टोमॅटो पिकाबद्दल माहिती घ्यायची म्हटले तर, पूर्वी आमच्याकडे हे पीक घेतले जात नव्हते. त्यामुळे त्यांची लागवड कधी करायची याची कल्पना आम्हाला नव्हती. परंतु , टोमॅटो पिकापासून आपणाला पैसा मिळवून देण्याचे ते एक साधन आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांचा अनुभव काय आहे. त्यावरून, आसपासच्या लोकांच्या मार्गदर्शनातून आम्ही पण हे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
ह्या पिकाची आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला भरपूर अडचणी आल्या. टोमॅटो लावण्याच्या अगोदर शेताची जी मशागत करावी लागते. तिचा आम्हाला अनुभव आला कि शेताची पूर्ण नांगरणी करून शेत जमीन हि भुसभुशीत करावी लागते व तिच्यामध्ये जे तण आहेत ते पण निंदनी करतो त्याप्रमाणे काढून टाकावे लागतात. जमिनीची मशागत झाल्यावर नांगरणी ने सरी पडून योग्य प्रकारे बांधणी करून मग सरीमध्ये पाणी सोडून टोमॅटो हे पीक लावले जाते. टोमॅटो पीक लावल्यानंतर दोन- तीन दिवसाने पाणी द्यावे लागते. लगेच लागवड झाल्यानंतर आठ – दहा दिवसांनी खत टाकावे लागते. त्यामध्ये आमच्याकडे शेणखत, सुफला हे खते वापरून पिके घेतात. तसेच, टोमॅटो ह्या पिकांची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावे लागते. कीड लागू नये म्हणून औषध फवारणी करावी लागते. औषध फवारणी झाल्यावर झाड जेव्हा मोठे होते तेव्हा त्या झाडाची बांधणी करावी लागते. बांधणी झाल्यावर टोमाटोला पाणी देणे , त्या सरीमध्ये असलेले तण काढणे, औषध फवारणी करणे इत्यादी कामे करावी लागतात. टोमॅटो हे पीक अवे आहे कि त्याची बाजारात पोहचे पर्यंत काळजी घ्यावी लागते. तेव्हाच त्याच्यातून उत्पन्न मिळते.
माहिती दाता : वाळेकर भीमा श्रावण (वांजूळशेत)
अंतिम सुधारित : 5/23/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...