कोल्हापुरात अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे सुंदर व पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यापैकी उल्लेखनीय पुतळे म्हणजे शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा. लक्ष्मी चौकातील आईसाहेब महाराणींचा संगमरवरी पुतळा, दुसरा चौकातील छ. शाहूंचा भव्य पुतळा, वरूणतीर्थ वेशीतील म. गांधींचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळचा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा, टुरिस्ट हॉटेलसमोरचा राजीव गांधींचा पुतळा, कावळा नाक्यावरील
महाराणी ताराबाईंचा अश्वारूढ पुतळा, शिवाजी विद्यापीठातील अश्वारूढ छ. शिवाजी महाराजांचा पुतळा, शाहू मार्केट यार्ड येथील शाहू महाराजांचा पुतळा, महापालिकेजवळचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा हे होत. शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्य़ाच्या जागी पूर्वी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सनचा पुतळा होता. या ठिकाणी 1945 मध्ये ब्रांझचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवभक्त भालजी पेंढारकरांमुळे बसविण्यात आला आहे.
ब्रिटीश साम्राज्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तींचे पुतळे स्वातंर्त्यपूर्व काळात कोल्हापुरात बसविण्यात आले होते. त्यातील काही पुतळे काही पुतळे पूर्वीच्या जागेवरून हलवले असून ते आता शासकीय वस्तूसंग्रहालयात ठेवलेले आहेत. कोल्हापुरचे सौंदर्य वाढवणारे हे बहुतेक पुतळे ब्रांझचे असून कोल्हापुरच्या कलाकारांनीच बनवले आहेत. आजही कोल्हापुरातून बाहेरगावी भव्य ब्रांझचे पुतळे बनवून नेले जात आहेत.
वर उल्लेख केलेल्या पूर्णाकृती पुतळ्य़ाखेरीज बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा फुले यांचे अर्धपुतळे व इतरत्र अल्लादियाखाँ, आबालाल रहमान, शाहू महाराज, राजाराम महाराज, चिमासाहेब गोविंदराव टेंबे, महात्मा गांधी, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे अर्धपुतळे व पूर्णाकृती पुतळे कोल्हापूर शहराच्या विविध भागात शहराची शोभा वाढवत आहेत.
लेखन: ज्ञानदीप
माहिती स्रोत:
अंतिम सुधारित : 1/30/2020
स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच...
आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं 'हॉर्निमन ...
दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापि...
चित्राचे संरक्षण होऊन सौंदर्यही वाढावे, म्हणून पूर...