অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्हा

महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२' ते ११ ४६' . आणि ७६ ३८'ते ७८ २७' पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी.आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

भूवर्णन :

मेळघाट व पयानघाट असे या जिल्ह्याचे दोन स्वाभाविक विभाग असून मेळघाट गाविलगडच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. (समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १,०३६ मी.) या भागातील सर्वांत उंच बैराट शिखर (,१७७ मी.) चिखलदऱ्याजवळ आहे. अमरावती-चांदूर रेल्वेफाट्याजवळच्या टेकड्या (४५७ मी.) सोडल्या तर पयानघाट सखल व सपाट आहे. याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २५० मी.आहे.

मेळघाटातील बहुतेक पाणी कामदा, कापरा, गार्गा व सिपना या तापीच्या उपनद्यांतून वायव्य सीमेवरील तापी नदीत जाते. पूर्व सीमेवरून वर्धा नदी दक्षिणेकडे वाहते. चंडामनी, मातू, विदर्भा,बेवळा व खोलाट या तिच्या उपनद्या होत. मध्यभागातील प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर पश्चिमवाहिनी पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून शहानूर, चंद्रभागा व पेंढी या तिच्या उपनद्यांमधला जमिनीचा पट्टा खाऱ्या पाण्याचा आहे.

पयानघाटाचा भाग समुद्रापासून दूर व सखल असल्याने हवामान विषम आहे; उन्हाळ्यात सरासरी ४१से. तर हिवाळ्यात १६से. तपमान असते. उंचीमुळे मेळघाट भाग नऊ महिने थंड असतो. पण पावसाळ्यातील तीन महिने येथील हवामान रोगट असते. पावसाची वार्षिक सरासरी उत्तरेस ११०,पश्चिम भागात ७९., पूर्व भागात ८४.५ व दक्षिणेस ७७.८ सेंमी. असून १० टक्के पाऊस हिवाळ्यात पडतो.

एकूण क्षेत्रफळाच्या ३१ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असून त्यातील ८१ टक्के एकट्या मेळघाट तालुक्यात आहे. सागवान, तिवस, सलई, धावडा, नालडू, आवळा, तेंदू ही उपयोगी झाडे असून रोशा गवत व बांबू यांचेही उत्पादन होते. येथे वाघ, चित्ता, हरिण, सांबर, अस्वल वगैरे प्राणी आढळतात. पयानघाटात बाभळीची बने आहेत.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://amravati.nic.in/main.html

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate