लागवडीनंतर पहिल्या 21 दिवसांमध्ये पोंगे वाळण्याचे प्रमाण दिसून आल्यास ते खोडमाशीमुळे होत असते. खोडमाशी या किडीची अळी लहान रोपांच्या पोंग्यांत शिरून आतील भाग पोखरते, त्यामुळे शेंडा वाळतो, त्यास पोंगा मर म्हणतात. आपल्या शेतात या किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असून, चार टक्के निंबोळी अर्क किंवा 2.8 टक्के डेल्टामेथ्रीन 100 मि.लि. 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी धसकटे व सड इ. वेचून शेत स्वच्छ करावे.
2) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दहा ग्रॅम या प्रमाणात पाच टक्के कार्बोसल्फानची बीजप्रक्रिया करावी.
3) योग्य वेळी पेरणी करण्याकडे लक्ष द्यावे. सोलापूर भागासाठी ज्वारीच्या पेरणीचा कालावधी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर असा असावा, त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.
4) मेलेली रोपे काढून नष्ट करावीत.
5) पेरणीनंतर आठ दिवसांत चार टक्के निंबोळी अर्क किंवा 2.8 टक्के डेल्ट्रामेथ्रीन 100 मि.लि. 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
ज्वारीच्या पिकामध्ये लागवडीनंतर 21 दिवसांनंतर पोंगे वाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येत असेल, तर तो खोडअळीचा प्रादुर्भाव असतो. खोडअळी पोंग्यातील कोवळी पाने खाऊन खोडात शिरते आणि वाढणारा शेंडा मारते. पीक मोठे झाल्यावर अनेक अळ्या ताटात दिसतात. कणसे मोडून पडतात.
प्रल्हाद बळी राजगुरू, माढा, जि. सोलापूर
अधिक माहितीसाठी
डॉ. दिलीप कठमाळे - 9405267061
(लेखक - विभागीय संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे ...
सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्...
ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा दे...
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण...