राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) | राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे महाराष्ट्रातील दोन मुलांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते |
२ | त्याची आवश्यकता काय ? | महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय सैनिक सेवेत भारती होता यावे या उद्देशाने व संरक्षण दलात उत्कृष्ट दर्जाची सेवा करणार्या अधिकार्यांची निर्मिती करणे. |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९८/(८०/९८)माशि-८,दिनांक ६ नोव्हेंबर १९९८ शिष्यवृत्तीचा दर रुपये ११,०००/-(वर्षासाठी) |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत? | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेवर |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | शालेय शिक्षण संचालक (माध्य.व उच्च माध्यमिक),शिक्षण संचालनालय,पुणे |
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://www.mahdoesecondary.com/scholstatmil.aspx.htm
अंतिम सुधारित : 6/29/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...