অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिकवणे आणि आयसीटी

शिक्षक, शिकवणे आणि आयसीटी

सध्याचा माहितीसाठा
आपल्याला काय माहीत आहे, आपली कशावर श्रद्धा आहे व कशावर नाही
प्रशिक्षण महत्त्वाचे आहे

आयसीटीमधील गुंतवणुकीमधून अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर शिक्षक प्रशिक्षण आणि निरंतर, सुसंगत व्यावसायिक विकास आवश्यक आहे.

शिक्षकाची भूमिका

आयसीटी वापरणा-या शिक्षकाची भूमिका जरी समन्वयकाची होत असली तरीही त्यामुळे वर्गामध्ये नेत्याची भूमिका बजावण्यासाठी त्याची गरज नष्ट होत नाही; पारंपारिक शिक्षकाची नेतृत्व गुणकौशल्ये आणि सराव आजही आवश्यक आहेत. (खासकरून धड्याचे नियोजन, तयारी आणि मागोवा यांशी निगडीत)

आयसीटी वापरताना धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे
आयसीटी वापरत असताना शिक्षकाने धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे; संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की जेथे नियोजन कमकुवत होते तेथे विद्यार्थांची कामगिरी बहुतेकदा दिशाहीन बनते आणि याचा परिणाम कमी उपस्थितीमध्ये होऊ शकतो.

अध्यापनशास्त्र

केवळ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येणार नाहीत.
आयसीटी अस्तित्वात असणे या एकाच गोष्टीमुळे शिकवण्याची पद्धत बदलणार नाही. उलट योग्य वातावरण मिळाल्यास आयसीटी शिक्षकांना त्यांच्या शिकविण्याच्या पद्धती बदलण्यास मदत करू शकते. शिक्षकांचा अध्यापनशास्त्रासंबंधी अनुभव आणि तर्कशास्त्र त्यांच्या आयसीटीच्या वापरावर परिणाम करू शकते आणि शिक्षकाची आयसीटी वापरण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

विद्यार्थी-केंद्री वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना मदत करणारे साहित्य म्हणून आयसीटीकडे पाहिले जाते.
ओईसीडी (ऑर्गनाझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) देशांमध्ये संशोधनाद्वारे असे एकमत झाले आहे की जेव्हा आयसीटीची मदत घेऊन शिक्षक विद्यार्थ्याच्या समजून घेण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देतात तेव्हा आयसीटीचा सर्वात प्रभावशाली वापर होतो. पारंपारिक शिक्षक-केंद्री शिकविण्याच्या पद्धतींकडून अधिकाधिक विद्यार्थी-केंद्री पद्धतींकडे जाण्यासाठी आयसीटी हे एक महत्त्वाचे साधन आहे.

सध्याच्या शिकविण्याच्या पद्धतींना पाठबळ देण्यासाठी/ त्यांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांच्यातील बदलांना पाठबळ देण्यासाठी आयसीटीचा वापर केला जाऊ शकतो.
आयसीटी वापरणा-या शिक्षकांचा बालकशास्त्राचा अनुभव पारंपारिक पद्धती वापरून शिकविण्याच्या पद्धतींमधील थोडासा बदल असू शकतो, तसेच तो त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीतील आमूलाग्र बदलदेखिल असू शकतो. आयसीटीचा वापर सध्याच्या बालकशास्त्र पद्धतींना अधिक बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच तो शिक्षक-विद्यार्थ्यांमधील सुसंवाद साधण्याच्या पद्धतीतील बदलासाठीदेखिल वापरला जाऊ शकतो.

माहिती सादर करण्यासाठी आयसीटीचा साधन म्हणून वापर करणे हे संमिश्र प्रभावशाली आहे.
आयसीटीचा सादरीकरणाचे माध्यम म्हणून वापर करणे (ओव्हरहेड आणि एलसीडी प्रोजेक्टर्स, दूरदर्शन संच, इलेक्ट्रॉनिक व्हाइटबोर्ड, मार्गदर्शित वेब-टूर्स - जेथे अनेक विद्यार्थी संगणक पडद्यावर एकाचवेळी सारखीच माहिती पाहू शकतात - इत्यादींद्वारा) हे संमिश्ररीत्या प्रभावी असल्याचे आढळून आलेले आहे - त्यामुळे कठीण संकल्पना समजण्यास आणि त्यावर वर्गात चर्चा करण्यास प्रोत्साहन मिळू शकते (खासकरून सिम्युलेशन म्हणजे आभासी प्रतिमेचा वापर करून) मात्र आयसीटीच्या अशा वापरामुळे शिकवण्याच्या शास्त्रातील जुन्या पारंपारिक पद्धतींचे पुनरुज्जीवन होऊ शकते आणि चर्चेच्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित होऊन ते वापरल्या जाणा-या साधनाकडे जाऊ शकते.

