अनुच्छेद 1
१८ वर्षे वयाखालील प्रत्येकास या अभिसंधीमधील सर्व हक्क आहेत
अनुच्छेद 2
आपण कोणत्याही वंशाचे, धर्माचे, विचारसरणीचे, आणि कोणत्याही प्रकारच्या कुटुंबातून आलेले असलात तरीही भेदभाव केला न जाता ही अभिसंधी प्रत्येकावर लागू होते.
अनुच्छेद 3
मुलांशी संबंधित असलेल्या सर्व संघटनांनी प्रत्येक मुलासाठी काय सर्वोत्कृष्ट आहे या दिशेने कार्य केले पाहिजे.
अनुच्छेद 4
शासनाने हे हक्क सर्व मुलांकरिता उपलब्ध करविले पाहिजेत.
अनुच्छेद 6
आपल्यास जगण्याचा अधिकार आहे. शासनाने आपण जगाल आणि स्वतःचा उत्कर्ष कराल हे सुनिश्चित केले पाहिजे.
अनुच्छेद 12
जेव्हा मोठी माणसे आपल्यावर परिणाम करणारे निर्णय घेतील तेव्हा आपल्याला जे वाटते तसे घडवण्याचा आणि आपले मत विचारात घेतले जाण्याचा हक्क आपल्यास आहे.
अनुच्छेद 7
आपणास कायदेशीररीत्या नोंदविलेल्या नावाचा व राष्ट्रीयतेचा हक्क आहे. तसेच आपणास ज्ञानार्जन व मातापित्यांकडून जितके शक्य असेल तेवढे संगोपन मिळवण्याचा हक्क देखील आहे.
अनुच्छेद 9
आपल्या स्वतःच्या हिताचे असल्याशिवाय आपण अपल्या पालकांपासून स्वतंत्र होऊ नये, उदाहरणार्थ जर पालक मुलाशी गैरवर्तन करीत असतील वा त्याचेकडे दुर्लक्ष करीत असतील. आपले पालक विभक्त असल्यास आपणास जोपर्यंत ते आपणास हानी पोहोचवित नाहीत तोपर्यंत दोन्ही पालकांशी संपर्क साधण्याचा अधिकार आहे.
अनुच्छेद 20
आपल्या स्वतःच्या परिवाराद्वारे आपले संगोपन केले जाऊ शकत नसल्यास आपला धर्म, संस्कृती व भाषा यांचा आदर करणार्या लोकांनी आपले संगोपन केले पाहिजे.
अनुच्छेद 22
आपण देशात निर्वासित म्हणून आलेले असल्यास आपल्यास या देशात जन्मलेल्या मुलांना असलेले सर्व हक्क आपणासही असतील.
अनुच्छेद 23
आपणास कोणतेही अपंगत्व असल्यास आपणास विशेष संगोपन व पाठिंबा मिळावयास हवा जेणेकरुन आपण एक परिपूर्ण जीवन स्वतंत्रपणे जगू शकाल.
अनुच्छेद 24
आपणास चांगल्या प्रतीचे आरोग्य संगोपन, स्वच्छ पाणी, पोषक आहार आणि स्वच्छ वातावरण मिळण्याचा हक्क आहे, ज्यामुळे आपण निरोगी रहाल.
अनुच्छेद 25
आपले पालनपोषण आपल्या पालकांऐवजी स्थानिक अधिकारी करीत असल्यास आपल्या स्थितीचा नियमितपणे आढावा घेतला गेला पाहिजे.
अनुच्छेद 26
आपण वा आपले पालक यांना आपण गरीब वा गरजू असल्यास सासनाकडून मदत मिळवण्याचा हक्क आहे.
अनुच्छेद 27
आपणास आपल्या शारीरिक व मानसिक गरजा पूर्ण करण्यास योग्य अशा राहणीमानात जगण्याचा हक्क आहे. जर असे वातावरण पुरवण्याची आपल्या कुटुंबाची कुवत नसेल तर शासनाने आपल्या कुटुंबास मदत करावी.
अनुच्छेद 28
आपणांस शिक्षणाचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण मोफत असावे.
अनुच्छेद 29
शिक्षणाने आपल्या व्यक्तिमत्वाचा व प्रतिभांचा शक्य तितक्या प्रमाणात पूर्ण विकास केला पाहिजे. त्याने आपल्यास आपल्या पालकांचा तसेच आपल्या व इतरांच्या संस्कृतीचा आदर करण्यास शिकवले पाहिजे.
अनुच्छेद 30
आपणास आपल्या कुटुंबाची भाषा व रीतिरिवाज शिकून ते वापरण्याचा, ते देशातील बहुतेक लोकांद्वारे वापरली जात असली वा नसली तरीही, हक्क आहे.
अनुच्छेद 31
आपणास आराम करण्याचा, खेळण्याचा आणि इतर क्रियांमध्ये सामील होण्याचा हक्क आहे.
अनुच्छेद 42
शासनाने सर्व पालक व मुलांना ह्या अभिसंधीची माहिती करुन दिली पाहिजे.
अनुच्छेद 19
शासनयंत्रणांनी आपले योग्य संगोपन होत असल्याचे आणि आपण आपल्या पालकांद्वारे वा आपली देखभाल करणार्या कोणाही द्वारे केली जाणारी हिंसा, गैरवर्तन व निष्काळजीपणापासून सुरक्षित असल्याची खात्री केली पाहिजे.
अनुच्छेद 32
शासनाने धोकादायक असलेल्या किंवा आपले आरोग्य वा शिक्षणास हानी पोहोचवणार्या कामापासून आपले संरक्षण केले पाहिजे
अनुच्छेद 36
आपल्या विकासास बाधित करणार्या कोणत्याही क्रियेपासून आपले संरक्षण केले गेले पाहिजे.
अनुच्छेद 35
शासनाने मुलांना पळवून नेले किंवा विकले जात नसल्याची खात्री केली पाहिजे.
अनुच्छेद 11
शासनाने आपणास आपल्या स्वतःच्या देशातून बेकायदेशीररीत्या बाहेर नेले जाणे थांबविण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
अनुच्छेद 34
शासनाने लैंगिक अत्याचारापासून आपले संरक्षण केले पाहिजे.
अनुच्छेद 37
आपणांस क्रूर, अपमानकारक अथवा अमानवी वागणूक दिली जाऊ नये.
अनुच्छेद 40
आपण कायदा भंग करण्याचे आरोपी असाल तर आपल्यास कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. आपणास प्रौढ व्यक्तींसह तुरुंगात ठेवले जाऊ नये आणि आपणांस आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवता यावा. मुलांसाठी तुरुंगवासाची शिक्षा केवळ अतिशय गंभीर अपराधांमध्येच दिली जावी.
अनुच्छेद 13
आपणास माहिती मिळवण्याचा व ती सामायिक करण्याचा, एकमेकांना भेटण्याचा तसेच गट व संघटनांमध्ये सामील होण्याचा हक्क आहे - जोपर्यंत असे करणे आपल्यासाठी व इतरांसाठी हानीकारक नसेल तोपर्यंत
अनुच्छेद 14
आपणास, जोपर्यंत आपण इतर लोकांना त्यांच्या हक्कांचा आनंद घेण्यास बाधा आणत नाही तोपर्यंत, आपणास जसे वाटते तसा विचार करण्याचा व विश्वास ठेवण्याचा, आणि आपल्या धर्माचे अनुसरण करण्याचा हक्क आहे. या बाबतीत पालकांनी आपणांस मार्गदर्शन केले पाहिजे.
अनुच्छेद 15
आपणास, जोपर्यंत आपण इतर लोकांना त्यांच्या हक्कांचा आनंद घेण्यास बाधा आणत नाही तोपर्यंत, एकमेकांना भेटण्याचा तसेच गट व संघटनांमध्ये सामील होण्याचा हक्क आहे.
अनुच्छेद 16
आपणास गोपनीयतेचा अधिकार आहे. कायद्याने आपल्यास आपली जीवनशैली, आपली प्रतिष्ठा आणि आपला परिवार व घरे यांवरील आक्रमणांपासून संरक्षण दिले पाहिजे.
अनुच्छेद 17
आपल्यास प्रसारमाध्यमांकडून विश्वसनीय माहितीचा हक्क आहे. टेलीव्हिजन, रेडिओ आणि वृत्तपत्रे यांनी आपल्यास समजेल अशी माहिती दिली पाहिजे आणि आपल्यास हानीकारक अशा सामग्रीस पाठिंबा देऊ नये.
स्त्रोत : युनिसेफ
अंतिम सुधारित : 6/5/2020
ह्या विभागामध्ये बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग...
एचआयव्ही बाधित आणि पीडित मुलांसाठी योग्यश निवारा व...
पंचायत समिती सदस्य म्हणून सभेत प्रश्न विचारण्याचा,...
स्वतःचा देश सोडून अन्य देशांत वास्तव्य करणारे लोक...