অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाज कार्यात करिअरची संधी

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत. तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी देखील सहा महिने ते एक वर्ष असा आहे. या अभ्यासक्रमाची माहिती व आवश्यक पात्रता, अभ्यासक्रमाची वेळ व फी आदी माहिती पुढीलप्रमाणे-

सर्टिफिकेट कोर्स इन ॲडवान्स सोशल रिसर्च मेथडॉलॉजी

या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने इतका असून आठवड्यातून चार दिवस वर्ग चालतात. अभ्यासक्रमासाठी कुठल्याही विषयातील 55 टक्क्यांसहीत पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षाचा क्षेत्रीय कार्य अनुभव आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची वेळ संध्याकाळी 5.00 ते 7.00 असून फी 15,000/- रुपये इतकी आहे.

डिप्लोमा इन सोशल वर्क

हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून तो आठवड्यातील पाच दिवस वर्ग चालतात. अभ्यासक्रमासाठी 12 वी उत्तीर्ण अथवा समकक्ष अशी पात्रता आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची वेळ सायंकाळी 5.15 ते 7.15 अशी आहे. अभ्यासक्रमाची फी रुपये 8,550/- अधिक विद्यापीठाची परीक्षा फी वेगळी आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन थियरोप्युटिक कौन्सलिंग

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून आठवड्यातून 4 दिवस वर्ग चालतात. शैक्षणिक पात्रता किमान पदवी इतकी आहे. अभ्यासक्रमाची वेळ सायंकाळी 5.00 ते 7.00 अशी आहे. अभ्यासक्रमाची फी रुपये 13,900/- अधिक विद्यापीठाची परीक्षा फी वेगळी आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन चाइल्ड राईटस ॲण्ड चाइल्ड प्रोटेक्शन

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून आठवड्यातून तीन दिवस वर्ग चालतात. परीक्षेसाठी किमान पदवी असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची वेळ सायंकाळी 5.00 ते 7.00 अशी आहे. तर अभ्यासक्रमाची फी रुपये 13,900/- इतकी आहे.

सिव्हिल सर्विसेस ट्रेनिंग (युपीएससी आणि एमपीएससी)

या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका आहे. पदवी प्राप्त किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम परीक्षेला बसलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. अभ्यासक्रमाची वेळ सायंकाळी 5.30 ते 7.30 अशी असून हे प्रशिक्षण मोफत दिले जाते. पहिल्या दोन अभ्यासक्रमांसाठी वयाची मर्यादा नाही. तसेच काही गरजु विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देखील उपलब्ध आहे. हे अभ्यासक्रम कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, 38, न्यु मरिन लाईन्स, मुंबई-400 020 (चर्चगेट स्टेशन जवळ) येथे चालवले जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. विरोचन रावते व श्रीमती स्वाती करेकर,दूरध्वनी क्रमांक : 22002615/ २२०६७३४५,ई-मेल : www.cswnn.edu.इन

लेखक - देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती‍)(प्रशासन),
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 2/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate