बकुळीची गर्द हिरवी पाने, झाडांचा विशिष्ट आकार, सुवासिक फुले, छान फळे सर्वांना मोहून टाकतात. हळदूच्या लाकडाचा वापर रेल्वे स्लीपर्स, रेल्वेतील सामान ठेवण्याच्या जागेची बांधणी, जहाजबांधणी या उद्योगात करतात. याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ व दोषविरहित असल्याने लाकडास चांगली मागणी आहे. अशा या वृक्षाची लागवड सर्वांनी वाढविणे गरजेचे आहे.
उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील जंगलांत बकुळ ही प्रजाती आढळते. आपल्याकडे बगीचे, सार्वजनिक कार्यालये, रस्त्याच्या दुतर्फा, परसबागा, मंदिर परिसर इ. ठिकाणी बकुळ लागवड केलेली आढळते. आयुर्वेदिकदृष्ट्या या प्रजातीत कश्य, शीत, कटू आणि कटूविपाक गुण आढळतात. सदाहरित असलेला हा वृक्ष 45 ते 50 फुटांपर्यंत वाढतो. पाने साधी चकचकीत, तेलकट, गुळगुळीत असतात. फुले पांढरी, सुवासिक, दोन ते सहा एकत्रित आलेली, जमिनीकडे झुकलेली असतात. फळे पिकल्यानंतर पिवळी होतात. फुले मार्च ते मे आणि फळे मे ते जूनमध्ये येतात. बऱ्याचदा वर्षातून दोन वेळा फुले-फळे येताना दिसतात. रोपेनिर्मिती आणि लागवड ः या वृक्षास केशरी पिवळ्या रंगाची फळे जानेवारी ते मार्च या कालावधीत येतात. पिकलेली फळे जमा करून, त्यातील बियाणे साफ करून उन्हात वाळवावे. बियाणे बदामी रंगाचे चकचकीत असते. रोपेनिर्मितीपूर्वी बियाणे उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून 12 तास कोमट पाण्यात भिजवावे. 5 x 8 सें.मी. आकाराच्या पिशव्यांमध्ये बियाणे दोन ते तीन सें.मी. खोल पेरावे. साधारणतः पेरलेले बियाणे 30-40 दिवसांत उगवते. तीन ते चार महिन्यांत रोपे तीन फुटांपर्यंत वाढतात. रोपेनिर्मितीसाठी शेडनेट वापरणे आवश्यक असते. लागवडीसाठी 2 x 2 x 2 फुटांचा खड्डा खोदून चांगले कुजलेले एक टोपली शेणखत, दोन किलो कंपोस्ट, 100 ग्रॅम करंज किंवा निंबोळी पेंड आणि 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकून खड्डे भरून घ्यावेत. लागवड चांगल्या पावसानंतर करावी. मंदिर परिसर, रस्त्याच्या दुतर्फा, बागा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे इ. ठिकाणी मोकळ्या असलेल्या जागांवर बकुळीची लागवड करून परिसर सुशोभित करता येतो.
क्युरसीटॉल, स्पीनास्टेरॉल, सायटोस्टोरॉल, ल्यूपेओल युरेसोलिक ऍसिड इ. रसायने आढळतात.
फळांचा मगज अतिसारावर उत्तम मानला जातो. फुले आणि फळांची पावडर करून जखमांसाठी वापरली जाते. खोडाची साल आणि फळे हिरड्या आणि दातांना बळकटीसाठी वापरली जातात.
फुले, खोडाची साल, पाने, बिया इ.
इमारती लाकडासाठी उपयुक्त "हळदू'
हळदू या वनस्पतीस शास्त्रीय भाषेत "हलदानिया कॉर्डिफोलिया' किंवा "अडीना कॉर्डिफोलिया' या नावाने ओळखले जाते. "रुबीऐशी' या कुळातील ही वनस्पती "हेदू', "हेद', "हेदी' या प्रचलित नावांनी महाराष्ट्रात ओळखली जाते. समुद्रसपाटीपासून 3000 फुटांपर्यंत या वनस्पती भारतभर आर्द्रपर्ण, पर्णझडी जंगलामध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रात कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या ठिकाणी हा वृक्ष आढळतो. हा उंच वाढणारा पर्णझडी वृक्ष आहे. याचे खोड सुमारे 20 फुटांपर्यंत सरळ वाढते, त्यानंतर खोडास आडव्या फांद्या येतात. खोडाची साल करडी बदामी, जाड, खरबरीत असते. या वनस्पतींच्या नवीन येणारी पालवी केसाळलेली असते. पाने साधी, काहीशी हृदयाकृती गोलाकार असतात. पानाचे देठ चार-दहा इंच लांब असतात. पानांचे टोक काहीसे पिंपळाच्या पानांसारखे असते. पानांवर पाच-सात शिरांच्या जोड्या असतात. फुले डिसेंबर - जानेवारीपर्यंत येतात. फांद्यांच्या शेंड्याला किंवा टोकास फुले येतात. फुले अतिशय लहान, झुबक्यात येतात. बदामी लालसर रंगाची फुले असतात.
या वनस्पतीचे बियाणे फेब्रुवारी ते मे या काळात तयार होते. फुले लहान असल्याने बी सूक्ष्म (अगदी लहान) असते. बियाणे गोळा करून सावलीत चांगले सुकवावे. फळामधून बियाणे काढून डब्यात साठवावे. अशा बियाण्यांची उगवणक्षमता एक वर्षापर्यंत राहते. 100 ग्रॅम वजनात सुमारे 11 लाख बियाणे असते. रोपे निर्मितीसाठी बियाणे वापरतेवेळी संस्करण करण्याची आवश्यकता नसते. पेरतेवेळी गादीवाफे करून त्यातील दगडगोटे काढून टाकावीत. बियाणे वरचेवर रेषेत पेरावे. सुमारे 30 दिवसांनी बियाणे उगवते. उगवलेले बियाणे प्लॅस्टिक पिशवीत टाकावे. बियाणे पेरल्यापासून सुमारे दोन फूट उंचीची रोपे चार महिन्यांत तयार होतात. दोन फूट उंचीची रोपे लावताना 1 x 1 x 1 फुटाचे खड्डे घ्यावेत. चांगल्या कुजलेल्या शेणखताने, पालापाचोळ्याने व मातीने भरून खड्डे तयार करून ठेवावे. पाऊस सुरू असताना अशी रोपे संध्याकाळच्या वेळेला रोपवनाच्या ठिकाणी लावावी. हलकी, निचरा होणारी, वालुकामय, मुरूम जमिनीत हे झाड चांगले वाढते. आर्द्रता या झाडास चांगली मानवते. असे हे उपयुक्त हळदूचे झाड पडीक माळरानावर, नद्या काठांनी, डोंगराळ भागात लावून या वृक्षाचे संवर्धन व जतन करता येईल. आपल्या भविष्यातील घर, शेतीसाठीची अवजारे तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या वृक्षाची लागवड करण्यास हरकत नाही.
या वनस्पतीच्या लाकडाचे गुणधर्म अभ्यासून ब्रिटिशांनी या वृक्षाचा मोठ्या प्रमाणात वापर रेल्वे स्लीपर्स, रेल्वेतील सामान ठेवण्याच्या जागेची बांधणी, जहाजबांधणी या उद्योगांमध्ये केल्याने व ग्रामीण भागात या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. पिअर्सन व ब्राऊन या शास्त्रज्ञांच्या मते या वृक्षाचे लाकूड कोरीवकामासाठी चांगले आहे. इमारत बांधणीसाठी ते बांधकामाची मोठी कामे या ठिकाणी या लाकडाचा वापर होत आला आहे. लाकूड पिवळसर रंगाचे, टणक असून, गाभ्याचे लाकूड व आयुर्मान वलये या लाकडात झटकन दिसत नाहीत. लाकडास पॉलिश चांगले होते. या लाकडावर बारीक नक्षीचे काम चांगले होते. गणितीय उपकरणे या झाडांच्या लाकडापासून केली जात असत. लाकूड मजबूत आणि टिकाऊ व दोषविरहित असल्याने लाकडास चांगली मागणी आहे. कंगवे, खेळणी, फर्निचर यासाठीही या झाडाच्या लाकडाचा उपयोग केला जातो.
