क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मुख्यालय पुणे येथे आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती या ८ विभागाच्या ठिकाणी विभागीय कार्यालय असून,राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये व ३१ जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा अधिकारी कार्यालये अशी संचालनालयाची रचना आहे.
महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र असे क्रीडा धोरण असून, स्वतंत्र क्रीडा धोरण आखणारे हे देशातील पहिले राज्य आहे. शासनाने नुकतीच क्रीडा धोरणामध्ये सुधारणा व वाढ करण्यासाठी मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीद्वारे सर्वसमावेशक असे राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण व युवा धोरण दि.१४ जून,२०१३ रोजी जाहीर करण्याल आलेले आहे.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : https://sports.maharashtra.gov.in/sportsmh/marathi/pykka_m.html
अंतिम सुधारित : 6/30/2020
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...