घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कन्टेडर या जाती निवडाव्यात. लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना 60 x 30 सें.मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना 45 x 30 सें.मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास 15 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. लागवडीपूर्वी पिकाला 25 किलो नत्र, 110 किलो स्फुरद आणि 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 25 किलो नत्र प्रति हेक्टरी देऊन भर लावावी. साधारणपणे 110 दिवसांत पीक तयार होते.
संपर्क -
02426- 243242
अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
--------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...