावरच्या छिद्रांमधून म्हणजे नाक, तोंड, कान, योनीमार्ग, गुदद्वारातून काळपट रंगाचं रक्त वाहत. रक्त साकळत अगर गोठत नाही. जनावरांमध्ये मृत्युनंतरचा निसर्गतः येणारा ताठरपणा दिसून येत नाही.
सगळ्या प्रकारची लक्षण एकवटून येवून काही मिनिटात खेळ संपतो असा हा महाभयानक रोग आहे.या आजाराचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वप्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना उद्भवतो. विशेष म्हणजे हा महाभयंकर आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो. म्हणून या आजाराबाबत फार सावधगिरीची दक्षता घ्यावी लागते.फाशीनं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीत कवच करून राहतात. ऊबदार हवामान मिळाल्यानंतर जोमाने वाढतात. खाद्यावाटे, पाण्यावाटे, जखमेतून शरीरात प्रवेश करतात.
वर्षानुवर्षे हा रोग एखाद्या ठराविक भागात पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो.
घ्यावयाची सावधगिरी
- प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मेले आहे अशी नुसती शंका जरी आली तरी कातडी न काढता खोल खड्ड्यात पुरून टाकावं.
- शवविच्छेदन अजिबात करू नये.
- पुरातना त्या खड्ड्यात जंतुनाशकाचे भरपूर द्रावण फवारणं.
- तसेच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा.
- अर्थात मेलेलं जनावर जाळून टाकणं सर्वात चांगला उपाय.
या आजारावर पेनेसिलीन उच्च मात्रेत देणे हा उपाय संधी मिळाली तर करावा, मात्र हे त्वरित होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो. त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी. आजारी जनावर बांधलेली जागा जंतूनाशकाच्या द्रावणाने फवारून घ्यावी. जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचे रक्त येत असेल तर पुराण्याअगोदर त्वरित कार्बोलिक अॅसिडच्या द्रावणात कापसाचे बोळे बुडवून, त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत म्हणजे इतर जनावरांत त्याचं प्रसार होत नाही आणि त्वरित त्या शवाची विल्हेवाट लावावी.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 5/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.