शिक्षकांची तांत्रिक क्षमता आणि आयसीटीचे ज्ञान

आयसीटीचा फायदा घेण्यासाठी शिक्षकांना तयार करणे हे केवळ तांत्रिक कौशल्यांपेक्षा खूप काही अधिक आहे.
शिक्षकांना आयसीटीसंबंधी तांत्रिक कौशल्ये उत्कृष्टरीत्या येत असणे ही एकच गोष्ट शिकविण्यामध्ये आयसीटीचा यशस्वी मिलाफ करण्यासाठी पुरेशी नाही.

’वन-ऑफ ट्रेनिंग’ पुरेसे नाही
शिक्षकांना सुयोग्य संसाधने निवडता यावीत आणि त्यांचे मूल्यांकन करता यावे यासाठी त्यांना आयसीटीसंबंधी नवनव्या बाबी सतत आणि सखोल पद्धतीने सांगितल्या पाहिजेत.

आयसीटीचा वापर शिक्षणामध्ये विस्तृत पद्धतीने करण्याचे कौशल्य फार कमी शिक्षकांकडे असते.
ओईसीडी देशांमधील अतिप्रगत शाळांमध्येदेखील अगदी थोड्या शिक्षकांना आयसीटी साधने आणि संसाधनांविषयी सखोल आणि सर्वसमावेशक ज्ञान असते.

ओईसीडी देशांमध्ये शिकविण्याची आणि शिकण्याची साधने म्हणून आयसीटीचा वापर करण्याला ’संगणक साक्षरतेचा’ प्रसार करण्यासाठी आयसीटीचा वापर करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जाते.
ओईसीडीमध्ये आलेल्या अनुभवानुसार शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या दैनंदिन कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा ’संगणक वर्गा’मधील विशिष्ट सूचनांपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. तंत्रज्ञान कौशल्याच्या विकासाला शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, तरीही ते शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या इतर पद्धती वापरणे शक्य करते म्हणून जास्त महत्त्वाचे आहे. ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आयसीटीसंबंधी कौशल्ये आणि अनुभवाच्या पातळ्या जास्त असल्याचे आढळून आलेले आहे त्या सर्वच शाळांमध्ये अवघड संगणक अभ्यासक्रम आहे असे नाही. मात्र त्यांनी आयसीटीला संपूर्ण शिक्षक व्यावसायिक विकास आणि शिकविणे आणि शिकण्याच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले आहे.

शिक्षकांपेक्षा विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत अधिक हुशार असतात.
ओईसीडी देशांमध्ये विद्यार्थ्यांमधील आयसीटीचा वापर आणि ज्ञान आणि शिक्षकांमधील आयसीटीचा वापर करण्याची क्षमता आणि ज्ञान यामध्ये मोठी तफावत आढळून आली. याचाच अर्थ असा होऊ शकतो की शिक्षकांमधील अननुभव आणि कौशल्यांची कमतरता हा विद्यार्थ्यांद्वारा शिक्षणामध्ये होणारा आयसीटीचा प्रभावी वापर रोखण्यामधील महत्त्वाचा घटक असू शकतो.

शिक्षकांद्वारे आयसीटीचा वापर

शिक्षक आयसीटी प्रामुख्याने प्रशासकीय कामांसाठी वापरतात.
शिक्षक आयसीटी मुख्यत्वे दैनंदिन कामांसाठी वापरतात. (नोंदी ठेवणे, धड्याचा आराखडा बनविणे, माहिती सादर करणे, मूलभूत गोष्टी इंटरनेटवरून शोधणे)

अधिक माहिती असणारे शिक्षक ’संगणकाच्या सहाय्य-सूचनांवर’ कमी अवलंबून राहतात.
आयसीटी वापराची जास्त माहिती असणारे शिक्षक आयसीटी वापरणा-या इतर शिक्षकांपेक्षा संगणकाच्या सहाय्य-सूचनांवर कमी अवलंबून असतात मात्र एकूणच आयसीटी जास्त वापरतात.

शिक्षक आयसीटी कसे वापरतात हे त्यांच्या शिकविण्याच्या सर्वसामान्य पद्धतीवर अवलंबून असते.
आयसीटीच्या वापराचे प्रकार शिक्षकांच्या अध्यापनशास्त्रविषयक तत्वज्ञानाशी निगडित असतात. शिक्षक जे आयसीटी सर्वात जास्त वापरतात आणि सर्वात प्रभावीपणे वापरतात, ते पारंपारिक ’प्रक्षेपण-पद्धत’ अध्यापनशास्त्र वापरण्याची शक्यता कमी असते. जास्त प्रकारची सॉफ्टवेअर वापरणारे शिक्षक अधिक ’रचनात्मक’ अध्यापनशास्त्र वापरण्याची शक्यता जास्त असते.

आयसीटी वापरून शिकविण्यास जास्त वेळ लागतो
शिकविणे आणि शिकणे यांना पाठबळ म्हणून आयसीटीची ओळख करून देणे आणि वापर करणे हे शिक्षकांसाठी वेळखाऊ आहे कारण ते नेहमी वापरल्या जाणा-या पद्धती आणि अध्यापनशास्त्रापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत असतात.
सोप्या शब्दांत सांगायचे तर आयसीटी वापरून शिकविण्यास जास्त वेळ लागतो (एकच गोष्ट शिकविण्यास किती वेळ जास्त लागतो याचे अंदाज विभिन्न आहेत, सर्वसामान्यपणे १०% वेळ जास्त लागतो असे मानतात.)

शिक्षकांचा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन

केवळ काही शिक्षकच आत्मविश्वासाने आयसीटी वापरू शकतात
केवळ काही शिक्षकच आत्मविश्वासाने आयसीटीची विविध संसाधने वापरू शकतात आणि त्यांच्या ह्या मर्यादित आत्मविश्वासामुळे धडा शिकविण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो.

भीतीमुळे अनेक शिक्षक आयसीटी वापरत नाहीत
ओईसीडी देशांमध्ये अनेक शिक्षक अजुनही आयसीटी वापरण्यास घाबरतात आणि त्यामुळे त्यांचा वापर शिकविण्यामध्ये करण्यास नाखूश असतात.

निदान सुरुवातीला आयसीटीने (काही) शिक्षकांना प्रोत्साहित केले.
सुरुवातीला आयसीटीची ओळख होणे हे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शक्य करण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरू शकते.

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासामध्ये शिक्षकांना प्रभावीपणे सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यास प्रोत्साहने विकसित केली पाहिजेत.
व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी शिक्षकांना अतिरिक्त प्रोत्साहन आणि प्रोत्साहनाची गरज आहे. विविध प्रकारची प्रोत्साहने देता येतील – उदा. प्रमाणपत्रे, व्यावसायिक बढती, पगारवाढ, व्यावसायिक विकासामध्ये सहभागी होण्यासाठी पगारी रजा, शाळेमध्ये, समाजामध्ये आणि समवयस्कांमध्ये औपचारिक वा अनौपचारिक कौतुक, एकटेपणा कमी करणे आणि उत्पादकता वाढविणे इ.

शिक्षक आयसीटी वापरू शकतात की नाही हे ठरविण्यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांना ते हाताळण्यास देणे.
शिक्षकांची आयसीटीसंबंधी कौशल्ये वाढविण्यासाठी त्यांना नियमितपणे आयसीटीशी संबंधित उपकरणे हाताळायला देणे महत्त्वाचे आहे.

विषयाचे ज्ञान

विषयासंबंधीच्या शिक्षकांच्या ज्ञानाचा परिणाम त्यांच्या आयटीसी वापरण्याच्या पद्धतीवर होतो.

शिक्षकाचे त्यांच्या विषयावरील प्रभुत्व आणि ते आयसीटी संसाधने कशाप्रकारे वापरू शकतात याचा परिणाम धड्यांमध्ये आयसीटी ज्या पद्धतीने वापरले जाते त्या पद्धतीवर होतो.

शिक्षकांचे विषयातील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांचे सर्वसमावेशक आकलन ह्यांमुळे आयसीटीचा वापर अधिक प्रभावीपणे होतो.
पुरावे असे दर्शवितात की जेव्हा शिक्षक विषयाबद्दलचे आणि विद्यार्थी कशा त-हेने विषय समजून घेतात याविषयीचे आपले ज्ञान वापरतात तेव्हा त्यांच्या आयसीटीच्या वापराचा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर अधिक थेट प्रभाव पडतो.

आयसीटीद्वारा मिळणारी नवी/ अतिरिक्त माहिती पुरेशी नाही
नवी/ अतिरिक्त माहिती देण्यापेक्षा जेव्हा विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि त्यांच्या स्वतःच्या आकलनास आव्हान दिले जाते तेव्हा उपस्थितीवरील परिणाम सर्वात जास्त असतो.

आयसीटी शिक्षकांना विषयाविषयी अधिक स्व-अभ्यास करण्यास मदत करू शकते.
शिकण्याची अद्ययावत आणि अतिरिक्त संसाधने उपलब्ध करून देऊन आयटीची शिक्षकांना त्यांच्या विषयाबद्द्ल अधिक स्व-अभ्यास करण्यास मदत करू शकते.

शिक्षकांचा व्यावसायिक विकास

शिक्षणामध्ये आयसीटीचा यशस्वी वापर करण्यासाठी सातत्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण आणि पाठबळ महत्त्वाचे असते.
शिक्षणामध्ये आयसीटीचा यशस्वी वापर करण्यासाठी सातत्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण आणि पाठबळ महत्त्वाचे असल्याचे आढळून आले आहे.

शिक्षकांचा व्यावसायिक विकास ही एक प्रक्रिया आहे, अचानक घडणारा एखादा प्रसंग नव्हे.
पारंपारिक एक-वेळ चालणा-या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा शिक्षकांना आयसीटी सहजपणे हाताळण्यास मदत करण्यामध्ये प्रभावी नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे यशस्वीपणे शिकविण्यामध्ये आयसीटी मिसळणे ही गोष्ट खूपच कठीण आहे. म्हणूनच विलग, एक-वेळचे प्रशिक्षण कार्यक्रम हे सतत चालणा-या व्यावसायिक विकास कार्यक्रमांपेक्षा कमी प्रभावी आहेत.

आयसीटीची ओळख करून देणे सातत्यपूर्ण शिक्षक व्यावसायिक विकासाची गरज अधिक अधोरेखित करते.
शिक्षणामधील आयसीटीच्या प्रभावी वापरामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासाच्या गरजा वाढतात. मात्र अशा वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात आणि अधिक चांगले शैक्षणिक साहित्य पुरविण्यास मदत करून, दैनंदिन प्रशासकीय कामांमध्ये मदत करून, प्रभावी अध्यापनपद्धतींची प्रारूपे आणि प्रतिरूपे पुरवून आणि समोरासमोरील किंवा दूरस्थ विद्यार्थी पाठबळ जाळ्यास प्रत्यक्ष वेळी किंवा नंतरच्या काळामध्ये सक्षम करण्यास मदत करून आयसीटी हे एक महत्त्वाचे साधन ठरू शकतात.

यशस्वी शिक्षक व्यावसायिक विकास प्रारूपांना तीन टप्प्यांमध्ये विभागले जाऊ शकते.
यशस्वी निरंतर शिक्षक व्यावसायिक विकास प्रारूपांना तीन टप्प्यांमध्ये विभागले जाऊ शकते -

  1. सेवापूर्व, अध्यापनशास्त्र, विषयातील प्रभुत्व, व्यवस्थापन कौशल्ये आणि विविध शैक्षणिक साधने (आयसीटीसह) यावरील सुरुवातीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत करणे.
  2. सेवेमध्ये, संरचित, समोरासमोरील आणि दूरस्थ अध्यापन संधींचा समावेश, सेवापूर्व प्रशिक्षणावर आधारीत आणि शिक्षकांच्या गरजांशी थेट निगडीत आणि
  3. शिक्षकांसाठी त्यांच्या दैनंदिन गरजा आणि आव्हाने पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण औपचारिक आणि अनौपचारिक अध्यापनशास्त्रविषयक आणि तांत्रिक पाठबळ, आयसीटीद्वारा सक्षमीकृत.

प्रभावी शिक्षक व्यावसायिक विकासाने प्रभावी शिक्षणपद्धती विकसित केल्या पाहिजेत.
प्रभावी शिक्षक व्यावसायिक विकासामध्ये शक्य होईल तितके वर्गासारखे वातावरण निर्माण केले पाहिजे. जेथे आयटी अध्यापन आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक असते तेथे आयसीटी वापरासंबंधी प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) सूचना आवश्यक असतात. तसेच व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये शिक्षकांमधील प्रभावी पद्धती, वागणूक, प्रोत्साहन आणि पाठबळाचे प्रारूप दिसले पाहिजे. उपलब्ध असलेल्या आयसीटी सुविधा वापरून शालेय स्तरावरील सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास ही यशाला चालना देणारी महत्त्वाची गोष्ट आहे - खासकरून शिक्षकांच्या दैनंदिन गरजा आणि पद्धती यांच्याशी निगडीत संसाधने आणि कौशल्ये यांवर लक्ष केंद्रीत केले जाते तेव्हा.

मूल्यांकन पद्धतींमध्ये प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
व्यावसायिक विकासामध्ये मूल्यांकनासाठीच्या पद्धती आणि अध्यापनशास्त्रविषयक पद्धतींमध्ये बदल करण्याचा समावेश असला पाहिजे आणि त्यामध्ये शिक्षकांना मूल्यांकनाच्या विविध पद्धतींची ओळख करून दिली पाहिजे.

प्रभावी व्यावसायिक विकासासाठी ब-याच नियोजनाची गरज आहे.
व्यावसायिक विकास प्रभावी आणि शिक्षकांच्या गरजा पूर्ण करणारा असण्यासाठी शिक्षक व्यावसायिक विकास कार्यक्रम आखण्यापूर्वी आणि त्यात भाग घेण्यापूर्वी गरजांचे मूल्यांकान करणे आवश्यक आहे, तसेच या कार्यक्रमांची नियमित देखरेख आणि मूल्यांकन केले गेले पाहिजे आणि प्रतिक्रिया देण्यासाठी मार्ग निर्माण केले पाहिजेत.

शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण, नियमित पाठबळ महत्त्वाचे आहे
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सातत्यपूर्ण आणि नियमित पाठबळ महत्त्वाचे आहे आणि ते आयसीटीचा वापर (वेबसाईट, चर्चागट, ईमेल कम्युनिटी, रेडिओ किंवा दूरदर्शन प्रक्षेपणे यांद्वारे) करून करता येईल.

समर्थ करणारे घटक

शिक्षकांनी आयसीटीचा वापर करावा म्हणून विविध बदल करणे खूप आवश्यक आहे.
अध्यापनशास्त्र बदलणे, अभ्यासक्रम आणि मूल्यांकनाच्या पद्धतीची पुनर्संरचना करणे आणि शाळांना अधिक जास्त स्वायतत्ता देणे हे आयसीटीचा वापर होण्यासाठी महत्त्वाचे आहे. समर्थ करणारे घटक पुरेशा प्रमाणात मिळत असतील तर शिक्षक आयसीटी त्यांच्या अध्यापनशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार जास्तीत जास्त ’रचनात्मक’ पद्धतीने वापरू शकतील.

क्रियाशील तांत्रिक संसाधने (अर्थातच) महत्त्वाची आहेत
जर आयसीटीचा वापर प्रभावीपणे करवायाचा असेल तर शिक्षकांना संगणकांवर काम करण्यास पुरेसा वेळ दिला गेलाच पाहिजे आणि त्यांना पुरेसे तांत्रिक पाठबळदेखील दिले पाहिजे.

आयसीटीची सुरुवात करण्यास वेळ देणे आवश्यक आहे
जर आयसीटीचा वापर प्रभावीपणे करावयाचा असेल तर शिक्षकांना नवी कौशल्ये विकसित करण्यास, त्यांच्या सध्याच्या शिकविण्याच्या पद्धतींमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या एकात्मतेचा शोध घेण्यास आणि धड्यांचे आवश्यक अतिरिक्त आयोजन करण्यास पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे.

शालेय प्रशासन आणि समाजाकडून मिळणारे पाठबळ महत्त्वाचे असू शकते.
आयसीटीचा केवळ वापरदेखील करायचा असेल (त्याचा प्रभावीपणे वापर ही त्यापुढील पायरी आहे) तरीही शालेय प्रशासकांचे पाठबळ आणि काही प्रसंगी आजूबाजूच्या समाजाचे पाठबळ असणे शिक्षकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. यामुळेच जर शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी आयसीटीमध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर या दोन्ही गटांशी संवाद साधणे खूपदा आवश्यक असते.

शिक्षकांचा व्यावसायिक विकास करण्यासाठी सरावगट महत्त्वाचे साधन होऊ शकतात.
सरावाचे औपचारिक आणि अनौपचारिक गट आणि समवयस्कांचे गट आयसीटीला शिक्षण उपक्रमांमध्ये पाठबळ देण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरू शकतात. आयसीटीच्या वापरातून अशा पाठबळ प्रणाली उपलब्ध करून देता येतील.

आयसीटीचा शिक्षणामध्ये वापर सुरू केल्याने मिळालेले अनुभव एकमेकांना सांगितले पाहिजेत.
आयसीटीचा शिक्षणामध्ये वापर सुरू करणे हा एका फार मोठ्या बदलाचा किंवा सुधारणेचा भाग आहे, त्यामुळे आयसीटीच्या यशस्वी वापरांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांचा प्रसार केला पाहिजे.

 

स्त्रोत: infodev

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate