बहुसंख्य भूछत्रे बॅसिडिओमयसिटीज या वर्गात आढळून येतात. अँस्कोमायसिटीज (धानीकवक) या वर्गातील काही मांसल कवकांचाही भूछत्रात समावेश केला जातो. (उदा., ट्रफल, मोरेल).
प्रत्येक देशात अनेक प्रकारची भूछत्रे जंगली अवस्थेत वाढताना आढळून येतात. भारतातही अनेक खाद्य व अखाद्य भूछत्रे पावसाळ्यात निसर्गतः वाढताना दिसतात. काही भूछत्रांचे कवकजाल (कवकांच्या तंतुमय कोशिकांचे-पेशींचे-जाळे) वृक्षांच्या उपमुळांबरोबर सहजीवी अवस्थेत (परस्परांवर अवलंबित अशा एकत्रित अवस्थेत) वाढते.
पुष्कळशी भूछत्रे खाद्य आहेत; परंतु काही एवढी विषारी असतात की, ती खाण्यात आल्यास मृत्यू ओढवतो. जगात ह्या २,००० खाद्य भूछत्रांच्या जातींची नोंद झाली आहे;परंतु त्यांतील काही थोड्या जातींचीच घरगुती अथवा व्यापारी प्रमाणावर लागवड करण्यात येते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
या भागात ऑईस्टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दि...
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते...
बिहारमध्ये अळिंबी शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे. ...
मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ...