प्रस्तावना
तंत्र शिक्षणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसारामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधे साठी १९८६ मध्ये व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यास क्रमाच्या अंमलबजावणीसाठी व्यवसाय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली. वाढते औद्योगीकीकरण, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक आणि आर्थिक बदल यांचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल / अर्धकुशल स्वरूपाची व्यवसाय शिक्षणाची गरज निर्माण होत आहे. तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयाचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील या मंडळाचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून सहा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालये व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालयामार्फत मंडळाचे कामकाज चालते.
परीक्षा मंडळाचे कार्य मुख्यत्वे पुढीलप्रमाणे आहे
- मंडळाकडे सोपविलेल्या निरनिराळ्या प्रमाणपत्र परीक्षा व व्यवसाय परीक्षा यासाठी अभ्यासक्रम ठरविणे व त्यानुसार परीक्षा घेणे.
- परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे.
- परीक्षेचे निकाल जाहीर करून अंतिम परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करणे.
- मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी इच्छुक संस्थांना मान्यता देणे.
- विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके/संदर्भ पुस्तके/दृकश्राव्य साधने ठरविणे, साधने व उपकरणे यांची यादी तयार करणे, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी नेमावयाच्या शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता, कार्यभार व अनुभव ठरविणे.
- विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आवश्यकतेनुसार पाठ्यक्रम तयार करणे, त्यात सुधारणा करणे आणि उपरोक्त प्रकरणी आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी अभ्यास मंडळे व आवश्यकतेनुसार उपसमित्या नेमून योग्य ती कार्यवाही करणे.
इतिहास
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई (DVET) ची स्थापना स.न. १९८४ मध्ये झाली. पूर्वी हे तंत्र शिक्षण संचालनालयाचाच एक भाग होते, पण आय.टी.आय., तांत्रिक महाविद्यालये आणि +२ पातळीच्या ज्युनिअर कॉलेजेसच्या वाढत्या संख्येमुळे तसेच महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करिता स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे संचालनालय पुढील दोन विभागात विभागले गेले:-
- संचालक प्रशिक्षण,
- संचालक व्यवसाय शिक्षण.
संचालक प्रशिक्षण हे CTS(ITI), ATS, MES यांच्याशी संबंधित असलेल्या विविध योजना पहाते, तर संचालक व्यवसाय शिक्षण हे एस.एस.सी. पूर्व पातळीवर व्यवसाय शिक्षण, +२ पातळीचे व्यवसाय शिक्षण, MSBVE चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम इ. शी संबंधित तसेच इतर महत्वपूर्ण योजना पहाते.
उद्देश/ कार्य
औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅड-ऑन कोर्सेस असे कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करून अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना (Employability) मिळणेचे दृष्टीने आवश्यक असणाऱ्या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन १९८६ मध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची स्थापना करणेत आली.
कार्य
i.) अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके ठरविणे.
ii.) मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम राबविणेसाठी इच्छुक शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे.
iii.) शिक्षकांची किमान शैक्षणिक अर्हता ठरविणे.
iv.) परीक्षा घेणे.
v.) निकाल जाहीर करून, मार्कशीटस व प्रमाणपत्र वाटप करणे.
vi.) मान्यता प्राप्त संस्थांचे निरीक्षण करणे.
अभ्यासक्रम व इतर कार्यक्रम
अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
१) विविध सेक्टरमधील, शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच ६ महिने, १ वर्ष, २ वर्ष कालावधीचे अर्धवेळ व पूर्णवेळ अभ्यासक्रम (सोबत गटनिहाय / अभ्यासक्रमनिहाय / कालावधी निहाय/ शैक्षणिक अर्हतेनिहाय संख्या व यादी)
२) सद्यस्थितीत ०४ अभ्यासक्रमांना [ i) हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी, ii) अॅडव्हांस इलेक्ट्रोनिक्स अँड व्हिडीओ सर्व्हिसिंग (एल.ए.ई.एस.), iii) वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्समन), iv) गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझायनिंग ] महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे पदविका (Diploma) अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश दिला जातो. तसेच इतरही काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणेबाबत प्रयत्न सुरु आहेत.
३) शासन निर्णय क्र. रोप्रनि-१००७/प्रक्र ३२/आस्था-२, दि. ११-३-२००८ अन्वये सार्वजनिक बाधकाम विभागातील ” स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पाठ्याक्रमाशी मंडळातील (i) वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्समन), (ii) कंस्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रमसमकक्ष आहेत व इतर अभ्यासक्रम समकक्ष व पर्यायी शैक्षणिक अर्हता करण्यासंबंधी प्रयत्न सुरु आहेत.
४)शासन निर्णय एपीटी-२३९६/२१५/सीआर ३५०/१३, दि. २६-११-१९९७ आणि जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियंत्याचे सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने आथवा बदलीने नियुक्ती करण्यासाठी कंस्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष आहे.
५) पूर्व व्यावसायिक, द्विलक्षी अभ्यासक्रम, एच.एस.सी. व्होकेशनल इत्यादी अभ्यासक्रम शिकत असलेल्या व पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळातील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी थेट बसण्याची (डायरेक्ट अॅडमिशन) संधी उपलब्ध आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी मंडळाची वेबसाईट ‘www.msbve.gov.in’ पहावी.
इतर कार्यक्रम
अ)मान्यता :- कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करणाऱ्या संस्थांसाठी मान्यता प्रक्रिया.
i) अर्ज करणारी संस्था मुंबई सार्वजनिक विश्र्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० आथवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये पंजीकृत असणे आवश्यक.
ii) व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी मंडळामार्फत साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात वर्तमान पत्रासाठी जाहिरात देणेत येते. आणि दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ह्या कालावधीत नियमित शुल्कासह व त्यापुढे दिनांक ०१ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज विक्री व स्वीकृती संबंधित जिल्हास्तरावरील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयामार्फत करणेत येते.
iii)साधारणपणे एप्रिल पर्यंत संबंधित संस्थेस मंजूर / नामंजूर बाबत कळविण्यात येते.
ब) प्रवेश व परीक्षा कार्यक्रम :-
अंक
|
अभ्यासक्रम
|
प्रवेश
|
परीक्षा
|
१
|
६ महिने कालावधीचे |
I)जुलै महिनाII)जानेवारी महिना
वर्षातून ०२ वेळा प्रवेश
|
I) पुढील वर्षाचा जानेवारी महिना
II)जुलै महिना
|
२
|
१ व २ वर्ष कालावधीचे |
जून महिना |
एप्रिल महिना |
मान्यता मिळालेल्या संबंधित संस्थेने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी रुपये १००/- एनरोलमेंट नोंदणी व रुपये २००/- परीक्षा शुल्क घेऊन मंडळाकडे भरणे आवश्यक असते.
संपर्क