तेर येथे कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तू संग्रहालय आहे. उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. कै. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी चौकस बुद्धीने व ऐतिहासिक वस्तू जमवण्याचा छद या जोरावर वस्तू जमावल्या व हा लाखो रुपयांचा संग्रह त्यांनी २२ जानेवारी १९७१ रोजी शासनाकडे सुपूर्द केला. शासनाने तेथे भव्य वास्तू उभी केली असून अभ्यासक व पर्यटकांना हि वास्तू उपयुक्त ठरली आहे.
परंडा तालुक्यातील माणकेश्वर हेमांडपंथी देवालय प्रसिद्ध आहे. इ सर्वात जुने व सर्वात सुंदर देवालय आहे. प्रत्येक छोटया – मोठ्या दगडावर अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. गाभा-यात महादेवाची प्रंचड पिंड आहे.
येरमाळा हे गाव उस्मानाबाद पासून ५० कि. मी. अंतरावर आहे. प्रभुरामचंद्राना वनवासाला जाताना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रुप घेउन भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला येडी आहेस. असे म्हंणटले. तेव्हापासून हि देवी इथे राहिली व तिचे नाव येडाई उर्फ येडेश्वरी झाले. या आख्यायिकेचा उल्लेख रेणुका स्त्रोत्रात असल्याचे पुजारी सांगतात. येरमाळा हे सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर आहे.
परंडयाच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावरील सोनारी या गावी श्री. कालभैरवनाथ मंदिर आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. चंड नावाच्या दैत्याचा मुलगा प्रचंड हा गोदावरीच्या दक्षिण भागात दंडकारण्यात (हल्लीचे परंडा) राहत होता. त्याच्या त्रासाने सर्व पीडित शंकराला शरण गेले. शंकराने काशी क्षेत्राच्या रक्षणासाठी जे ८ भैरव आपल्या नेत्रातून निर्माण केले होते. त्यापैकी कालभैरव याने या प्रचंड दैत्याचा तसेच सुवर्णसूर, भैमकासुराचा वध केला. त्यानंतर शंकराने त्याचा सुवर्णपुरी उर्फ सोनारीत राहण्याची आज्ञा केली. त्यामुळे कालभैरव सोनारीत वास्तव्य करू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
महापुरुषांच्या वास्तव्याचे एक ठिकाण परंडा तालुक्यात डोमगाव येथे आहे. एका आड वाटेला, सोनारी जवळ असलेल्या या गावात समर्थ रामदासाचे पट्टशिष्य पूज्य कल्याणस्वामीचा यांचा मठ आहे. या कल्याणस्वामीच्या हस्ताक्षरातील दासबोधाची सुरेख अक्षरातील प्रत व खुद्द रामदासांनी त्यात केलेल्या दुरुस्त्या या स्थानाला आगळे महत्व आहे.
प्राचीन शिवमंदिर, श्रावण सोमवरी व महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक दर्शनास येतात. हे ठिकाण उस्मानाबाद पासून ८ कि.मी. अंतरावर आहे.
रामलिंग हे सोलापूर – बीड मार्गावरील येडशी जवळ आहे. यासंबंधी असे सांगितले जाते के, या प्रवाह संगमात स्नान करून प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची पूजा केली, म्हणून भगवान शंकर यांचे रामलिंग या नावाने प्रसिद्ध झाले. सीताहरणाच्या वेळी या दंडकरण्यातून राम – लक्ष्मनाच संचार झाला. त्यांचे हे स्थान आहे. श्रावण महिना व दर सोमवारी भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे येतात.
सोलापूर – हैद्राबाद राष्ट्रीय मार्गावर अणदूर हे गाव आहे. त्या काळात त्याचे आनंदवूर हे नाव होते. मनिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड भैरवनाचा अवतार धारण केला. त्यानंतर भक्त व मुनीच्या प्रर्थनेनुसार भैरवरुपी शंकर अरीमैलार येथे स्वयंभू लीन्गृपणे प्रगट झाले. हे मंदिर हेमाडपंथी असून आवारात अनेक दीपमाळा आहेत. अनदुरला मार्गशीष ६ ला इ मैलापुरला पौष शुद्ध १५ ला यात्रा भरते. इथे प्राण्यांचा नाही तर पुरणाचा नैवेद्य दिला जातो हे विशेष.
भारतात जैन धर्मीयांची अनेक तीर्थक्षेत्र (धर्मीकस्थाने) आहेत. या तीर्थक्षेत्रचे सिद्धक्षेत्र,(निर्माणभूमी) कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र असे तीन प्रकार समजतात. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थकर किंवा मुनी यापैकी कानोनितरी मोक्षाला गेलेले असतात.त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात. दक्षिण भारतातील एकमेव दिगंबर जैन सिद्धक्षेत्र म्हणजे कुंथलगिरी उसमानाबाद – औरंगाबाद रस्त्यावर ६० कि.मी. व सरमकुंडी फाट्यापासून डावीकडे २ कि.मी. अंतरावर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. या दर्ग्यात फारसी भाषेतील कोरलेले एक शिलालेख असून त्यात या पुरुषाचा निर्वाणकाळ ७२० हिजरी असा दिलेला आहे. हा दर्गा फारच भव्य, सुंदर, प्राचीन शिल्पकलेच्या दृष्टीने प्रेक्षणीय आहे. दरवर्षी येथे त्यांचा उरूस भरतो.
स्त्रोत :
अंतिम सुधारित : 8/4/2020
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची महत्त्व...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.