भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सोयाबीनपासून लोणी निर्मितीच्या तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे व्यावसायिक हस्तांतरण नुकतेच करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे सोयाबीनपासून उच्च दर्जाची प्रथिने मिळविणे शक्य होते.
सोयाबीन प्रक्रिया उद्योगामध्ये सोया दूध आणि त्यापासूनच्या विविध पदार्थांचा समावेश होतो. गायीपासून मिळणाऱ्या दूधाच्या तुलनेमध्ये सोयाबीनपासूनचे दूध हे अधिक स्वस्त पडते. परिणामी मुलांच्या आहारामध्ये या दूधाचा समावेश केल्यास प्रथिनांची पूर्तता होऊ शकते. या उद्देशाने सोयाबीनपासून लोणी तयार करण्याचे तंत्रज्ञान भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेमध्ये विकसित करण्यात आले आहे. या संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्याचा परवाना भोपाळ येथील बायो न्युट्रीयंट्स (इंडीया) प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असून, व्यावसायिक उत्पादनासाठी लवकरच प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राजगुरुनगर येथील कांदा, लसूण संशोधन संचालनालय येथे पांढऱ्या कांद्याची नवी जात "एनआरसीडब्लूओ-3' (भिमा सफेद) विकसित व प्रसारीत केली आहे. ही जात महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओरीसा, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यामध्ये खरीपात लगवड योग्य असेल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबत...
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...