অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उस : संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

उस : संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

उस महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. कटिबंधीय हवामानामध्ये येत असल्यामुळे येथील हवामान उसासाठी अत्यंत पोषक असले तरी उसाच्या दर हेक्टरी उत्पादनात तमिळनाडू भारतात आघाडीवर आहे. साखर उद्योग हा कापड उद्योगानंतर शेतीश्धंद्यावर आधारलेला सर्वात मोठा दुस-या क्रमांकाचा उद्योग आहे. महाराष्ट्रातील ऊस शेती व त्यावर आधारित साखर कारखानदारी ही ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, तसेच राजकीय विकासाची प्रतीक ठरलेली आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी भक्रम पायावर उभी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी स्थिरावली आहे. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील साखर उद्योग हा उत्तम नियोजनाचा व प्रभावी कार्याचा आदर्श ठरू लागला. गेल्या अर्धशतकात महाराष्ट्रात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन, साखर कारखाने व सभासद संख्या यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारींमुळे ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः तरुणांना रॉजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा होऊन ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांना शिक्षणाची फार मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ऊस पिकाची सध्यस्थिती

एकेकाळी साखर आयात करणारा आपला देश साखरेची निर्यात करू लागला. महाराष्ट्रात आजअखेर १६५ साखर कारखान्यांची नोंदणी झालेली असून १८ खाजगी कारखान्यांसह १४७ सहकारी साखर कारखाने कार्यान्वित अवस्थेत आहेत. महाराष्ट्रातील कोकण विभागातही साखर कारखाने उभारले जात आहेत.

भारतातील उसाखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी फक्त १८ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा साखर उत्पादनातील वाद्य ३५ टक्के आहे. २g१४-१५ वर्षाच्या गळीत हंगामाचा विंचार करता असे दिसून येते की, उसाचे क्षेत्र १०.५५ लाख हेक्टरपर्यंत वाढले. उसाची उत्पादकता हेक्ट्री ८८ टनांच्या आसपास येऊन ठेपली तर साखर ऊतारा देखील ११.३g टक्के इतका होता.

राज्याचे साखर उत्पादन देखील १g५.१४ लाख टन झाले. राज्याने साखर उत्पादनात जरी भरीव कामगिरी केलेली असली तरी उसाची उत्पादकता (टन/हेक्टर) व साखर ऊतारा यामध्ये वाढ करण्यास भरपूर वाव आहे. १९५५ सालापासून विचार केल्यास महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्रामध्ये जवळ जवळ १g पटींनी वाढ झाली असून त्याप्रमाणात उत्पादकता वाढलेली दिसून येत नाही.

महाराष्ट्राची ऊस उत्पादकता व साखर उतारा न वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी हगामनिहाय ऊस लागवडीखालील क्षेत्र व पकतेनुसार ऊस जातीच्या तोडणीचा अभाव, हंगामनिहाय उसाच्या सुधारित जातींची निवड व त्यांच्या लागवडीचे अयोग्य नियोजन, शुद्ध व निरोगी ऊस बेणे पुरवठा होण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळ्याचा अभाव, पाण्याचे अयोग्य नियोजन,

तक्ता : महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र , उस उत्पादन , उत्पादकता, साखर उत्पादन व साखर उतारा

अ.क्र. वर्ष क्षेत्र (लाख हेक्टर ) उत्पादकता (टन/हे.) उस उत्पादन (लाख टन) साखर उत्पादन (लाख टन) सरासरी साखर उतारा (टक्केवारी)
१९५०-५१ ०.७५ ६६.८० ५०.०० १.२३ ११.६२
१९६०-६१ १.५५ ७८.०० १२१.०० ३.९८ ११.६५
१९७०-७१ २.१७ ६८.१० १४८.०० १०.५५ ११.२५
१९८०-८१ २.५६ ९२.२० २३६.०० २०.८५ ११.०६
१९९०-९१ ५.१८ ८६.५० ४४२.६० ४१.१९ १०.७६
२०००-०१ ५.७८ ७८.१० ४५१.४० ५६.१३ ११.६०
२०१०-११ ७.५६ ८३.०० ६४१.५९ ७०.६६ ११.५४
२०११-१२ १०.४३ ७७.०० ७७०.०० ८९.५६ ११.५४
२०१२-१३ ८.०० ८७.५० ७००.०० ७९.५० ११.४०

 

१०

२०१३-१४ १०.२२ ८२.०० ८८६.३७ ७७.२० ११.४१
११ २०१४-१५ १०.५५ ८.०० ९३०.४१ १०५.१४ ११.३०

रासायनिक खतांचा असंतुलित वापर, योग्य पिकाच्या फेरपालटीचा अभाव, अयोग्य आंतरपीक पद्धती, एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापनाचा अभाव, तण नियंत्रणाबाबत अयोग्य नियोजन, खोड़वा पिकाचे अयोग्य व्यवस्थापन, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, बदलते हवामान, वाढते उष्णतामान/ तापमान, रोग किडींचा वाढता प्रादुर्भाव इ. समावेश होतो.

