অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योजना - रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम (रो.प्रो.का.)

प्रस्तावना

रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम या योजनेमध्‍ये सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्‍यांचे कौशल्‍य व क्षमता वाढविण्‍यासाठी खाजगी आस्‍थापनांमध्‍ये प्रत्‍यक्ष कामाव्दारे प्रशिक्षण देण्‍यात येते. रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम या योजनेचा मूळ उद्देश उमेदवारांचे कौशल्‍य वाढवून त्‍यांना मागणीनुसार नोकरीक्षम करणे हा होय.रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम हया योजनेमध्‍ये विदयावेतन देण्‍यात येते.


नो‍करीउत्‍सुक उमेदवारांकरिता सुविधा

  • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रमांतर्गत उपलब्‍ध पदे व उमेदवार निवडीचे वेळापत्रक ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.
  • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रमांतर्गत आपला सहभाग ऑनलाईन नोंदविण्‍याची सुविधा
  • प्रशिक्षणानंतर कायमस्‍वरुपी रोजगाराची संधी
  • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रमाचे प्रशिक्षणाकरिता मुलाखत कार्यक्रम व निवडीबाबतच्‍या माहितीकरिता SMS व E-mail सुविधा

या सुविधांचा लाभ घेण्‍याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्‍यास लॉग इन करा.


उद्योजकांकरिता सुविधा

  • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रमांतर्गत पदे ऑनलाईन अधिसूचित करण्‍याची सुविधा.
  • उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्‍यासाठी त्‍यांची शैक्षणिक पात्रता, कौशल्‍य, अनुभव, वास्‍तव्‍याचे ठिकाण इ. नुसार शोध ऑनलाईन घेण्‍याची सुविधा.
  • वि‍वरणपत्रे, विद्यावेतन प्रतिपूर्ती मागणीपत्रे इ. कालमर्यादेत सादर करण्‍यासाठी SMS Alert व E-mail सुविधा.

या सुविधांचा लाभ घेण्‍याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्‍यास लॉग इन करा.

 

रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम या योजनेची ठळक वैशिष्‍ठये

  • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 रोजी नोकरीउत्‍सुक उमेदवारांकरिता सुरु करण्‍यात आली.
  • प्रशिक्षणासाठी किमान एसएससी उत्‍तीर्ण व वय 18 वर्ष पूर्ण असलेला उमेदवार पात्र आहे.
  • उमेदवारांचे कौशल्‍य विकसित करण्‍यासाठी त्‍यांना खाजगी क्षेत्रातील आस्‍थापनांममध्‍ये प्रत्‍यक्ष कामाचे ठिकाणी प्रशिक्षण देण्‍यात येते.
  • या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे.
  • उमेदवारांना प्रशिक्षणाच्‍या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा रुपये 300/- ते 1000/- पर्यंत विद्यावेतन देण्‍यात येते.
  • प्रशिक्षणाचा कालावधी समाप्‍त झाल्‍यावर उमेदवाराला नोकरीमध्‍ये सामावून घेतले जाऊ शकते.
  • सदरचे प्रशिक्षण कामगार कायद्याच्‍या कक्षेत येत नसल्‍यामुळे खालील कामगार विषयक कायदे या योजनेमधील उमेदवारांना लागू होत नाहीत.
    • किमान वेतन कायदा 1948
    • राज्‍य कामगार विमा कायदा 1948
    • कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी कायदा 1942
    • कामगार नुकसान भरपाई कायदा 1923
  • सदरची योजना महाराष्‍ट्रातील सर्व जिल्‍ह्यांकरिता लागू आहे.

 

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate