অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तामिळनाडुमधील ई-शासन

तामिळनाडुमधील ई-शासन

तक्रार निवारण

  • तक्रार अर्ज ऑनलाइन भरणे
  • जिल्‍हेवार अर्ज सादर करण्‍याची सुविधा
  • विभाग निवडल्‍यानंतर केल्‍यानंतर अर्ज सादर करता येतो
  • तुमचा तक्रार अर्ज पाठविण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    मद्रास उच्‍च न्‍यायालयाची खटल्‍यांची यादी/कॉज लिस्‍ट

    • मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या मदुरई खंडपीठाची व मद्रास उच्‍च न्‍यायालयाची दैनंदिन, साप्‍ताहिक व मासिक खटल्‍यांची यादी

    खटल्‍यांची यादी जाणून घेण्‍यासाठी येथे क्लिक करा

    ऑनलाइन मतदारयादी

    • उपलब्‍ध असलेल्‍या ऑनलाइन मतदारयादी त तुमचे नाव शोधा
    • जिल्‍हा व मतदार संघ निवडून करून नाव शोधता येते

    निवडणूक मतदारयादी त तुमचे नाव शोधण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    ऑनलाइन नागरिक सनद

    • तामिळनाडु सरकारच्‍या विभागवार नागरिक सनद
    • नागरिक सनद इंग्रजी व तामिळमध्‍ये उपलब्‍ध आहेत

    नागरिक सनदी वाचण्‍यासाठी किंवा डाउनलोड करण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    विद्युत शुल्‍कदर गणनयंत्र/इलेक्ट्रिसिटी टॅरिफ कॅलक्‍युलेटर

    • तुमच्‍या विजेच्‍या बिलाचा हिशेब ऑनलाइन करा

    तुमच्‍या विजेच्‍या बिलाचा हिशेब करण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    तुमची विद्युतसंबंधी तक्रार तामिळनाडु विद्युत महामंडळाकडे नोंदविण्‍यासाठी येथे क्लिक करा

    निविदा सुचना

    • तामिळनाडु सरकार विभागवार निविदा सुचना
    • निविदा सुचना पीडीएफ स्वरुपामध्‍ये व इंग्रजी भाषेत उपलब्‍ध आहेत

    नवीन निविदा सुचना पाहण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    वेबसाइट डिरेक्‍टरी

    • विवि‍ध विभाग, संस्‍था व मंडळांची वेबसाइट डिरेक्‍टरी
    • डिरेक्‍टरी चे वर्गीकरण तामिळनाडु सरकारचे विभाग, उपक्रम/महामंडळे, कायदा मंडळे, तामिळनाडुतील जिल्‍हे, नगरपालिका आणि शैक्षणिक संस्‍था यांच्‍यानुसार करण्‍यात आले आहे

    डीरेक्‍टरीपर्यंत पोच मिळविण्‍यासाठी  येथे क्लिक करा

    रजिस्ट्रेशन नेटवर्क (रेजिनेट)

    रजिस्ट्रेशन नेटवर्क (रेजिनेट)

    रेजिनेट हे सूचना प्रौद्योगिकी व संचार तंत्रज्ञानाची शक्ती वाढवून एक समर्पित नेटवर्कची (जाळे) स्थापना करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे. या नेटवर्कच्या जोडणीचा परिणाम म्हणून एक संचार उपकरणाद्वारे, या सर्व कार्यालयांमधून उपलब्ध असलेले विवरण विभाजन करण्या योग्य होते आणि कोणत्या ही संपत्तीच्या ईसी बाबत इतर ठिकाणांहून माहिती मिळू शकते. यामुळे नोंदणी करविणा-यास जवळच्या सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन सेवा प्राप्त करणे शक्य होते. अशा प्रकारे काम करणारी तीन केंद्रे आहेत, उदा. चेन्नई, एरोड आणि ट्यूटीकोरिन.

