1) नारळाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात प्रत्येक झाडास 30 लिटर आणि उन्हाळ्यात 40 लिटर या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी पाणी द्यावे. बुंध्यातील गवत काढून टाकावे. तसेच बुंध्यात नारळ, झावळा, पाने, पालापाचोळा अथवा गवत यांचे आच्छादन करावे.
2) नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वरून सावली करावी; अन्यथा उन्हाचा त्रास होऊन पाने पिवळी पडण्याची शक्यता असते.
3) नवीन लागवड केलेल्या रोपांना गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा किंवा कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते म्हणून वरचेवर लक्ष ठेवून उपाययोजना करावी.
4) कोंब कुजव्या हा रोग आढळल्यास प्रादुर्भीत भाग साफ करून त्या जागी बोर्डो मिश्रणाचा लेप द्यावा आणि त्या जागी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
5) जानेवारी - फेब्रुवारीमध्ये नारळाला खताची मात्रा द्यावी. यासाठी युरिया 750 ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश 650 ग्रॅम ही खते दोन वेळा द्यावीत. खताची मात्रा कमी पडल्यास फळगळ दिसून येते. तसेच फळे तडकून पडतात. त्यासाठी योग्य प्रमाणात खत मात्रा देणे आवश्यक आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...