অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्रीडा धोरण

सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन २००१ मध्ये जाहीर करण्यात आले होते.

सन २००१ च्या क्रीडा धोरणात ‘सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला होता व आबालवृद्ध  नागरिकांमध्ये  शारीरिक सुदृढता आणि याद्वारे आरोग्यसंपन्न कार्यक्षम जीवनाचे महत्व त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना या क्रीडा धोरणात सुचविण्यात आली होती.

राज्याचे क्रीडा धोरण ठरविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. क्र.क्रीडाधो-२००६/ प्र.क्र.१६७/०६/क्रीयुसे-१, दि.२० फेब्रु २०१० अन्वये मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येऊन या समितीने नवीन क्रीडा धोरणांमधील ५८ महत्वपूर्ण शिफारसी केलेल्या होत्या. दि.२० एप्रिल २०१२ रोजी शासनाने क्रीडा धोरण २०१२ मान्यता दिलेली  आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.क्रीडाधो-२०११/प्र.क्र.५५/क्रीयुसे-१, दि.१४ जून, २०१२ अन्वये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ जाहीर झाले असून सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणातील महत्वाच्या बाबी

शालेय शिक्षण व क्रीडा

  1. क्रीडा विषयक पायाभूत सुविधांची निर्मिती
  2. खेळांसाठी ज्यादा तासिका उपलब्ध करून देणे तसेच क्रीडा या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे
  3. क्रीडा संहिता तयार करणे
  4. शाळांचा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग
  5. शारीरिक शिक्षण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती
  6. क्रीडा प्रबोधिनी.
  7. अनिवासी क्रीडा अकादमीची स्थापना
  8. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी विशेष गुण सवलत
  9. शालेय क्रीडा स्पर्धा
  10. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणा-या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान.
  11. शैक्षणिक संस्थांना मानधनावर क्रीडा मार्गदर्शक नियुक्तीस मान्यता
  12. क्रीडा महोत्सवाचे आयोजन
  13. स्पोर्ट्स नर्सरीची स्थापना
  14. क्रीडा वाडःमय निर्मिती, क्रीडा वस्तु संग्राहालय व क्रीडा ग्रंथालयाची स्थापना
  15. क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार व उच्च पदावरील सेवेतील संधी.
  16. क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
  17. क्रीडांगणाचे आरक्षण.
  18. क्रीडा अभियान
  19. क्रीडा साहित्य अनुदान
  20. खेळाडूंसाठी स्पर्धा, प्रशिक्षण शिबीरे तसेच सराव करतेवेळी अपघात/इजा झाल्यास वैद्यकीय  उपचारासाठी आर्थिक सहाय्य.
  21. शालेय विद्यार्थ्यामध्ये योगासनाचे महत्व जागविणे
  22. राज्यातील क्रीडा सुविधांचे सर्वेक्षण करण
  23. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावर शालेय, ग्रामीण (पायका) व महिला क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शिष्यवृत्ती
  24. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षण व क्रीडा समितीची स्थापना
  25. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा मंडळ स्थापन करणे
  26. आदिवासी क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रबोधिनी स्थापना

भारतीय खेळ व इनडोअर खेळ

  1. तालीम, कुस्ती केंद्रांचा विकास करणे
  2. वयोवृद्ध खेळाडू व कुस्तीगीरांना मानधनात वाढ
  3. छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक खो-खो व चषक स्पर्धा सहाय्यक अनुदानात वाढ करणे, मॅरेथॉन स्पर्धा आयोजन
  4. कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ
  5. राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन


आऊटडोअर स्पोर्ट्स, अॅडव्हेन्चर व वॉटरस्पोर्ट्स.

  1. महाराष्ट्र स्टेट अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स सेंटरची स्थापना करणे
  2. साहसी खेळांची क्रीडा सुविधांची निर्मिती करणे.
  3. साहसी खेळांच्या स्पर्धा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन.
  4. साहसी क्रीडा पुरस्कार
  5. साहसी खेळांच्या राज्य संघटना, संस्था व खेळाडूंना आर्थिक सहाय्य  देणे.
  6. साहसी खेळांच्या विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थाना क्रीडा साहित्यासाठी अनुदान देणे

क्रीडा संस्कृती

 

  1. विभाग, जिल्हा व तालुका क्रीडा संकुल बांधकाम सुविधांचा वापर, देखभाल दुरुस्ती
  2. आमदार स्थानिक विकास निधीतून क्रीडा विषयक उपक्रमांसाठी सहाय्य.
  3. राज्य क्रीडा विकास निधी व जिल्हा क्रीडा विकास निधीची स्थापना
  4. खेळाडूंसाठी गौरव व प्रोत्साहनपर बक्षिसे.
  5. एकविध खेळाच्या राज्य संघटनांना प्रोत्साहन
  6. महाराष्ट्र राज्य क्रीडा पारिषदेमार्फात क्रीडा संस्थांना आर्थिक सहाय्य देणे.
  7. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यसाठी आर्थिक साहाय्य करणे
  8. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, मार्गदर्शकांचे शुल्क, इ करिता आर्थिक सहाय्य करणे
  9. खेळाद्वारे सर्वांसाठी सुदृढता.
  10. क्रीडा विकासात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
  11. क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण व सहाय्यक अनुदान इ. करिता क्रीडा प्रकारांची वर्गवारी करणे
  12. क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू कुस्तीगीर यांना द्यावयाच्या सवलती, पुरस्कार नियमावलीत बदल
  13. नागपूर येथील आमदार निवास कक्षाचे हिवाळी अधिवेशन वगळता खेळाडू निवासाकरिता वापर
  14. खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण व थेट नियुक्ती
  15. क्रीडा विषयक योजनांमध्ये सुधारणा
  16. महानगरपालिका, नगरपालिका खेळ व संघ दत्तक घेणे, क्रीडा विषयक बाबींवर ५ टक्के खर्च करणे
  17. क्रीडा विद्यापीठाची स्थापना करणे
  18. तालुका, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रे सक्षम करण्यासाठी उपाययोजना
  19. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सक्षमीकरण.
  20. क्रीडा सुविधा निर्मितीसाठी बांधकाम, क्रीडा साहित्य आर्थिक सहाय्य करणे
  21. क्रीडा धोरण अंमलबजावणी उच्चस्तरीय समितीची स्थापना


माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : https://sports.maharashtra.gov.in/sportsmh/marathi/sports_policy_m.html

अंतिम सुधारित : 5/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate