অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

जगातील एकूण १९९ देशांपैकी ११८ देशात भात पिकवले जाते. तृणधान्याखाली जगात ६८u दशलक्ष हेक्टर क्षेत्र असुन त्यातुन ५९६ दशलक्ष मेट्रीक टन उत्पादन मिळते. भात पिकाखाली १५५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र असुन सर्व तृणधान्य पिकामध्ये भाताचा वाटा २२.४९ टक्के असुन ते क्रमांक २ वर आहे तर गहू पिकाचा क्रमांक १ असुन या पिकाखाली २१५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. तसेच तिस-या क्रमांकावर मका हे पीक असुन त्याखाली १३९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. इतर तृणधान्याखाली १४१ दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. मात्र भात हे एकमेव तृणधान्य पीक असे आहे की, प्रति हेक्टरी सर्वात जास्त उर्जा (एनर्जी) ही भात पिकातुन मिळते. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ६६ टक्के लोकांचे भात हे प्रमुख अज्ञ आहे. आशिया खंड आणि भारतातील ६५ टक्के लोकसंख्येचे भात हे मुख्य अन्न असुन या पिकाला जागतिक पातळींवर अनन्यसाधारण महत्व आहे.

भात पिकाला अनन्यसाधारण महत्व का आहे

  1. भात पिकामध्ये सर्व स्पेसीज (ओरायझा) मध्ये एकूण १ लाख ७४ हजार जाती उपलब्ध आहेत. यामध्यें भात पिंकाचे विविध प्रकार आहेत. अतिबारीक तांदूळ १o ग्रॅम(१000 दान्यांचे वजन) तें 32 तें १५ ग्रंम (1000 दान्यांचे वजन) म्हणजे जाड़, अतिजाड़, मध्यमजाड़, बुटका व बारीक तांदुळ (सुपरफॉईन). ३ ते ४ मि.मी. ते ७.५ ते ९ मि.मी. लांबींचे असतात. अत्यंत सुवासिक ते बिंनसुवासीक, काळे टरफल ते पिवळे टरफल, अतिचिकट तांदूळ ते फळफळीत सुटा तांदूळ शिजवल्यावर मिळतो. अशा विंविंध्र प्रकारच्या भात जाती जगामध्ये उपलब्ध आहेत. अशा तर्हेची विविधता दुस-या कोणत्याही तृणधान्य पिकामध्ये पहायला मिळत नाही.
  2. जगातील सर्वाधिक म्हणजे ६६ टक्के लोकसंख्येचे भात हे प्रमुख अन्नधान्य पिक आहे.
  3. हे पीक जगातील विविध प्रकारच्या हवामानास तोंड देवून चांगले उत्पादन देऊ शकतें. उदा. उष्ण आणेि दमट थ्रेड़ व अतिथड़ हवामानात पीक छेता येते.
  4. जमिनीच्या उंचीचा विंचार करता समुद्रसपार्टीच्या खाली उदा. केरळ आणि समुद्र सपाटीपासून ३o५0 मीटरवर उदा. नेपाळ मधील जामला दरीमध्यें म्हणिजेंच अतीं थड़ हवामानात भात पीक घेतलें जातें.
  5. ४00 ते ५00 मि.मी. पासून ४000 मि.मी. पावसाच्या प्रदेशात हे पीक घेतले जातें.
  6. जर्मनींचा विचार करता ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त मधील वालुकामिश्रींत माती, अत्यंत हलकी जमीन तसेच मध्यम सुपिक जमीन, समुद्रालगत खा-यापाण्याची जमीन आणि क्षारपष्ट जमिनीतही हे पीक घेतले जाते.
  7. प्रामुख्याने भात पीक हे विषवृत्ताच्या उत्तरेस ३५ आणि दक्षिणेस २३.५ अक्षांश या प्रदेशात घेतले जाते. मात्र सर्वात जास्त उत्पादन समशितोष्ण (टेम्परेट) प्रदेशात मिळते. उदा. चीन, जपान.

भात पिकातील संशोधनाचा मागोवा

सन १९४७ ते १९७0 या तेंवीस वर्षाच्या कालावधीत तसेच त्या पुर्वीही महाराष्ट्र आणि संपुर्ण भारत देशात भाताच्या उंच जातींची लागवड होत असे (इंडीका). या जातींचे वैशिष्ट्य़ म्हणजे उंची ५ ते ६ फुट, खोड कमकुवत यामुळे या जातीं लोळल्यामुळे उत्पादनात बरीच घट येत असे. या जातींचे त्या कालावधीमधील प्रतीष्हेक्टरी उत्पादन ६ ते ४ फ्रेिंटल मिळत असे. यामुळे भारतामध्ये तांदळाचा व इतर अन्नधान्याचा मोठा तुटवडा भासत होता. यामुळे रंगुन तांदुळ, अमेरिकेतील मेिलो, ज्वारी, कमी प्रतिचा गहू आयात करुन भारतातील जनतेला पुरवठा केला जात होता.

मात्र सन १९६५ मध्ये तायवान मधुन तायचुंग स्थानिक-१, १९६६ साली आय.आर.-८ अशा दोन बुटक्या, भरपुर फुटवा देणा-या आणि आपल्या उंच जातींपेक्षा तिप्पट उत्पादन देणा-या जाती भारतामध्ये आयात केल्या. सन १९६७ मध्ये डॉ. एस. व्ही. एस. शास्त्री. आय. सी. ए. आरचे भारतातील प्रमुख भात संशोधन केंद्र, हैदाबाद येथिल शास्त्रज्ञाने जया हीं भारतातील सर्व प्रकारच्या जमिनीत भरघोस उत्पादन देणारी नवीन भाताची जात शोधुन काढली. जया आणि आय आर-८ या दोन भात जातींनी हेक्टरी ४0 ते ४५ फ्रेिंट्रल उत्पादन दिल्यामुळे भारतातील भात उत्पादनात भरीव वाढ होऊन तांदळाची आयात बंद झाली.

सन १९७0 ते १९९g या कालावधीत भारतातील विविध कृषि विद्यापीठे आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या विविध भात संशोधन केंद्रानी निर्माण केलेल्या बुटक्या आणि विविध दाण्याच्या प्रकारातील अनेक जाती निर्माण करुन १९९० साली भारत तांदुळ उत्पादनात स्वयंपुर्ण झाला आणि बासमती तांदळाची निर्यात करु लागला. महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी सन १९७५ ते २०१४ पर्यंत एकुण ५u जातींची निर्मिती करुन त्या प्रसारीत करण्यात आल्या. या पैको ५ संकरित वाण डॉ. बा. सा. कोंकण कृषि विद्यापिठानें प्रसारीत केले. यासर्व भात जाती आणि पाच संकरित वाणामुळे महाराष्ट्राच्या भात उत्पादनात ४९ टक्क्यांची भरीव वाढ झालेली आहे. नविन जातीं निर्मितीबरोबरच चारही कृषि विद्यापीठांमधील संशोधकांनी भात पिंकाच्या अधिक उत्पादन देणा-या मशागत पध्दती वेिकसित केल्या.

कीटकशास्त्र आणि रोगशास्त्र यामध्ये संशोधन होऊन विविध रोग आणि कोंडीवर नियंत्रणाचे उपाय शोधुन काढलेले आहेत तसेच जर्मनींमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा, त्या देण्याच्या वेळा या बाबतही उपयुक्त संशेोधन झाल्यामुळे महाराष्ट्राच्या भात उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. कृषि विद्यापीठांचे संशोधन सामान्य शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य महाराष्ट्राच्या कृषेि खात्याने सातत्याने आणि कार्यक्षमतेने केल्यामुळेच भात उत्पादनाची वाढ होण्यास मोलाची मदत झालेली आहे.

संकरित भात वाणांचे महत्वपुर्ण संशोधन

प्रादेशिक कृषिं संशोधन केंद्र. कर्जत, जि. रायगड हे महाराष्ट्राचे १४ भात संशोधन केंद्राचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी भारत सरकारने जून १९९१ मध्ये संकरित भात वाण निर्मितीसाठी कर्जत केंद्राची निवड करुन तेथे हा प्रकल्प सुरु झाला तर भारतात एकूण १२ संशोधन केंद्रावर हा प्रकल्प चालू झाला. सन १९९१ ते १९९६ पर्यंत कर्जत केंद्राने सह्याद्री हा महाराष्ट्र राज्याचा पहिला वाण प्रस्तुत लेखाचे लेखक यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला. महाराष्ट्र शासनाने सन १९९८ मध्ये तो प्रसारीत केला. या वाणाचे महत्वपुर्ण वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय पातळीवर जे अनेक चाचणी प्रयोग झाले त्यामध्ये या वाणांचा १ ते ३ क्रमांकात समावेश झाला.

