|
ज्ञानगंगा घरोघरी हे बोधवाक्य घेऊन नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील एक मैलाचा दगड ठरणारी घटना घडली. निरंतर शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे सर्वासाठी खुल्या झाल्या. पारंपारिक शिक्षणाच्या बंधनातून शिक्षण मुक्त होणे हे राज्याच्या क्रांतीकारी परंपरेला पुढे नेणारे आहे. आर्थिक सामाजिक कौटुंबिक ह्या कारणांनी ज्यांची शिक्षणाची गाडी हुकली त्यांच्या जीवनात एक नवा आशेचा किरण घेऊन हे विद्यापीठ आले. काम करता करता शिक्षण, व्यवसाय, प्रपंच, नोकरी सांभाळून आवडीचे निवडीचे आणि सवडीनुसार शिक्षण घेण्याची नवी व्यवस्था ह्या विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. आज विद्यापीठाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा : पदविका शिक्षणक्रम : डिप्लोमा इन व्हॅल्यूज ॲण्ड स्पिरिच्युअल एज्युकेशन वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम शिक्षणशास्त्र विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम कृषि विज्ञान विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा :पदविका शिक्षणक्रम संगणकशास्त्र विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम शैक्षणिक सेवा विभाग :प्रमाणपत्र शिक्षणक्रम सहयोग व विशेष उपक्रम केंद्र :प्रमाणपत्र शिक्षणक्रम आरोग्य विज्ञान विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम निरंतर शिक्षण विद्याशाखा :प्रमाणपत्र शिक्षणक्रम पदविका शिक्षणक्रम डिप्लोमा इन प्रिटिंग टेक्निक्स आणि ग्राफिक आर्टस,डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग ॲण्ड डेकोरेश, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन ॲण्ड डोमेस्टिक अप्लायनसेस मेटेंनन्स, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स , डिप्लोमा इन फॅब्रिकेशन, डिप्लोमा इन एअर कंडिशनिंग ॲण्ड रेफ्रिजरेशन, डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2000 सर्वर), डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2003 सर्वर), डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स ॲण्ड नेटवर्क टेक्नॉलॉजीज् (विंडोज 2008 सर्वर), डिप्लोमा इन पैठणी हॅन्डीक्राफ्ट ॲण्ड मॉडर्न गारमेंटस, डिप्लोमा फॉर सिविल सुपरवायझर, डिप्लोमा इन मेकॅनिकल टेक्निक्स., डिप्लोमा फॉर फिटर (DFF), डिप्लोमा इन फॅशन डिझाईन ॲण्ड बुटीक मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सलून टेक्नॉलॉजी. पदवी शिक्षणक्रम बी.ए. ( पब्लिक सर्विसेस), बी.एस्सी.(इंटेरिअर डिझाईन), बी.एस्सी.(फॅशन डिझाईन), बॅचलर ऑफ फाईन आर्ट, बी.एस्सी (हॉस्पीटॅलिटी ॲण्ड टूरिझम स्टडिज), बी.एस्सी (हॉस्पीटॅलिटी ॲण्ड केटरिंग सर्विसेस, बी.एस्सी.(मेडिया ग्राफिक्स ॲण्ड ॲनिमेशन)
स्त्रोत : महान्यूज |
अंतिम सुधारित : 6/30/2020
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.