हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात ।
धडाड --धुडूम डबे पाडले, कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले ।
T V वर जाऊन बसले, खी --खी -- खी -- खी हसू लागले ।
बाबांनी उगारली काठी, धावले माकडाच्या पाठी ।
माकड मुळु --मुळु रडत बसले माझ्या सोबत ।
मला सांगू लागले, आमचे जंगल तोडले ।
घर नाही उरले, हरवली पिल्ले !
राहू कसा झाडाविना ? जगू कसा अन्ना विना ? मला त्याचे दुखः कळले, मनाशी एकच ठरवले ।
एक - एक झाड लावायचं, पर्यावरण राखायच ।
माकड झाले खूपच खुश !
गेले करत हु SS प हु SS प ।
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020