    ई.सी.साठी अर्ज ऑन लाइन जमा करणे
    एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट (ई.सी.) दाखला ऑनलाइन जमा करण्याची सोय देखील अलिकडेच चालू करण्यात आलेली आहे. अर्जदाराने दिलेली माहिती सेवा केंद्राकडे पाठविण्यात येते आणि एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट तयार ठेवण्यात येते. अर्जदार आवश्यक असलेली फी भरून स्वत: प्रत्यक्ष जाऊन किंवा फी आणि कोरियर सेवेचे डिलिव्हरी शुल्क भरून हे सर्टिफिकेट मिळवू शकतो. नोंदविलेल्या सोसायटयांची आणि त्यांची स्थिति एका क्लिकच्या द्वारे मिळू शकते. लोकांना चिटबद्दल माहिती मिळू शकते की ज्या चिटमध्ये ते नांव घालू पहात आहेत ती नोंदवलेली आहे की नाही.
    एकमेव रेजिनेट केंद्र तुम्हाला सूचना प्रौद्यागिकी बाबत माहिती पुरविल, ज्यांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :

    • चेन्नईमधील कोणत्या ही मालमत्तेचे एनकम्ब्रन्स सर्टिफिकेटई.सी. दाखला, २० उप-नोंदणी कार्यालयांपैकी (सब-रजिस्ट्रार ऑफिस) कोठे ही मिळू शकेल;
    • चेन्नईमधील कोणत्या ही मालमत्तेचा मूल्यांकन दाखला मिळू शकेल;
    • मार्गदर्शक मूल्यांबाबत राज्यभरातील माहिती;
    • दस्तऐवजांच्या नकला आधीच स्कॅन करून मग दिल्या जातात;
    • नोंदणी अर्जदारांना, मध्यस्थाच्या मदतीविना लेखी करारनाम्याचाआणि नोंदणी दस्तऐवज, सोसायटीज्, फर्मस् आणि चिटच्या नमुना प्रपत्रांचा मसुदा तयार करण्यास मदत करणे.

    प्रकल्प ‘’स्टार’’ (सिम्प्लिफाइड एण्ड ट्रान्सपरन्ट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ रजिस्ट्रेशन) (नोंदणीची सुलभ व पारदर्शी व्यवस्था) ही नोंदणी विभागातील एक प्रगत आय.टी. सेवा आहे. संगणक संचालनाच्या वैशिष्टयांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

    • कॉम्पॅक्ट डिस्क वर स्कॅन व संग्रह करून - दस्तऐवज दफ्तरी ठेवणे
    • एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट देणे
    • आधीच स्कॅन केलेल्या दस्तऐवजांच्या नकला देणे
    • मालमत्ता मूल्यांकन विधान तयार करणे
    • लग्न/सोसायटी/फर्म/चिटचे निरीक्षण यांची नोंदणी

    वेबसाइट वर मार्गदर्शन मूल्ये -  http://www.tnreginet.net

    सेवा पातळ्या

    प्रगत सेवा पातळ्यांचे संक्षिप्त स्पष्टीकरण खाली दिलेले आहे:

    गतिविधि कम्प्युटरायझेशनच्या आधी कम्प्युटरायझेशनच्या नंतर
    ई.सी. देणे (सामान्य) ८ दिवस ५ मिनिटे
    ई.सी. देणे (आपात्कालीन) १ दिवस ५ मिनिटे
    मालमत्ता मूल्यांकन ३० मिनिटे ५ मिनिटे
    मार्गदर्शन मूल्य - वेबसाइट वर
    सर्टिफाइड नकला ४ दिवस ५ मिनिटे
    नोंदणी ४ दिवस ६० मिनिटे
    लग्नाचा दाखला देणे १ दिवस १५ मिनिटे

    निवडक वेब-साइट: http://www.tnreginet.net/igregn/webAppln/index.asp#

    नोंदणी प्रक्रियेत पारदर्शितेच्या खात्रीसाठी ह्या वेबसाइटची सुरूवात करण्यात आली आहे. विशेषत: सर्व क्षेत्रांसाठी उपलब्ध असलेल्या मार्गदर्शन मूल्यांच्या पोस्टिंगबाबत नोंदणी विभागाच्या अधिका-यांच्या मध्यस्थी किंवा मदतीशिवाय मार्गदर्शन मूल्यांची माहिती सर्वसाधारण लोकांना कोठे ही व कोणत्या ही वेळी मिळू शकते. सध्या ही सरकारच्या उच्च वाहतूक (ट्रॅफिक) वेबसाइट मधील सर्वांत महत्वपूर्ण मानली जाते.
    नोंदणी विभागाच्या सामान्य माहिती खेरीज, नोंदणी प्रक्रिया व लोकोपयोगी फॉर्मच्या डाउनलोडचे विवरण देखील उपलब्ध आहे. नोंदणीसाठी अर्ज करतांना, वेबसाइट वर करारनाम्याचा प्रमाणबध्द नमुना उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिये बद्दल माहिती मिळवून, स्वत: करारनामा लिहून मग नोंदणीसाठी दिला जाऊ शकतो. वेबसाइटसाठी एक विशिष्ट मेल सेवा पुरविण्यात आली आहे, ज्यायोगे लोकांना नोंदणी विभागाला संबोधित करण्यास व आपल्या तक्रारी दूर करण्यात मदत मिळते.

