অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅस्ट्राखान

अ‍ॅस्ट्राखान

अ‍ॅस्ट्राखान

रशियातील अ‍ॅस्ट्राखान प्रांताची राजधानी व कॅस्पियन समुद्रावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,११,००० (१९७०). हे व्होल्गा नदीच्या दक्षिण तीरावर, तिच्या त्रिभुजप्रदेशाच्या शिरोभागी, मुखापासून ८८किमी. आत समुद्रसपाटीखाली सु. १५ मी. आहे.

तार्तरांची ही एके काळची राजधानी; १५५६ मध्ये रशियाने जिंकली.

दुष्काळ, रोगराई, आग, पूर यांचे अनेक तडाखे बसूनही पृष्ठभागी व्होल्गाचा समृद्ध प्रदेश, मोक्याचे स्थान व कॅस्पियन समुद्रातील मत्स्यसंपत्ती यांमुळे ॲस्ट्राखानची झपाट्याने वाढ झाली. रशियातील मत्स्योद्योगाचे हे एक प्रमुख केंद्र आहे.

याशिवाय येथे जहाजबांधणी, लाकूड, अन्नपदार्थ, मद्योत्पादन इत्यादींचे उद्योग असून मीठ, कापूस, द्राक्षे व इतर फळे आणि पेट्रोलियमचा मोठा व्यापार आहे. वर्षातून सु. चार महिने हे बंदर गोठलेले असते.

लिमये, दि. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/17/2015



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate