हापूस आंबा पातळ सालीचा असतो, त्यामुळे वाढलेल्या तापमानाचा त्या फळावर परिणाम होतो. उष्णतेमुळे फळातील गर भाजला जातो, त्यामुळे साका पडतो. यावर उपाय म्हणजे वाढत्या तापमानात बागेतील कलमांना दर आठवड्याला 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. कलमांच्या बुंध्यात आच्छादन करावे. त्यामुळे बागेतील उष्णता कमी करता येते. शक्य असल्यास वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत झाडावर पाण्याचा फवारा मारावा. उशिरा पाण्याची फवारणी करू नये. कारण झाडावर किंवा फळावर ओलसरपणा राहण्याची शक्यता असते.
फांद्या वाळण्याचे कारण म्हणजे फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची ( 100 लिटर पाणी, एक किलो चुना आणि एक किलो मोरचूद) फवारणी करावी. ही फवारणी पावसाच्या अगोदर एकदा, पावसाळ्याच्या काळात उघडीप असताना आणि पाऊस संपल्यानंतर करावी. रोगग्रस्त फांदीचा भाग कापून जाळून टाकावा. बागेची स्वच्छता ठेवावी.
संपर्क - 02366- 262234
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद...
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीन...
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर...
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे य...