झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, परंतु काही ठराविक जाती आपल्या हवामानात चांगल्या येतात. हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. झेंडू लागवड ही नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून करता येते, यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. याचबरोबरीने भाजीपाल्याच्या पिकात मिश्रपीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडूची लागवड केली जाते.
हंगाम लागवडीचे प्रकार (सें.मी.) पावसाळी उंच जाती 60 - 60
मध्यम जाती 60 - 45
हिवाळी उंच जाती 60 - 45
मध्यम जाती 45 - 30
उन्हाळीउंच 45 - 45
मध्यम 45 - 30
फुलांचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे अत्यंत जरुरीचे आहे. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार हेक्टरी 50 कि.ग्रॅ. नत्र, 50 कि.ग्रॅ. स्फुरद, 50 कि.ग्रॅ. पालाश द्यावे; तसेच लागवडीनंतर एक महिन्याने 50 कि.ग्रॅ. नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. लागवडीनंतर आठ-दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरिलम 100 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो ढीग प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा.
अशाच प्रकारे दहा किलो स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 100 किलो ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्टर क्षेत्रातील झेंडूच्या पिकाला द्यावे. यानंतर एका आठवड्याने शेंडाखुडीचे काम पूर्ण करावे, त्यामुळे बाजूस फांद्या फुटतात आणि फुलांची संख्या भरपूर वाढते.
- 020 - 25693750
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...