रियायती आणि तर्गीबी शिष्यवृत्त्या | ||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१.योजनेचे नाव व प्रस्तावना | रियायती आणि तर्गीबी शिष्यवृत्त्या | |||||||||||||||||||||
२. योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती | भूतपूर्व हैदाबाद राज्यातील मूळ रहिवाशी असलेल्या पालकांच्या मुलांसाठी मराठवाडा विभागातील जिल्ह्यामध्ये रियायती आणि तर्गीबी शिष्यवृत्ती देण्याची योजना १९५० पासून सुरु आहे. रियायती शिष्यवृत्ती-जांच्या पालकांचे उत्पन्न दरमहा रुपये २२५ पेक्षा कमी आहे अशा पालकांच्या गरीब व होतकरू पाल्यांना रियायती शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात दहा महिन्यासाठी देण्यात येते.त्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.प्राथमिक २ रुपये दरमहा .पूर्व माध्यमिक ४ रुपये दरमहा,माध्यमिक रुपये ६ दरमहा ,एकदा मंजूर केलेली शिष्यवृत्ती शिक्षणाचा ठराविक टप्पा (जसे की प्राथमिक ,पूर्व माध्यमिक ,माध्यमिक )पूर्ण होईपर्यंत पुढे चालू रहातो.
तर्गीबी शिष्यवृत्ती -ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती प्रतिकूल असल्यामुळे मदतीशिवाय शिक्षण घेणे शक्य होत नाही अशा गरीब विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम किवा द्वितीय कामांकाने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात दहा महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्तीचे दर खालीलप्रमाणे आहेत.पूर्व माध्यमिक ३ रुपये दरमहा,माध्यमिक रुपये ४ दरमहा
|
|||||||||||||||||||||
३.योजनेचा उद्देश | आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्तेजनार्थ या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. | |||||||||||||||||||||
४.अंमलबजावणी यंत्रणा | शिक्षणाधिकारी यांचेमार्फत राबविली जाते. |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 4/16/2020
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील अनुसूचित ...
महाराष्ट्र राज्यामधून एकूण बारावी उत्तीर्ण होणाऱ्य...
महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) ने वि...
गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी सरकारी तसंच सामाज...