इंग्लंडच्या बकिंगहॅम परगण्यातील शिक्षणकेंद्र. लोकसंख्या ३,९०१ (१९६१). हे शहर टेम्स नदीच्या दक्षिण तीरावर, लंडनच्या पश्चिमेस ३५.२ किमी. आहे. सहाव्या हेन्रीने १४४० मध्ये येथे पब्लिक स्कूलची स्थापना केली. १४४३ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या किंग्ज कॉलेजशी ते जोडण्यात आले. १८६८ मध्ये या शिक्षणसंस्थांची व्यवस्था केंब्रिज व ऑक्सफर्ड येथील शिक्षणतज्ञांनी नेमलेल्या मंडळाकडे होती. १८७३ मधील पब्लिक स्कूल कायद्यानुसार स्वतंत्र मंडळ नेमले गेले. येथील शिक्षण उच्च दर्जाचे मानले जात असे. येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत चमकले आहेत. वॉटर्लूची लढाई जिंकणारा ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा आपल्या यशाचे बरेचसे श्रेय ईटन येथील शिक्षणाला देई. फुटबॉल व इतर खेळांबरोबरच येथील विद्यार्थ्याचे क्रिकेटचे सामने व नौकाशर्यती प्रसिद्ध आहेत.
अंतिम सुधारित : 7/3/2020
इंग्लंडमधील पहिले आणि जगप्रसिद्ध विद्यापीठ.
पूर्व इंग्लंडच्या सफक परगण्यातील शहर. लोकसंख्या १...