भाषा |
कोण बोलतात |
भिली |
भील, डुंगरी गरासिया, वसावे भील, मावची |
धानकी |
धानका |
गामेती |
डामोर |
गामित |
गामित |
कच्छी |
पारधी/ नाहर पारधी |
कोकणी |
कोंकणा |
कोतवालिया |
कोतवाल/ कोतवालिया |
नायकाडी |
नाईकडा |
सरहोदी |
वागरी /वाघरी |
वारली |
वारली |
या व्यतिरिक्त राज्यात अजून काही आदिवासी वास्तव्य करतात. बारदा, बावचा, भामचा, भरवाड, डुंगरी भील, मेवासी, रावल, तावडी, भगालिया, भिलाला, पावरा, वसावा, चौधरी, धोडीया, दुबळा, पडवी, गोंड, काथोडी, कातकरी, कोळी, नाइकडा, कापडिया, पधार, पतेलिया, पोमला, राबरी, राठवा, वाघरी आदी आदिवासी गुजरात राज्यात आहेत. तर्नेतर येथे तर्नेतरची यात्रा शिव या दैवतासाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी, पंचमी व षष्ठीला भरते. पोरबंदरजवळ माधवपूर येथे कृष्णाने रूक्मिणीला पळवून आणून केलेल्या लग्नाच्या तिथीला म्हणजे चैत्र शुक्ल नवमीला ही यात्रा भरते. बनसकंथा जिल्ह्यातील अंबाजी येथे देवीची यात्रा (अंबादेवी) चैत्र महिन्यात असते. ही सर्वात मोठी वार्षिक यात्रा असते. कृष्ण जन्माष्टमीला व्दारका व डाकोर येथे ही यात्रा भरते. मकर संक्रांत, नवरात्री, डांगी दरबार, शामलजी यात्रा, भवनाथ यात्रा आदीसोबतच भवाई, रास गरबा, पतंग उत्सव, नवरात्री, दिवाळी, होळी, ताजिया हे सणही इथे साजरे होतात.
लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे,
सायास, १८७, टेलिफोन कॉलनी, पाठक मैदानाच्या पूर्वेला,
सटाणा- ४२३३०१ जि. नाशिक.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/27/2023
गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ.
इस्लामी वास्तुकलेच्या झालेल्या परिणामांतून भारतीय-...
कच्छ : स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थान व पाकिस्त...
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विद्यापीठ.