कर्जत केंद्राने या वाणाच्या बिजोत्पादनाचे तंत्रज्ञान विकसीत केले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनूकूल वातावरणात एकरी २० ते २५ क्रिटल संकरित बियाण्यांचे विक्रमी उत्पादन काढून अनेक खाजगी कंपन्याना हे उत्पादन दाखविले. सन २००० मध्ये डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापिठाच्या कर्जत केंद्राने भारतीय कृषि विभागाच्या इतिहासात एक अवर्णणिय व महत्वपूर्ण कामगिरी केली. ती म्हणजे डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि सिन्जेटा इंडीया लि. पुणे यांचा भारतातील पहिला ऐतिहासिक सामंजस्य करार घडवून आणला आणि यामुळे सह्याद्री या संकरित वाणाचे प्रत्येक वर्षी शेकडो टन बियाणे करीमनगर येथे उत्पादन करुन ते महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व ओरीसा राज्यातील शेतक-यांना सतत १० वर्षे उपलब्ध करून दिले. सह्याद्री या वाणामुळे अखिल भारतीय पातळीवर भात उत्पादनात भरीव वाढ होण्यास मदत झाली. सन १९९८ नंतर विविध संकर घेऊन सह्याद्री २,३, आणि ४ असे चार संकरित वाण प्रस्तुत लेखकाच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले.


भातपिकाची सद्यस्थिती

सन २०१२-१३ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भातपिकाखाली १५.४ लाख हेक्टर क्षेत्र असून एकूण उत्पादन ३५ लाख टन आणि राज्याची प्रतीहेक्टरी उत्पादकता १९७४ झाली यामध्ये कोकण विभाग प्रथम क्रमांकावर असून उत्पादकता २६८१ किलो/हेक्टर आहे. क्र. २ वर कोल्हापूर विभाग  २१९१ किलो /हेक्टर आणि क्र. ३ वर पूर्व विदर्भ १७६१ किलो/हेक्टर अशी आहे.

महाराष्ट्र राज्याची दर दशकातील भात उत्पादकतेची प्रगती

वर्ष १९६१-६२- १९६६-६७ १९७१-७२ १९८१-८२ १९९०-९५ २०००-०१
२००७-०८ 
२०१२-१३
उत्पादकता (किलो/हे) ७९० १०९४ २०२८ १५३२ १४६४ १२७७ १९०३ १९७४

एकूण ४६ वर्षात महाराष्ट्रातील भात उत्पादकता ५० टक्क्यांनी वाढली आहे . परंतु ती इतर राज्यांच्यामानाने समाधानकारक दिसत नाही. याची कारणमिमांसा

  1. संकरित भात वाणाखाली क्षेत्र अत्यंत कमी आहे. दरवर्षी यात वाढ होणे आवश्यक आहे. उदा. मागील दशकात बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची उत्पादकता १४ ते १५ क्रेिटल/हेक्टर होती. आता ती २१.५ ते २३.५ क्रेिटल/हेक्टर पर्यंत वाढली आहे, कारण संकरित वाणाखालील क्षेत्रामध्ये भरीव वाढ झाली आहे.
  2. प्रत्येक विभागातील भात जातींचा विचार करता, त्याच त्याच जाती कित्येक वर्षे लागवडीखाली आहेत. त्यात बदल होणे आवश्यक आहे.
  3. उशीरा लावणी तसेच प्रति चौ.मी. क्षेत्रामध्ये जादा झाडांची संख्या यामुळे फुटवे कमी, लोंबी लहान, दाण्यांची कमी संख्या यामूळे उत्पादनात घट येते. चवथ्या किंवा पाचव्या पानावर लावणी होणे व १ चौ.मी. क्षेत्रामध्ये हळव्या जातीसाठी ४५ चूड आणि निमगरव्या जातीसाठी ३३ चूड रोपे लावणे आवश्यक आहे.
  4. जमिनीत कार्बन व नत्राचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय खत, ते न मिळाल्यास भाताचा पेंढा ५ टन/हे. व गिरीपूष्प यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे तसेच सेंद्रिय खते अ रासायनिक खतांचा संतूलीत वापर होणे आवश्यक आहे.
  5. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यांची उत्पादकता कमी आहे, ती वाढविणे गरजेचे आहे. या विभागाचे भात पिकाखालील क्षेत्र सर्वात अधिक आहे. (७.५ लाख हेक्टर) मात्र उत्पादकता इतर विभागापेक्षा कमी आहे. ( १७६१ किलो/ हेक्टर) ती वाढविणे अतिशय आवश्यक आहे.

भविष्यातील वाटचाल

  1. भातशेती करण्यासाठी आवश्यक मजूर उपलब्ध होत नाहीत झालेच, तर भरमसाठ मजूरी द्यावी लागते. तेही करुन लावणी व कापणी सारख्या वक्तशिर कामांसाठी वेळेवर मजूर मिळणे अशक्य झाले आहे. फक्त मजूर आणि सेंद्रिय खते यावर एकरी एकूण होणा-या खर्चापैकी ५o ते ६० टक्के खर्च या दोन गोष्टींवर होतो. यासाठी यांत्रिक शेतीचा अवलंब करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. यासाठी पेरणी/ लावणी, कोळपणी, बेणणी ऐवजी तणनाशके वापरणे, कापणी, मळणी व उफणणी यासाठी अनेक यंत्रे आता उपलब्ध आहेत, त्यांचा वापर चिखलावर ड्रमसारखे मोड आलेल्या बीयाण्यांची पेरणी करणे. जेथे शक्य असेल तेथे लावणी यंत्र वापरणे, कापणी व मळणीसाठी रीपर, हारवेस्टर व मळणी यंत्र शेतक-यांनी वापरल्यास एकरी उत्पादन खर्चात मोठी बचत होईल.
  2. जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी महाग सेंद्रिय खत घेणे परवडत नसल्यास ५ टन भाताच्या पेंढ्याचे तीन ते चार तुकडे करुन नांगरणीपुर्वी शेतात पसरवून ते जमिनीत पावसापूर्वी गाडावेत. १ टन पेंढ्यांपासून ४00 किलो कार्बन , ५ किलो नत्र, १ किलो स्फूद, १५ किलो पालश आणि ६० किलो सिलीका जमिनीस मिळते. त्याचबरोबर ताग, ध्येंच्या किंवा गिरीपूष्पाचा पाला जमिनीत गाढल्यास भात उत्पादनांत ६ ते १० टक्क्यांनी वाढ़ होते.
  3. महाराष्ट्रात संकरित भाताखाली १० ते २० टक्के क्षेत्र येणे / लावणे आवश्यक आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही, कारण सुधारित जातीपेक्षा संकरित वाण १५ ते २० टक्के अधिक उत्पादन तेवढ्याच खर्चात देतात. यासाठी उत्तम उदाहरण म्हणून चिन, इंडोनेशिया, व्हिएतनाम, म्यानमार, फिलीपाइन्स, बांग्लादेश या देशांचे अनुकरण करणे राज्याला अत्यंत गरजेचे आहे.
  4. भात उत्पादन जर फायदेशीर व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील दोन मार्ग आहेत.

अ) निर्यातक्षम तांदळाच्या जाती लावणे. यामध्ये मध्यम बारीक तांदुळ, उदा. बीपीटी -५२o४, घनसाळ, कोलम प्रकारातील बुटक्या जातींचा समावेश आहे.

ब) अतिलांब तांदुळ बासमती प्रकार उदा. पुरा बासमती, सुगंदा ३ व ५, पूसा - ११२१ इत्यादी प्रकारच्या जातींना पलर राईस मिल असणे आवश्यक आहे. भात लागवडीसाठी नविन पध्दतींचा वापर करावा. उदा. चारसूत्री पध्दत, कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या भात लागवड पध्दती इत्यादी.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate