तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्नमलईनगर येथे १९२९ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ. चेटिनाडचे राजे अन्नमलई चेटियार यांनी चिदंबरम् येथे श्री मीनाक्षी आंग्ल महाविद्यालय, श्री मीनाक्षी तमिळ महाविद्यालय व श्री मीनाक्षी संस्कृत महाविद्यालय अशी तीन महाविद्यालये स्वखर्चाने स्थापन करून चालविली होती. १९२८ साली राजेसाहेबांनी ही तीन महाविद्यालये व वीस लाख रुपये अशी देणगी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सरकारला देऊ केली. मद्रास सरकारने ही देणगी स्वीकारून व आणखी २७ लाख रुपयांची भर घालून अन्नमलई विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठाचे स्वरूप एकात्म, वसतिगृहात्मक व अध्यापनात्मक असे आहे. त्याचे क्षेत्र सु. २४० हेक्टर आहे. विद्यापीठात मानव्यविद्या, विज्ञान, कृषी, तत्त्वज्ञान, शिक्षण, अभियांत्रिकी, वाणिज्य, ललितकला, सागरी जीवविज्ञान इ. विषयांच्या अध्यापनाची सोय असून अध्यापन-विभागांची संख्या २६ आहे. विद्यार्थ्यांची संख्या ५,८३५ होती(१९७२). संगीत व शिक्षण विभागांतील पदविकापरीक्षांचे माध्यम तमिळ असून इतर परीक्षांचे माध्यम इंग्रजी आहे.
लेखक: रा. म. मराठे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2019
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...