অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुणे जिल्हा - पर्यटन

सिंहगड

पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले " गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

आगाखान पॅलेस

 

गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.

शनिवारवाडा

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.

पर्वती

पर्वती हे पुण्याचे स्थान दर्शविणारे प्रसिध्द ठिकाण आहे. पर्वतीची टेकडी ही जरी शहराच्या दक्षिणेकडील भागात असली तरी सुध्दा ती शहराच्या जवळजवळ सर्वच भागातून दिसू शकते. मंदिराला 8 पाय-या आहेत ज्या पार्वती व देवडेश्वरांना अर्पण केलेल्या आहेत. तेथे विष्णु, गणेश व कार्तिकस्वामी यांचेही मंदिर आहे. टेकडीच्या माथ्यापर्यंत चढून गेल्यावर आपल्याला सर्व बाजूने पुणे शहराचे सुंदर दर्शन घडल्याचा आनंद लुटता येतो.

राजगड किल्ला

राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते.

तोरणा किल्ला

हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे.

पुरंदर आणि वज्रगड किल्ला

हे दोन्ही किल्ले पूरंदर तालूक्यात वसलेले असुन ते एकमेंकांना जोडलेले आहेत.काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर 1665 साली झाला. हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता.आता हा किल्ला नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात आहे.

संभाजी महाराज समाधी

धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.

 

स्त्रोत : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate