অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकेंद्रित सेवा केंद्रे

उमेदवार व उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवा त्यांच्या दारापर्यंत देण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्रामध्यॆ उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महा ई-सेवा केंद्रे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात आहेत.रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या निवडक सेवा शासकीय आय. टी. आय.शासकीय तंत्रनिकेतन,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व महा ई-सेवा केंद्रे येथेही उपलब्ध आहेत.

 

नोकरीउत्‍सुक उमेदवार व उद्योजक यांचेकरिता सेवा केंद्रामध्ये उपलब्‍ध असलेल्या सेवा

  • उमेदवारांसाठी नोंदणी व अद्यावतीकरणाची ऑनलाईन सुविधा
  • उद्योजकांसाठी नोंदणी व अद्यावतीकरणाची ऑनलाईन सुविधा
  • सेवायोजन कार्यालये (रिक्‍तपदे सक्‍तीने अधिसूचित करण्‍याची सक्‍ती करणारा कायदा, 1959) मधील तरतुदीनुसार उद्योजकांना से.वि.-1 व से.वि.-2 ऑनलाईन सादर करण्‍याची सुविधा.

टीप :-

  • विकेंद्रित सेवा केंद्रातून दिल्या जाणा-या सेवा सशुल्क आहेत.
  • कृपया आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपला नोंदणी क्रमांक,युझर आयडी, पासवर्ड लक्षात ठेवा

 

विकेंद्रित सेवा केंद्रांची ठळक वैशिष्ठये

  • रोजगार व स्‍वयंरोजगार संचालनालयाच्‍या सेवा आपल्‍या दारात
  • रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंदास कामासाठी भेट देण्‍याची आवश्‍यकता नाही.
  • वेळ, पैसा व श्रम यांची बचत.
  • कोणालाही, कोणत्‍याही विकेंद्रित सेवा केंद्रातून सेवा घेता येणे शक्‍य.

महाराष्‍ट्रात रोजगार व स्‍वयंरोजगार संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे कामकाज 45 रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे चालते. महाराष्‍ट्रात रोजगार सेवा आपल्‍या दारात पुरविण्‍यासाठी नोकरीउत्‍सुक उमेदवारांच्‍या व उद्योजकांच्‍या घराजवळ रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाने विकेंद्रीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून 6413 ( एप्रिल 2012 ) महा ई सेवा केंद्र, आय. टी. आय., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये येथे सेवा केंद्रे दिनांक 3 जानेवारी, 2012 पासून चालू केलेली आहेत.

नोकरीउत्‍सुक उमेदवार व उद्योजकांसाठी रोजगार विभागाच्‍या दिल्‍या जाणा-या सेवांबाबतची दर सुची खालील प्रमाणे आहे. :-



अनु. क्र.सेवांचा प्रकारदर सुची
नोकरीउत्‍सुक उमेदवारांसाठी
1 नवीन नोंदणी व ओळखपत्र देण्‍याची सुविधा 20/-
2 नोंदणीचे अद्यावतीकरण व ओळखपत्र देण्‍याची सुविधा 15/-
3 दुबार ओळखपत्र देण्‍याची सुविधा 10/-
उद्योजकांसाठी
1 नवीन नोंदणी 20/-
2 से.वि.-1 भरण्‍यासाठी 20/-
3 से.वि.-2 भरण्‍यासाठी 50/-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate