सवतखेडा हे जामनेर तालुक्यातलं गाव. तसं ते इतर सामान्य गावांप्रमाणेच आहे. पण या गावाने एक असामान्य कामगिरी करुन इतर प्रगत गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या 1367 लोकसंख्या असलेल्या या गावाने डिजीटल क्रांतीत आघाडी घेतली असून आता हे गाव आपले सर्व आर्थिक व्यवहार हे ई-पेमेंट पद्धतीने करुन ‘कॅशलेस’ होत आहे.
सवतखेडा या गावातल्या लोकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले दैनंदिन आर्थिक व्यवहारांसह अन्य सर्व आर्थिक देवाणघेवाण आता डिजीटल पद्धतीने करण्याचे ठरविले आहे. गावातील प्रत्येक कुटूंबप्रमुखाचे बॅंकेत खाते आहे. याशिवाय गावातील सर्व खातेधारकांसह बहुतांश जणांकडे एटीएम, डेबीट, क्रेडीट कार्ड या ई- पेमेंटसाठी आवश्यक असणारी ‘प्लास्टीक चलने’ आहेत. तसेच गावातील सर्व जणांची आधार नोंदणी झाली असून सर्वांकडे आधारकार्ड व क्रमांक आहेत.
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर चलनातील मोठ्या नोटा बंद झाल्या. रोखीने होणाऱ्या व्यवहारासाठी अडचणी निर्माण होत असल्याचा तक्रारीचा सूर न लावता या गावकऱ्यांनी लगेचच परिवर्तनाचे ‘डिजीटल पाऊल’ उचलले. गावातील दुकानदारांनी आपल्या दुकानावर स्वाईप मशिन्स बसवून घेतले. तर काहींनी बारकोड पद्धतीने ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला. सध्या गावातील दुकानदारांकडे ई-पेमेंटने देयके अदा करण्याची सुविधा असल्याने गावकरी मोठ्या थाटात जाऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत आहेत. या गावकऱ्यांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनेट सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ब्रॉडबॅण्ड सुविधेमार्फतही इंटरनेटचा वापर हे गावकरी करतात. विशेष म्हणजे येथील वयोवृद्धही या ई-व्यवहारात आवर्जून सहभागी होतात. या गावात गेल्यावर पंतप्रधानांचे डिजीटल इंडियाचे स्वप्न साकारत आहे याचा विश्वास पटतो.
लेखक - मिलिंद दुसाने
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 4/28/2020
माहिती तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने एकेकाळी क्ली...