महाराष्ट्रात शेतीसाठी उपलब्ध होणा-या पाण्याच्या कमतरतेमुळे उसाखालील क्षेत्र वाढविण्यास मर्यादा पडतात. राज्यातील शेतक-यांमध्ये ऊस उत्पादन व साखर उतारा वाढविण्याची क्षमता आहे. उसाखालील क्षेत्र न वाढविता आधुनिक तंत्राचा अवलंब केला तर अपेक्षित ऊस उत्पादन (१oo टन/ एकर) आणि साखर उतारा (११.५० टक्के ) यांचे उद्दिष्ट आपण गाठू शकतो. अलिकडील दोन वर्षातील कमी पाऊसमानामुळे ऊस उत्पादक शेतकरी फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. या वर्षी (२०१५-१६) उसाच्या क्षेत्रामध्ये घट होणार आहे. त्यामुळे साखर उद्योग काही प्रमाणात अडचणीत सापडलेला दिसतो. त्यासाठी पुढील काळात उसाची शेती व साखर उद्योग वाचवण्यासाठी नियोजनपूर्वक सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील ऊस संशोधनाचा मागोवा

महाराष्ट्रातील ऊस संशोधनाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये उसाच्या संशोधनासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था, पुणे ही दोन प्रमुख संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. महाराष्ट्रासाठी आजपर्यंत उसाचे १५ वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या १oo च्या वर शिफारशी प्रसारित झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उसाचे सुधरित अधिक उत्पादन देणारे फुले- २६५, की ८६०३२ कोसी- ६७१, कोएम- ९४o१२, कोव्हीएसआय- ९८o५, व्हीएसआय- ४३४ आणि पूर्वप्रसारित ऊस वाण एमएस- १ooo१, व्हीएसआय- ३१०२ यांचा समावेश होतो.

ऊस उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी संशोधन केंद्रांनी शिफारशीत केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. उसाची शेती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी उसाच्या लागवडीवरील खर्च कमी करणे, हंगामनिहाय ऊस लागण व तोडणीचे नियोजन, त्रिस्तरीय बेणे निर्मिती याबाबी अपरिहार्य ठरणार आहेत. शेती व्यवस्थापनात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पाण्याचा अमर्याद वापर टाळून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, पिकांची फेरपालट, एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा, पाचटाचा पुनर्वापर, हिरवळीची खते व रासायनिक खतासोबत सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, सुधारित पद्धतीने खोडवा पिकाचे व्यवस्थापन आणि उसासाठी सुधारित अवजारांचा वापर या गोष्टींचा कटाक्षाने अवलंब करावा लागणार आहे.

राज्यातील काही भागामध्ये तुरळक प्रमाणात जरी लोकरी मावा दिसून दिसून येते. सध्या दक्षिण- पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हुमणीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यासाठी सुत्रकृर्मिचा आणि मेटारायझमचा वापर प्रभावी ठरत आहे. केंद्रशासनाचे धोरणही साखर उद्योगाला दिलासा देणारे असेच आहे. त्यामुळे येणा-या कालावधीत उसाची शेती व साखर उद्योगाचा भविष्यकाळ चांगला राहील असे वाटते.

यापुढील काळात जागतिक बाजारपेठेशी सामना करण्यासाठी ऊस शेती व साखर उद्योग यात नियोजनबद्ध आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांनीसुद्धा त्यांच्या नियोजनात जाणीवपूर्वक बदल करणे आवश्यक ऊस कमीतकमी क्षेत्रात व कमीतकमी पाण्यात आपल्याच कार्यक्षेत्रात कसा तयार होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यास लागणारा वाहतुकीवरील अतिरिक्त खर्च टाळता येईल व बाहेरील कमी उतारा असलेला अपरिपक्र ऊस गाळप करण्याची वेळ येणार नाही. या गोष्टी साध्य करण्यासाठी कारखान्याने आपला शेती विभाग मजबुत करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यातील व्यवस्थापनाचे शेती विभागाकडे फारसे लक्ष नसते, असे दिसून येते. खरे पाहता शेती विभाग हे कारखान्यांचे फार महत्वाचे अंग आहे. म्हणून प्रत्येक कारखान्याने आपल्या शेती विभागाच्या विकासाकडे देखील पूर्ण लक्ष केंद्रित करावे. साखर कारखानास्तरावर साखरेवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व साखरेची प्रत सुधारण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करणे व संगणकीकरण करणे या गोष्टी काळाची गरज ठरणार आहेत.

साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडून ऊस उत्पादन व साखर प्रक्रिया यांच्याशी निगडीत सर्व घटकांचा सातत्याने विचार करून त्याचे योग्य नियोजन करून अमलात आणल्यास भविष्यातील स्पर्धेच्या काळात देखील आपली उसाची शेती व साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील, असा विश्वास वाटतो.

भविष्यातील ऊस शेती व साखर उद्योगासमोरील आव्हाने व उपाययोजना

उसाखालील क्षेत्र आणि उत्पादनातील चढउतार

उसाखालील क्षेत्र व उत्पादनात स्थिरता येण्यासाठी तसेच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. उपपदार्थ निर्मितीत इथेनॉलच्या उत्पादनासाठी मका तसेच गोड ज्वारी यांची कारखाना कार्यक्षेत्रात लागवड वाढवल्यास इथेनॉल निर्मिती प्रकल्प वर्षातील बराच काळ चालू ठेवता येतील. इथेनॉल प्रमाणेच सहवीज निर्मिती प्रकल्प, स्पेंटबॉश पासून जैविक कंपोस्ट खत प्रकल्प यासारखे प्रकल्प उभारता येतील. त्यामुळे ऊस पिकापासून मिळणा-या एकूण उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शेतक-यांना योग्य भाव मिळेल आणि उसाखालील क्षेत्रात व उत्पादकतेमध्ये स्थिरता येऊ शकेल.

यांत्रिकीकरणाचा अभाव

महाराष्ट्रातील ऊस शेती ही प्रामुख्याने बैल आणि मनुष्यबळावरच अवलंबून आहे. उसातील लागवडीपासून काढणीपर्यंत मनुष्यबळावरच अवलंबून रहावे लागते.

महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र लहान लहान तुकड्यांमध्ये विखुरलेले असल्याने कामासाठी छोटी अवजारे विकसित करणे गरजेचे आहे. उसामध्ये लागवडीपासून तोडणीपर्यंत यांत्रिकीकरण सहज शक्य आहे, यामुळे उत्पादन खर्चातही बचत होईल.

हवामान बदलाचा ऊस शेतीवर विपरीत परिणाम

महाराष्ट्राचा आर्थिक कणा म्हणून ओळख असलेला साखर उद्योग आणि ऊसशेती कधी दुष्काळाच्या तर कधी अतिवृष्टीने आणि अवकाळी पावसाने होणा-या नुकसानीच्या दुष्टचक्रात अडकत चालली आहे. जागतिक पातळीवर वाढते तापमान आणि बदलते हवामान यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या हवामानानुसार लवकर पक्र होणा-या, अजैविक व जैविक ताण सहन करणा-या, अधिक ऊस व साखर उत्पादन देणा-या ऊस वाणांची निर्मिती करणे, तुरा न येणा-या व साखर उता-यात घट न येणा-या ऊस वाणांची निर्मिती करणे आणि ऊस वाण निर्मितीसाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन भविष्यातील ऊस संशोधनाची दिशा ठरविणे गरजेचे आहे.

ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर

महाराष्ट्रातील संशोधन केंद्रांनी ऊस पिकाविषयी बहुमोल असे संशोधन केले आहे. या संशोधनावर आधारित हंगामनिहाय ऊस लागण व तोडणीचे नियोजन, त्रिस्तरीय बेणे करणे याबाबी अपरिहार्य ठरणार आहेत. शेती व्यवस्थापनात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पाण्याचा अमर्याद वापर टाळून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, पिकांची फेरपालट, एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा,पाचटाचा पुनर्वापर, हिरवळीची खते व रासायनिक खतासोबत सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, सुधारित पद्धतीने खोडवा पिकाचे व्यवस्थापन आणि उसासाठी सुधारित अवजारांचा वापर या विषयी अनेक महत्वाच्या शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. याच तंत्रज्ञानाचा वापर करून काही शेतकरी उसाचे एकरी १oo ते १२५ टन उत्पादन घेत आहेत. तरीदेखील उसाचे अपेक्षित उत्पादन आणि राज्याची सरासरी उत्पादकता यामध्ये फारच तफावत आहे. उसाच्या उत्पादनातील ही तफावत दूर झाल्यास साखर कारखान्यांचे व्यवस्थापन आणि शासनावर उसाला अधिक भाव देण्याविषयीचा दबाव कमी करता येईल.

विस्तार व प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे

महाराष्ट्रातील शेतक-यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी ऊस पिकाचे विस्तारकार्य अधिक क्रियाशील करणे गरजेचे आहे. विस्तार कार्यात नवीन तंत्रज्ञानाचा फक्त प्रचार करून उत्पादकता वाढणार नाही तर त्यास योग्य त्या निविष्ठांची आणि प्रात्यक्षिकांची जोड असणे आवश्यक आहे. यासाठी साखर कारखान्याकडील ऊस विकास विभागात काम करणा-या सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे प्रत्येक साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून ऊस उत्पादन व साखर प्रक्रिया यांच्याशी निगडीत सर्व घटकांचा सातत्याने विचार करून त्यांचे योग्य नियोजन करुन अमलात आणल्यास भविष्यातील स्पर्धेच्या काळात देखील आपली उसाची शेती व साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील, असा विश्वास वाटतो.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate