অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पंजाबमधील ई-प्रशासन

पंजाब सेवा

ऑनलाईन नागरिक सेवा पोर्टल
या पोर्टलमुळे सामान्य नागरीकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असणा-‍या सर्व प्रकारच्या सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. शिवाय या ठिकाणी प्रत्येक सेवेचे महत्त्व व ती मिळविण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहितीही दिलेली आहे. नागरीक या पोर्टलवरून आपल्याला हवे ते अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकतात.

या पोर्टलवर उपलब्ध असणा-‍या काही सेवा

जमिन व महसूल
सामान्य प्रमाणपत्रे
परिवहन सेवा
लोकवितरण सेवा
पालिका सेवा
सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन सेवा, इत्यादी.
या सुविधांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सुविधा

उपलब्ध सेवा

 • स्वातंत्र्यसेनानी व अपंग व्यक्तींना बसपास जारी करणे व त्याचे नुतनीकरण करणे.
 • वृद्ध, विधवा, वंचित मुले व अपंग व्यक्तींना निवृत्तीवेतन देणे.
 • स्वातंत्र्यसेनानींना ओळखपत्र जारी करणे व त्याचे नुतनीकरण करणे.
 • चारीत्र्य पडताळणी
 • स्वातंत्र्यसेनानींच्या मुलांना अवलंबित्वाचा दाखला जारी करणे.
 • दंगलग्रस्त/ दहशतवादग्रस्तांच्या मुलांना अवलंबित्वाचा दाखला जारी करणे.
 • इनडेम्निटी बॉण्ड साक्षांकित करून देणे.
 • श्युअरीटी बॉण्ड स्वीकारणे व तो साक्षांकित करून देणे.
 • नागरिकत्वाचा दाखला देणे.
 • जन्म, मृत्यू व अविवाहीत असल्याचा दाखला देणे.
 • शपथपत्र साक्षांकित करून देणे.
 • पारपत्र (पासपोर्ट) सेवा व शस्त्रपरवाना जारी करणे.
 • ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे. (पेट्रोलपंप, विवाह कार्यालये, हॉटेल व रेस्टॉरंटस्‍, सिनेमा, इत्यादी)
 • चालकपरवाना जारी करणे व त्यावे नुतनीकरण करणे.
 • वाहन नोंदणी
 • जत्रांना परवानगी देणे.
 • परवाने जारी करणे व त्यांचे नुतनीकरण करणे. (शस्त्रास्त्रेविक्रेते, सिनेमा, व्हिडियो पार्लर)
 • खालील सेवादेखिल सुविधामध्ये उपलब्ध आहेत:
 • शस्त्रास्त्र परवाना प्रणाली (Arms Licenses Issuance System (ALIS))
 • कागदपत्रांचे काऊंटरसाईनिंग (Countersigning of Documents (COD))
 • जन्म व मृत्यू प्रमाणपत्र प्रणाली (Birth and Death Certificate Issuance System (BDCIS))
 • सामाजिक सुरक्षा माहिती प्रणाली (Social Security Information System (SSIS))
 • शपथपत्र माहिती प्रणाली (Affidavit Information System (AIS))
 • प्रमाणपत्र प्रणाली (Certificate Issuance System (CIS))
 • न्यायालय माहिती प्रणाली (Court Information System (CoIS))
 • अपंगत्वाचा दाखला जारी करणारी प्रणाली (Handicap Certificate Issuance System (HCIS))
 • पारपत्र अर्ज स्वीकृती प्रणाली: वेबपास (Passport Applications Acceptance System (WebPASS))

या सुविधांचा लाभ घेण्यासाठी येथे लॉग ऑन करा: http://suwidha.nic.in
ऑनलाईन लोकोपयोगी अर्ज

उपलब्ध सेवा

खातेनिहाय लोकोपयोगी अर्ज उदा. सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन, पालिका सेवा, गृहसेवा, परिवहन, शेतकी, लोकवितरण सेवा, स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण व प्रशिक्षण, माजी सैनिक, लघु बचत, वीज व उद्योग.
सर्व अर्ज पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध आहेत जे सहज डाउनलोड करता येतात.
ऑनलाईन तक्रार निवारण केंद्र
उपलब्ध सेवा:
तुमची तक्रार पंजाब सरकारच्या कोणत्याही खात्याला पाठवा.
त्वरीत तक्रार निवारण सेवा
तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
भूमीआलेख व्यवस्थापन प्रणाली

उपलब्ध सेवा

 • भर/ मुक्त प्रमाणपत्र
 • महसूल स्टॅम्पपेपरचा परतावा
 • नव्या चौकीदाराचे नामांकन
 • विवाह नोंदणी
 • मोकळ्या शहरी जमिनीचे लिलावाद्वारे हस्तांतरण
 • चकौतावर सरकारी जमिन देणे
 • भूमीआलेखाच्या प्रमाणित प्रती
 • रजिस्टर डीडच्या प्रमाणित प्रती
 • जमिनीचे विलगीकरण
 • बदल साक्षांकित करणे
 • जमिनीचे विभाजन करणे
 • मोकळ्या ग्रामीण जमिनीचे लिलावाद्वारे हस्तांतरण
 • गिर्डावरी ट्रस्ट
 • नकाशा सामान्य दर
 • नंबरदार व सरब्राह नंबरदारांचे नामांकन करणे
 • मालमत्ताविषयक कागदपत्रांचे नोंदणीकरण करणे
 • भूमिआलेखाची प्रत
 • जमाबंदी/ खासरा गिर्डावारीची प्रत

या सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा: http://www.punjabsewa.gov.in/citizen-services/showServiceList.jsp?cid=C2

सारथी व वाहन

उपलब्ध सेवा:

 • वाहनचालक परवाना
 • वाहननोंदणी
 • परमिट मिळविण्यासाठी अर्ज

अधिक जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा: http://www.punjabtransport.nic.in/

ई-जिल्हा

मुख्य सेवा:
प्रमाणपत्रे: वास्तव्य (डोमिसाईल), मिळकत, विवाह, रोजगार, जात, मुळ निवासी
सामाजिक सुरक्षा: निवृत्तीवेतन, अर्ज, स्वीकृती, नुतनीकरण, भरणा
महसूल न्यायालय: खटल्यांची यादी, प्रलंबन, खटला दाखल करणे, अभिलेख कक्ष सुविधा
सरकारी थकबाकी व जमा: नोटीसा जारी करणे, पैशांचा हिशोब ठेवणे, प्रक्रियेतील चुका शोधणे, तिजोरी पावत्या अद्ययावत करणे
लोकवितरण प्रणाली: नोंदणी, पत्त्यात बदल करणे, सदस्यांची नावे समाविष्ट करणे, दुय्यम प्रत जारी करणे
माहितीच्या अधिकारांतर्गत सेवा: तक्रार निवारण सेवा, महत्त्वाच्या समाजकल्याण सुविधांची माहिती

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: http://www.doitpunjab.gov.in/edistrict.htm

अंतिम सुधारित : 7/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate