एमपीएससी परीक्षेचे अभ्यासधोरण भाग - 1 |
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मागील लेखात आपण एमपीएससीच्या बाबतीत सर्व प्राथमिक चर्चा केल्यानंतर आता नेमका अभ्यास कुठून आणि कसा करायचा? या महत्त्वाच्या, अर्थात कळीच्या प्रश्नाचा उलगडा करणार आहोत. यातूनच राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती सिद्ध होणार आहे. यालाच आपण एमपीएससीचे अभ्यासधोरण संबोधणार आहोत. धोरणातील बाबीप्रस्तुत अभ्यास धोरणातील प्रारंभिक बाब म्हणजे या परीक्षेचे, त्यात समाविष्ट प्रत्येक टप्प्याचे स्वरूप सखोलपणे लक्षात घ्यावे. स्वरूपानंतर लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे अभ्यासक्रम होय. अभ्यासक्रमातील प्रकरणे, त्यातील उपघटक आणि त्यात अंतर्भूत घटकांचे बारकाईने वाचन करावे. अभ्यासाची लांबी व रूंदी लक्षात घेतल्यास त्याचे योग्य नियोजन करणे सुलभ ठरते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची खोलीही ध्यानात घ्यावी. त्यातूनच एकंदर अभ्यासाचा आवाका निश्चित करता येणे शक्य बनते. स्त्रोत: महान्यूज |
अंतिम सुधारित : 7/4/2020
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इति...
चालू घडामोडीसाठी बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत....
मागील लेखात एमपीएससीचे आपण स्पर्धात्मक वेगळेपण काय...
मित्रहो एमपीएससी परीक्षेचा विचार करतांना प्रारंभी ...