बिवळा हा बहुपयोगी वृक्ष आहे. 10 ते 20 मीटर वाढणाऱ्या या वृक्षाचे खोड मजबूत असते आणि त्यावर फांद्या विस्तारलेल्या असतात. खोडाची साल जाड, बाहेरील साल पिवळसर राखाडी असते. पाने संयुक्त सहा ते नऊ इंच लांब असतात. फुले गर्द पिवळी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत येतात. फळे लहान, गोलाकार शेंगांसारखी. त्यात अगदी लहान आकाराचे बी असते. साधारणतः दर दोन-तीन वर्षांनंतर बियाणेनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फळे परिपक्व झाल्यानंतर झाडावरून काठीने काढली जातात अथवा जमिनीवरील ताजी वाळलेली फळे गोळा करावीत. फळांमधून बियाणे काढणे तसे जिकरीचे व कठीण असते. त्यामुळे फळेच रोपेनिर्मितीसाठी वापरली जातात. वाळलेली, साफ केलेली फळे पोत्यात किंवा गोणपाटात 9 ते 12 महिने आपण साठवू शकतो. एका किलोत साधारणतः 1600 ते 1900 बियाणे असते. कोमट पाण्यात 12 तास भिजवलेले बियाणे किंवा शेणकाल्यात भिजवलेले बियाणे 75 ते 97 टक्क्यांपर्यंत उगवतात. बियाणे पिशवीत किंवा गादीवाफ्यावर पेरावे. गादीवाफ्यावर दोन बियांमध्ये पाच सें.मी. व दोन ओळींत 20 सें.मी. गादीवाफ्यावरील रोपे उगवण झाल्यानंतर पिशवीत अलगद ठेवावीत. हे काम शक्यतो संध्याकाळी करावे. रोपवाटिकेत नियमित तणकाढणी, खते, पाणी व्यवस्थापन, रोग-किडीसाठी फवारणी वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. लागवड खुंटाने बियांद्वारे आणि रोपे करून केली जाते. एका किंवा दोन वर्षांच्या रोपापासून खुंट तयार केले जातात. लागवड जून-जुलै महिन्यांत चांगला पाऊस झाल्यानंतर करावी. बियांद्वारे लागवड करताना एका खड्ड्यात दोन-तीन बिया टाकाव्यात. बियाणे उगवल्यानंतर त्यातील चांगले रोप ठेवून विरळणी करावी. लागवड 1 x 1 x 1 फुटाचे खड्डे घेऊन 4 x 4 मीटर अंतराने करावी. रोपाद्वारे लागवड करताना मातीचा बाफल फुटणार नाही याची काळजी घ्यावी. दहा वर्षांत साधारणतः चार-पाच मीटरपर्यंत झाड वाढते आणि खोडाची जाडी 14-15 सें.मी होते. लागवडीनंतर गुरे, आग, कडाक्याची थंडी इ. पासून संरक्षण करावे.
या वनस्पतीपासून लालसर रंगाचा डिंक, चांगले टिकाऊ लाकूड, जनावरांसाठी चारा इ. मिळत असल्याने या बहुउद्देशीय वृक्षांची लागवड होणे आवश्यक आहे. जंगलांमध्ये तुरळक आढळणारा हा वृक्ष आयुर्वेदिक व इतर तत्सम औषधे चिकित्सा पद्धतीमध्ये वापरत असल्याने या वनस्पतीच्या लाकडास व सालीस मागणी वाढली आहे. खोडाची साल, पाने आणि फुले विविध औषधांमध्ये वापरली जातात. लाल, काळसर रंगाचा गर्द डिंक या वनस्पतीपासून मिळतो.
संपर्क ः (02358) 283655
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय, दापोली येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...