    स्त्रोत: http://www.tnreginet.net/english/star.asp

    रसी मायम्स्

    इंटरनेटच्या द्वारे सेवांची ग्रामीण पोहोच
    रसी मायम्स् ची सुरूवात लोकमत संग्रहासाठी एक संचार वाहिनी पुरविण्याच्या उद्देशासह करण्यात आली होती, ज्यामध्ये पंचायत कार्यालयांना परस्पर जोडून आणि उत्तम सेवांकरीता (उदा.: शेतीच्या क्षेत्रात) माहिती गोळा करण्यासाठी तसेच एक शिक्षण घटक मिळविण्याचा हेतू होता.
    रसी मायम्स् ही ई-गव्हर्नन्स करीता माहिती केंद्र व्यवस्था आणि उत्तम पध्दतींच्या प्रसारासाठी नोडल पॉइंट आहेत. ग्रामीण डाटाबेस, जिल्हा/विभाग पातळी विभाग, ऑनलाइन विनंती अर्ज करणे, एस.एच.जीं.चा (स्वयं सहाय्य समूह) डाटाबेस, ब्लॉक पातळीवरील कामाची प्रगती, खरेदी/विक्री डाटाबेस, पी.डी.एस. वाटणी, बाजार भाव, जमिनीच्या नोंदी इ. जिल्हा व्यवस्थापनाच्या एका टिकाऊ नमुन्याचा उपयोग करून, एक एनजीओ आणि उद्यमी/स्वयं सहाय्य समूह, जिल्हा पातळीवरून रासी नेटवर्कचा सांभाळ आणि संचालन करण्यासाठी विविध सेवा देण्यात येत आहेत. शेतीसाठी उत्तम सेवांवर सीडीज्, ज्या स्थानीय शेतक-यासाठी मदत ठरतील, या केंद्रांमध्ये मिळतात.

    रसी मायम्स् बाबत जास्त माहितीसाठी, कृपया  www.foodindia.org.in वर क्लिक करा.

    स्त्रोत:  http://www.ict4rd.net.in/projects1.aspx?cat_id=5&proj_id=114

    व्ही.आय. एस.पी.
    विडियाल इन्फरमेशन सर्व्हिस प्रोव्हायडर

    उद्देश :
    सध्या उपलब्ध असलेल्या ए.एस.ए.च्या मायक्रो फायनान्स नेटवर्कच्या माध्यमाने ग्रामीण तंत्रशास्त्रीय उद्यमींची निर्मिती करणे आणि आय.सी.टी. च्या उपयोगाच्या माध्यमाने ग्रामीण समुदायाच्या कमकुवत वर्गांना सशक्त करणे.
    वी.आय.एस.पी. केंद्रांनी आय.सी.टी. च्या वापराच्या माध्यमाने ग्रामीण लोकांना अनेक सेवा पुरविल्या आहेत. या सेवांमध्ये शेती उत्पादांच्या किंमती, जन्म कुंडल्यांबाबत माहिती, ग्रामीण बाजार, वैवाहिक सेवा, शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा, तक्रारी दूर करणे व सरकारी फार्म पुरविणे इ.चा समावेश आहे. उपयोगकर्त्यांना तिरूचिरापल्लीमधील तीन खाजगी इस्पितळांसाठी सुटचे कूपन पुरविले जाते. इतर सेवांमध्ये नेट-ते-फोन आणि आरंभिक संगणक शिक्षणाचा समावेश आहे. पहिल्या चरणांत वी.आय.एस.पी. तामिळनाडुच्या तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सामाजिक पर्यायांसाठी सुरू करण्यात आले होते.

    उत्पाद:
    ए.एस.आय. ग्राम विदियाल गरीब स्त्रियांच्या आर्थिक सशक्ति करणासाठी आर्थिक उत्पादांचे एक संयोजन प्रस्तुत करीत आहे. हे आनुषंगिक-मुक्त कर्ज उत्पाद सदस्यांना कर्जाची रक्कम प्रत्येक कर्ज चक्राबरोबर वाढवित, अनुक्रम पध्दतीने दिले जातील. ए.एस.ए.-जी.वी. आपल्या सदस्यांना खाजगी कंपन्यांच्या सहयोगाने, जीवन विमा देखील देतो.
    आर्थिक उत्पादांच्या जोडीला, ए.एस.ए.-जी.वी. पुष्कळसे क्रेडिट प्लस आणि क्रेडिट सेवांच्या पलिकडे जाऊन गरीबांच्या कल्याणाचे ध्येय राखून सेवा देत आहे. या सेवांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण व क्षमता निर्माण, अधिकार-आधारित लॉबिंग आणि ऍडव्होकेसी, व्यवसाय विकास सेवा इत्यादिंचा समावेश आहे.

    कर्ज उत्पाद

    सामान्य कर्ज- ए.एस.ए.-जी.वी. स्त्री उद्योगीनींना लहान रकमेची आनुषंगिक-मुक्त कर्जे देतात, ज्या गरीब कुटुंबाच्या आहेत आणि काम करण्यासाठी भांडवल व आरंभिक निवेश यांची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही कर्जे स्त्रियांच्या एका संगठित पांच सदस्यीय समूहाला देण्यात येतात, ज्यामध्ये बाकीच्या चार स्त्रिया कर्ज घेत असलेल्या सदस्याला जामीन म्हणून असतात. कर्जाच्या रकमेची परतफेड केंद्राच्या साप्ताहिक बैठकीत होते, जी ए.एस.ए.-जी.वी. चे क्षेत्रीय प्रबंधक घेतात.
    केंद्रिय सामूहिक चर्चा आणि ग्राहक संतुष्टि सर्वेक्षणानंतर हंगामी कर्ज उत्पाद प्रॅक्टिशनर लर्निंग प्रोग्राम (पी.एल.पी.) प्रकल्पाचा एक भाग म्हणून ए.एस.ए.-जी.वी. सदस्यांना महत्वपूर्ण सणांच्या दरम्यान (जसे दिवाळी, क्रिसमस, पोंगल इ.) आणि शाळेमध्ये त्यांच्या मुलांच्या दाखला आणि पुनर्दाखल्याच्या वेळी स्थानीय सावकारांपर्यंत जावे लागले.
    हंगामी कर्जाचे वाटप, ज्या सदस्यांचा परतफेडीचा इतिहास आणि केंद्राच्या बैठकींमध्ये उपस्थिति दर चांगला आहे त्यांना दिवाळी, क्रिसमस आणि पोंगलच्या दरम्यान त्यांना महत्वपूर्ण सणांसाठी आणि शाळेत दाखला मिळविण्यासाठी हंगामी कर्ज देणे चालू ठेवण्याची योजना आहे. या सेवेची जास्त माहिती घेण्यासाठी, कृपया क्लिक करा:  http://www.asadev.com/

    स्त्रोत: http://www.ict4rd.net.in/projects1.aspx?cat_id=5&proj_id=291

    ग्राम संसाधन केंद्र

    उद्देश: एकाच खिडकीतूनटेलि-औषधोपचार, टेलि-शिक्षण, रिमोट सेंसिंग ऑनलाइन निर्णय समर्थन, शेतकरी परस्पर परामर्श सेवा, ई-गव्हर्नन्स सेवा, हवामान सेवा आणि जल प्रबंधन कार्ये पुरविणे. हा आय.एस.आर.ओ.-एम.एस.एस.आर.एफ.वी.आर.सी. प्रकल्प आवश्यकता आधारित एकल खिडकी वाटप संस्था ग्रामीणांना सर्व प्रकारे मदत करण्यासाठी चालू करण्यासाठी प्रयास करत आहे. या सेवा वी.एस.ए.टी. (व्हेरी स्मॉल अपरचर टर्मिनल) आधारित नेटवर्क ज्याचा विस्तार इन्सँट-३ए उपग्रहाच्या सी-बँड ट्रान्सपॉन्डर पर्यंत करण्यात आलेला आहे आणि ज्याच्या एका टोकावरील उपयोगकर्ता दुस-या टोकावरील उपयोगकर्त्यांशी दृश्य आणि श्रवण द्वारे संभाषण करू शकतात. प्रत्येक केंद्राला २० संगणक दिलेले आहेत आणि टाटा टेलिसर्व्हिसेसने ध्वनि संचार, शिक्षण, आरोग्य, पोषण, हवामान, पर्यावरण, शेती आणि ग्रामीण लोकसंख्येला आव्हनांना तोंड देण्या करीता सशक्त करण्यासाठी जीविकोपार्जन पुरविण्यासाठी पी.सी.ओ. बूथ पुरविले आहेत. सध्या,१० ग्राम संसाधन केंद्रे आहेत : अन्नावासल, चेन्नई, चिदंबरम्, मानामेल्कुडी, नागापट्टिनम्, नागार्कोविल, सेमपट्टी, थंगाचिमादम्, थिरूवैयारू आणि वायनाड ही सर्व तामिळनाडुमध्ये व एक शेजारच्या पुडूचेरी राज्यामध्ये आहेत.
    स्त्रोत: http://www.ict4rd.net.in/projects1.aspx?cat_id=5&proj_id=351

    तामिळ नीलम्

    तामिळ नीलमची उद्दिष्ठये: सर्व संभावित नागरिक-केंद्रित ई-सेवा मुद्दे चित्ता ऍक्सट्रॅक्ट (अधिकारांची नोंद) /रजिस्टर ऍक्सट्रक्ट/आडंगल ऍक्सट्रक्ट ते नागरिकांच्या मास्टर डाटाबेसची रचना ज्यामध्ये प्लॉट प्रमाणे आणि स्वामित्वा प्रमाणे जमीन, पीक, महसूल इ.ची माहिती संग्रहित असेल अशा सर्व सेवा देणे.
    संगणकीय प्रणालीच्या द्वारे सामयिक अहवाल तयार करणे. जमिनीच्या   नोंदींचे सुधारित व दक्ष सेवा, सुलभ संगोपन व अद्ययावतन, पारदर्शक प्रशासन, कियॉस्क टच स्क्रीनच्या द्वारे लोकांना माहितीची उपलब्धता, http://www.tn.nic.in/tamilnilam/Kiosks.htm ) सब रजिस्ट्रार कार्यालय, शेती विभाग यांसारख्या इतर विभागांशी विवरणाची देवाण-घेवाण इत्यादि.
    टच स्क्रीन कियॉस्क : नागरिक निर्देशित सेवा (जी.२.सी.) देण्यासाठी. तामिळनाडुच्या महसूल विभागाने राज्यातील १२७ तालुक्यांमध्ये टच स्क्रीन कियॉस्कची स्थापना केली आहे. सुरूवातीला टच स्क्रीन कियॉस्क २९ मॉडेल तालुक्यांमध्ये लावण्यात आले होते. टच स्क्रीन कियॉस्कला फारच चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, ही सुविधा त्या नंतर ९८ तालुक्यांमध्ये पसरविण्यात आली.

    टच स्क्रीन कियॉस्कच्या द्वारे देण्यात येणा-या नागरिक सेवा: भू-स्वामी वा पट्टाधारक आपल्या जमिनीच्या स्वामित्वाची माहिती पाहू शकतात आणि अधिकारांची नोंद नक्कल मिळवू शकतात. उप-नोंदणी कार्यालयांमध्ये, मालमत्तेच्या नोंदीसाठी लागणारे भू-मार्गदर्शक मूल्य रस्त्यां प्रमाणे/ सर्वेक्षण क्रमांका प्रमाणे पहाण्यासाठी उपलब्ध आहे. दिलेल्या सर्वेक्षण व उप-विभाग क्रमांकावर जमिनीचे विवरण दाखवितात. जन्म दाखल्याचे विवरण पाहू शकता आणि त्याची नक्कल मिळवू शकता. जन्म तारीख किंवा गाव सिलेक्ट करून हे पाहता येते. त्याचप्रमाणे मृत्यूचा ही दाखला पाहू शकतात व त्याची नक्कल मिळवू शकतात. वयोवृध्दांच्या पेंशनचे विवरण आणि नवीन विनंती अर्जाला मान्यता किंवा जुन्या पेंशनची मान्यता पाहणे, डिस्ट्रेस रिलीफ स्कीम (डी.आर.एस.) च्या सेवा व लाभ मिळविण्या साठी महसूल विभागाच्या कल्याण योजनेचे विवरण, मान्यता / वरिष्ठता स्टेटस, जमिनीच्या हस्तांतरणाचे विवरण, राज्यातील निवडणूक क्षेत्रांमध्ये इलेक्टोरल रोल डाटाचे विवरण.

    वैशिष्ट्ये

    • संपूर्ण प्रस्तावना तामिळ भाषेत आहे (स्थानिक भाषा)
    • नवीन उपयोगकर्त्यांसाठी ध्वनि संदेश मार्गदर्शन
    • एन्ट्री करण्यासाठी यूजर फ्रेंडली बटन व नंबर पॅड
    • कियॉस्कमध्ये कॉइन एक्सेपटन्स युनिट आहे; नाणे टाकल्या नंतरच उपयोग करता येतो.
    • लँन च्या द्वारे तालुका सर्व्हरच्या सहाय्याने वर्तमान विवरण दाखविणे

    कार्यान्वयन स्थिति

    • एप्रिल २००२ पासून मार्च २००६ पर्यंत कियॉस्कच्या सेवा घेणा-या एकूण नागरिकांची संख्या ५५.७७ लाख
    • सरासरी १.२५ लक्षांपेक्षा ही जास्त लोक दर महिना तामिळ नीलमचा वापर करून चित्ता ऍक्सट्रॅक्ट/रजिस्टर ऍक्सट्रॅक्ट सारख्या सेवा मिळवित आहेत.
    • सरासरी २५ लाखापेक्षा ही जास्त रक्कम दर महिना पुरविण्यात आलेल्या सेवांच्या माध्यमाने गोळा उपयोगकर्ता शुल्काच्या स्वरूपात करण्यात येत आहे.

    तामिळ नीलम सॉफ्टवेअर खालील नोंदींचा सांभाळ करते परमनेंट/बेसिक रजिस्टरर्स्, जसे ‘ए’, चित्ता रजिस्टर, आणि अ-स्थलीय माहितीचे आडंगल.
    ‘ए’ रजिस्टर विवरण:
    1.  तालुक्याचे नांव
    2.  गावाचे नांव
    3.  सर्वेक्षण क्रमांक
    4.  उप-विभाग क्रमांक

    • जुना सर्वेक्षण क्रमांक
    • पाट इंडिकेटर
    • सरकारी/खाजगी
    • जमिनीचा प्रकार
    • पाणीपुरवठ्याचे साधन
    • कराचा दर
    • जमिनीचा प्रकार प्राथमिक
    • जमिनीचा प्रकार दुय्यम
    • जमिनीचा वर्ग
    • दर हेक्टेयर कर
    • विस्तृत हेक्टेयर
    • विस्तृत एकड
    • एकूण कर
    • पट्टा क्रमांक
    • शेरे
    • पोरोमबोक टाइप कोड

    चित्ता विवरण

    1. तालुक्याचा कोड  2.गावाचा कोड          3. पट्टा क्रमांक 
    4. मालकाचे नांव     5. नातेवाईकाचे नांव    6. नात्याचा कोड

    तामिळ नीलमच्या द्वारे हाताळण्यात येणारे व्यवहार :

    तामिळ नीलम सॉफ्टवेअर द्वारे हाताळण्यात येणारे व्यवहार खालील प्रमाणे आहेत:

    १. पूर्ण शेत पट्टा बदली  २. जोडपट्टा बदली  ३. उपविभाग  ४. उपविभागांचे विलीनीकरण
    ५. वर्गीकरणाचे बदल    ६. आडंगल            ७.  कार्यभार    ८.  हस्तांतरण
    ९.  जमिनीचे अधिग्रहण  १०. अतिक्रमण     ११. जमीन महसूल १२. तडजोड
    तामिळ नीलम संबंधी जास्त माहिती मिळविण्यासाठी, कृपया  www.tn.nic.in/tamilnilam वर क्लिक करा.

    पब्लिक युटिलिटी फॉर्मकरीता वेबसाइट

    स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

    अंतिम सुधारित : 6/25/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate