भारत सरकार ग्राहक आणि व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट सिस्टीमचा वापर अधिकाधिक करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आणि जास्तीत जास्त लोक डिजिटल पेमेंट सिस्टीम कडे आकर्षिले जावेत याकरिता ग्राहकांसाठी “भाग्यवान ग्राहक योजना” आणि व्यापाऱ्यांसाठी “डिजी-धन-व्यापारी योजना” अशा दोन योजना जाहीर केल्या आहेत.
“भाग्यवान ग्राहक योजना” आणि “डिजी-धन-व्यापारी योजना” याद्वारे वैयक्तिक खर्चासाठी डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्याला रोख बक्षीस दिलं जाणार आहे. डिजीटल व्यवहाराच्या क्षेत्रात गरीब, मध्यमवर्ग आणि लहान व्यापाऱ्यांना आणण्याच्या दृष्टीने या योजना आखण्यात आल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत या योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
हि योजना 25 डिसेंबर, 2016 ते 14 एप्रिल 2017 पर्यंत कार्यरत राहील. या योजनेसाठीचा अंदाजित खर्च 340 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे
या योजनेत दोन प्रमुख घटकांचा समावेश आहे एक म्हणजे ग्राहक आणि दुसरा व्यापारी
विजेते निकषास पात्र असणार्या व्यवहारच्या आयडीद्वारे (जो डिजिटल व्यवहार केल्यानंतर आपोआप लगेच सोफ्टवेअर विशेषतः या उद्देशाने एनपिसीआय द्वारे विकसित केले आहे त्याद्वारे जनरेट होत असतो असा आयडी ) विनाक्र्म (रँडम) अनिर्णीतमाध्यमा (ड्रॉ) द्वारे काढले जातील. भाग्यवान विजेत्यांना त्यांच्या बँकेद्वारे एक मेसेज येईल आणि बक्षिसाची रक्कम पुढच्या २४ तासात त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. नागरिक www.digidhanlucky.mygov.in वर लॉगीन करून आपल्याला बक्षीस मिळाले कि नाही ते तपासू शकतात.
या कार्यक्रमाचा ड्रॉ भारतभरातील १०० वेगवेगळ्या शहरामध्ये आयोजित केला जाईल. याच शहरातील कार्यक्रमामध्ये डिजी-धन मेळा सुद्धा आयोजित केला जाईल.
डिजिटल पेमेंट सिस्टीम मधील भागधारक जसे बँक, वॉलेट, टेलेकोम सर्व्हिस प्रोव्हायडर, इतर फायनानसियल सर्व्हिस प्रोव्हायडर, UIDAI या डिजीधन मेळ्यात नागरिक आणि व्यापारी या दोघांनाही सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे वेगवेगळ्या डिजिटल पेमेंटच्या सुविधांची माहिती होईल आणि डिजिटल पेमेंटचा वापर विस्तृत प्रमाणात होण्यासाठी याची मदत होईल.
स्त्रोत नीती आयोग
अंतिम सुधारित : 8/8/2023
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...