অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पामर्स्टन, लॉर्ड

पामर्स्टन, लॉर्ड

पामर्स्टन लॉर्ड

(२० ऑक्टोबर १७८४ – १८ ऑक्टोबर १८६५). इंग्लंडचा एक मुत्सद्दी पंतप्रधानपामर्स्टनचा जन्म सधन कुटुंबात हँपशर येथे झालाहॅरो आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १८०६ मध्ये तो राजकारणात उतरलादोनदा अपयश मिळाल्यानंतर एका छोट्या बरोतर्फे तो १८०७ मध्ये संसदेत निवडून आलावडिलांमुळे त्याला पोर्टलंडच्या मंत्रिमंडळात एक लहानशी जागा मिळालीदोन वर्षांनी पर्सिव्हलने त्यास अर्थमंत्रिपद देऊ केलेपण त्याने त्याखालचे पुरवठा खाते पसंत केलेत्यानंतर वीस वर्षे त्याने विविध पंतप्रधानांच्या हाताखाली त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेपण त्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला नाही१८२७ मध्ये जॉर्ज कॅनिंगने त्यास कॅबिनेट दर्जाचा मंत्री केले१८३० साली लॉर्ड ग्रे याने आपले लिबरल पक्षाचे मंत्रिमंडळ बनविताना कॅनिंगचे काही अनुयायी बरोबर घेतलेत्यात पामर्स्टनकडे परराष्ट्रखाते आलेजवळजवळ वीस वर्षे पामर्स्टन ह्या पदावर होता

पामर्स्टनचे वर्तन गृहखात्यात सनातनी आणि परराष्ट्रीय राजकारणात उदारमतवादी असे होतेमतदानाचा हक्क जास्त प्रमाणावर विस्तृत करणे त्यास पसंत नव्हतेमात्र यूरोपातील प्रजेने केलेल्या उठावांस त्याची सहानुभुती होतीहंगेरीतील उठावाचा पुढारी लॉयोश कॉसूथ (१८०२-१८९४ह्याचा त्याने गौरवपर उल्लेख केलात्यामुळे व्हिक्टोरिया राणीने त्यास काढून टाकावे अशी मागणी केलीपण त्याच्या कामगिरीमुळे पंतप्रधान लॉर्ड रसेल ह्याने तसे केले नाहीपुढे १८५० मध्ये तिसर्‍या नेपोलियनने फ्रेंच प्रजासत्ताक बरखास्त करून म्राटपद धारण केल्यानंतर पामर्स्टनने त्यास अभिनंदनपर संदेश पाठविलात्या वेळी मात्र राणीच्या मागणीस पंतप्रधान रसेलने मान्यता देऊन त्यास बडतर्फ केले.

पामर्स्टन आणि त्याचे अनुयायी यांनी ह्या गोष्टीचा लगेच सूड घेतला आणि रसेलच्या मंत्रिमंडळाचा पाडाव केलारॉबर्ट पीलच्या व्हिग पक्षाकडे आलेल्या अनुयायांपैकी लॉर्ड अँबरडीन याच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळात त्याची गृहमंत्रिपदावर नियुक्ती झालीह्या मंत्रिमंडळाच्या कारकीर्दीत रशियाबरोबर चालू असलेल्या क्रिमियन युद्धात अनेक घोटाळे झाल्यामुळे लोकांनी पामर्स्टनच्याच हातात सत्ता यावीअशी मागणी केलीत्याची ७० वर्षे उलटल्यानंतर १८५५ मध्ये तो पंतप्रधान झालातुर्कस्तानला मदत करून रशियास पूर्वेकडे फार बलिष्ठ होऊ न द्यायचे त्याचे धोरण होते१८५७ च्या भारतातील बंडामुळे काही काळ त्यास अधिकारत्याग करावा लागलापण १८५९ साली तो पुन्हा पंतप्रधान झालाअखेरपर्यंत तो त्याच पदावर होता.

 

रावदी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate