बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे टोमॅटोमध्ये पॉलिथिन आच्छादनासंदर्भात प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. यासाठी चार फूट रुंदीचे व 30 मायक्रॉन जाडीचे चंदेरी काळ्या रंगाचे आच्छादन पेपर वापरण्यात आला. जमिनीच्या योग्य मशागतीनंतर शिफारशीत खतमात्रेचा वापर करून गादीवाफे तयार करावेत. यासाठी दोन गादीवाफ्यातील मध्यापर्यंतचे अंतर पाच फूट ठेवावे. म्हणजेच ठिबकची लॅटरल पाच फुटांवर येते. गादीवाफ्याची वरील रुंदी दोन फूट ठेवावी. वाफ्याची खालची रुंदी अडीच फूट, तर उंची अर्धा फूट ठेवावी. मध्यम ते भारी जमिनीत गादी वाफ्यावर एक ओळ पद्धतीने लागवड करताना रोपातील अंतर दीड फूट ठेवावे.
रोपे सीडलिंग ट्रेमध्ये तयार करावीत. गादी वाफ्यावर दोन ओळींत लागवड करताना दोन रोपांतील अंतर अडीच फूट ठेवावे. लागवड झिगझॅग पद्धतीने करावी. ही पद्धत खरीप आणि रब्बीसाठी उपयुक्त आहे. उन्हाळी हंगामातील लागवड 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. या पद्धतीमुळे तणांचे नियंत्रण होते, दिलेली खते पूर्णपणे पिकाला मिळाली. विद्राव्य खतांचा वापर केल्याने पिकाला योग्य कालावधीत खते मिळतात. मजुरांची बचत होते. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे जिवाणूंची चांगली वाढ होते. आच्छादनामुळे फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते. रोग व किडींचे चांगले नियंत्रण मिळते.
- बाळासो मोटे (कनिष्ठ संशोधन सहायक)
संपर्क - 02112-255227,
कृषी विज्ञान केंद्र, बारामती
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्य...
सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी (ता. कराड) येथील आनंदर...
जालना जिल्ह्यात बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील सुम...
वांजुलशेत, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील गावात...