राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी इझ ऑफ डुइंग बिझनेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागांच्या परवान्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे. त्यामुळेच उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्यासाठी ‘मैत्री कक्ष’ सक्षम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आला.
राज्यात उद्योग स्थापन करण्याकरिता सर्व ना हरकती / परवाने / मंजुऱ्या एकाच ठिकाणी उद्योगजकांना तातडीने व सुलभरीत्या प्राप्त होण्याकरिता एक खिडकी योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याकरिता मैत्री कक्ष सक्षम करण्यात येत आहे.
शासन निर्णय :- क्रमांक मेइम 2015/ प्र.क्र. 105/ उद्योग-8, दिनांक ११ फेब्रुवारी २०१६
’मैत्री कक्षा’तर्फे एक खिडकी योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या विविध परवाना अथवा ना हरकती सेवासंबंधित विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३ अंतर्गत अधिसूचित करण्यात येतील व त्या सेवा विहित कालावधीत देणे संबंधित मूळ विभागास आवश्यक राहील. विभागाने या सेवा विहित कालावधीत न दिल्यास प्रथम व द्वितीय अपिलाचे अधिकार एक खिडकी योजना-मैत्री कक्षास राहतील.
खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पांच्या अंमलबजावणी दरम्यानचा प्रवास अधिक सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी मैत्री कक्षावर सोपविण्यात आली आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संदर्भ : मैत्री महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/29/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...