অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लसीकरण

लसीकरण

  1. लसीकरणासंबंधीच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे
  2. प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास लसीकरणासंबंधीची खालील माहिती मिळण्याचा हक्क आहे.
  3. सहाय्यक माहिती - लसीकरण
    1. महत्वाचा संदेश: लसीकरण त्वरित केले पाहिजे बाळाला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्ये च लसीकरण मालिकेची गरज असते
    2. महत्वाचा संदेश: लसीकरणामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होतो. लस न टोचलेले बाळ जास्त वेळा आजारी पडते. त्याला कायमचे व्यंग जडू शकते किंवा पोषण न मिळून त्याचे मरणदेखील ओढवू शकते.
    3. महत्वाचा संदेश: मूल आजारी असले, त्याला काही पंगुत्‍व असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित असते
    4. महत्वाचा संदेश: गर्भवती चे व तिला होणार्‍या बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनस पासून रक्षण करणे आवश्यक आहे.
    5. महत्वाचासंदेश: प्रत्येकव्‍यक्तिच्‍या लसीकरणासाठी नवीन किंवा निर्जंतुककेलेली सुई च वापरा सर्वांनीच हे ध्यानात ठेवावे व तसा आग्रह धरावा  योग्य प्रकारे निर्जंतुक न केलेल्या सुया किंवा उपकरणांमुळे जीवघेण्या रोगांचा प्रसार होतो.
    6. महत्वाचासंदेश: लोकांच्या गर्दीमधून आजार लवकर पसरतात. दाट लोक वस्तीत, विशेषतः निर्वासितांच्या कॅम्‍पमध्‍ये किंवा नैसर्गिक आपदा स्थितिंमध्‍ये, राहणार्‍या सर्व मुलामुलींचे लसीकरण तातडीने केले गेले पाहिजे

लसीकरणासंबंधीच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे

सहज उपलब्ध असलेल्या रोगप्रतिकारक लसींचा वापर न केल्यामुळे दरवर्षी 1.7 दशलक्ष मुले विविध रोगांना बळी पडतात. लसीकरण केलेल्या मुलामुलींचा अशा प्राणघातक रोगांपासून किंवा त्यांच्यामुळे उद्भवणार्‍या विकृतींपासून बचाव होतो. लसीकरण मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे.प्रत्येक मुलामुलीचे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवतीचे व तिला होणार्‍या बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण होण्यासाठी लसीकरण आवश्यक असते.सर्व पालकांना, बाळाचे लसीकरण कशासाठी, केव्हा, कोठे व कसे करावे ह्याची माहिती असायला हवी. मूल आजारी असले, त्याला काही व्यंग असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित आहे ही बाब पालकांना माहीत असणे गरजेचे आहे.

प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास लसीकरणासंबंधीची खालील माहिती मिळण्याचा हक्क आहे.

  1. लसीकरण त्वरितकेले पाहिजे बाळाला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्येच लसीकरण मालिकेची गरज असते
  2. लसीकरणामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होतो लस टोचलेलेबाळ जास्त वेळा आजारी पडते त्याला कायमचे अपंगत्‍व येऊशकते किंवा पोषण न मिळून त्याचे मरणदेखील ओढवू शकते.
  3. मूलआजारीअसले, त्याला काही अपंगत्‍व असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित असते.
  4. गर्भवती चे व तिला होणार्‍या बाळाचे धनुर्वात उर् फटिटॅनस पासून रक्षण करणे आवश्यक आहे. अशा स्‍त्रीचे लसीकरण पूर्वी झालेले असले तरी ही तिला जादा टिटॅनस टॉक्सॉइड लसीकरणाची गरज असू शकेल. हे लसीकरण व त्यासंबंधीच्या सल्ल्यासाठी आरोग्य सेवकाला भेटा.
  5. प्रत्येक लसीकरणासाठी नवीन किंवा निर्जंतुक केलेली सुई च वापरा. सर्वांनीच हे ध्यानात ठेवावेवत सा आग्रह धरावा.
  6. लोकांच्या गर्दीमधून आजार लवकर पसरतात. दाट लोक वस्तीत, विशेषतः निर्वासितांच्या कॅम्पमध्ये किंवा नैसर्गिक आपदा स्थितिं मध्‍ये राहणार्‍या सर् व मुलामुलींचे लसीकरण तातडीने केले गेले पाहिजे. गोवराच्या प्रतिरोधा साठी हे अधिक महत्वाचेआहे.

सहाय्यक माहिती - लसीकरण

महत्वाचा संदेश: लसीकरण त्वरित केले पाहिजे बाळाला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्ये च लसीकरण मालिकेची गरज असते

मुलांना लहानपणीच लसीकरण करणे अत्यावश्यक असते. डांग्या खोकल्यामुळे होणार्‍या मुलामुलींच्या मृत्यूंपैकी अर्धे, पोलिओने होणार्‍या मृत्यूंपैकी एकतृतियांश तर गोवरामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी एकचतुर्थांश त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्येच होतात.

लसीकरण पूर्णपणे करण्‍यात आले पाहिजे अन्यथा दिलेल्या लसींचादेखील काही ही उपयोग होत नाही.

बाळाच्या पहिल्या वर्षामध्ये त्याला संरक्षण देण्यासाठी खालील तक्त्यामधील सर्व लसी देणे महत्‍वाचे आहे. सांगितलेल्या वयामध्येच लसीकरण केल्यास ते अधिक प्रभावी ठरते.

बाळाच्या पहिल्या वर्षामध्ये काही कारणास्तव लसीकरण पूर्ण झालेले नसल्यास विशेष राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्‍या अंतर्गत किंवा शक्य तितक्या लवकर ते पूर्ण करा.

काही देशांमध्ये एक वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलामुलींना लसीचे जादा जोस, ज्यांना ‘बूस्टर शॉट’ म्हणतात, दिले जातात. लसीकरणापासून मिळणारे संरक्षण या शॉटस्मुळे अधिक प्रभावी बनते

अर्भकांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक  (Immunization schedule for infants)

वय: जन्माच्या वेळी द्यायच्‍या असलेल्‍या लसी:बीसीजी  काही देशांमध्ये पोलिओ व हेपेटायटिस बी
वय: 6 आठवडेद्यायच्‍या असलेल्‍या लसी: डीपीटी  काही देशांमध्ये पोलिओ व हेपेटायटिस बी व एचआयबी
वय:10 आठवडेद्यायच्‍या असलेल्‍या लसी: डीपीटी, पोलिओ व काही देशांमध्ये हेपेटायटिस बी व एचआयबी
वय: 14 आठवडेद्यायच्‍या असलेल्‍या लसी: डीपीटी, पोलिओ व काही देशांमध्ये हेपेटायटिस बी व एचआयबी
वय: 9 महिनेद्यायच्‍या असलेल्‍या लसी: गोवर(औद्योगिकदृष्टया प्रगत देशांमध्ये 12-15 महिने वयात)

काही देशांमध्ये पिवळा ताप, गालगुंड व रुबेलालसीकरणाची राष्ट्रीय वेळापत्रके देशानुसार किंचित वेगळी असू शकतात क्षय आणि कुष्ठरोगाच्या काही प्रकारांपासून बीसीजी मुळे काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते; तर डीपीटी द्वारे घटसर्प, डांग्या खोकला (व्‍हूपिंग कप) व धनुर्वातापासून बचाव होतो.

महत्वाचा संदेश: लसीकरणामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होतो. लस न टोचलेले बाळ जास्त वेळा आजारी पडते. त्याला कायमचे व्यंग जडू शकते किंवा पोषण न मिळून त्याचे मरणदेखील ओढवू शकते.

लहानपणी होऊ शकणार्‍या काही भयंकर आजारांपासून लसीकरणामुळे बचाव होतो. पंगुत्‍व असलेल्या मुलामुलींसकट सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.लस तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे देतात. मूल आजारी पडण्याआधी दिल्यासच लसीकरणाचा उपयोग होतो.

लसीकरण न केलेले मूल गोवर, डांग्या खोकला ह्यांसारख्या प्राणघातक आजारांना बळी पडू शकते. ह्या आजारांमधून उठलेली मुले अशक्त बनतात किंवा कायमची पंगु होऊ शकतात. नंतर ती कुपोषण किंवा इतर रोगांची शिकार बनतात.

सर्व मुलामुलींना गोवरविरोधी लस दिलीच पाहिजे जे कुपोषण, अपुरी मानसिक वाढ, कमी ऐकू येणे किंवा दिसणे ह्यांमागील फार मोठे कारण आहे. मुलास गोवर झाल्याचे प्रमुख लक्षण म्हणजे तीन दिवसांपेक्षा अधिक काळ टिकणारा ताप, वाहणारे नाक, खोकला व लाल डोळे. गोवरामुळे मृत्यू होऊ शकतो.

जगभरातील मुलामुलींना पोलिओपासून सुरक्षित ठेवले पाहिजे. एखाद्या अवयवात हालचाल करण्याची शक्तीच नसणे किंवा हालचाल करू न शकणे हे पोलिओचे मुख्य लक्षण आहे. पोलिओची लागण झालेल्या 200 मुलांपैकी किमान एक जन्माचे पंगू बनते.

चिघळलेल्या जखमांमध्ये धनुर्वाताचे जंतू वाढतात. लसीकरण न केल्यास हा आजार जीवघेणा ठरतो.

  • गर्भधारणेआधी किंवा त्यादरम्यान महिलेस टिटॅनस टॉक्सॉइड लसीचे किमान 2 डोस दिल्याने गर्भवतीचे व तिला होणार्‍या बाळाचे (पहिल्या काही आठवड्यांमध्ये) धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण होते.
  • बाळ सहा आठवड्यांचे असताना, धनुर्वातापासून जास्तीचे संरक्षण देण्यासाठी, त्याला डीपीटी चा पहिला डोस द्या.

ज्या देशांमध्ये हेपेटायटिस बी चे प्रचलन असते तेथे, लसीकरण न केल्यास, 100 पैकी 10 मुले जन्मभर रोगग्रस्त राहतात. लहानपणी हेपेटायटिस बी ची लागण झालेल्या मुलांना मोठेपणी लिव्हरचा कर्करोग होऊ शकतो.

काही देशांमध्ये पिवळ्या तापाच्या साथीमध्ये लहान मुले बळी पडू शकतात. मात्र लसीकरणाने ह्यापासून बचाव होऊ शकतो.

काही देशांमध्‍ये, हिमोफिलियस एन्फ्लुएंझा बी उर्फ एचआयबी च्या जंतूंमुळे न्यूमोनिया होतो व त्यामुळे अनेक मुलांचे मरण ओढवते. Hib च्‍याजंतूंमुळे मॅनेन्जायटिसदेखील होऊ शकतो. पाच वर्षांखालील बहुतेक सर्व मुलांच्या दृष्टीने हा रोगजंतू सर्वात भयंकर ठरू शकतो. मात्र लसीकरणाने ह्याला अटकाव होतो.

आईचे दूध व त्यातही पहिल्या काही दिवसांत येणारे कोलोस्ट्रम नावाचे जाड पिवळे दूध न्यूमोनिया, अतिसार व इतर आजारांपासून संरक्षण देते. जितके दिवस मूल अंगावर पिईल तितके दिवस हे संरक्षण टिकून राहते.

अंधत्‍व व जंतुसंसर्ग टाळण्यासाठी मुलांना अ जीवनसत्वाची गरज असते. आईचे दूध, लिव्हर, अंडी, दुधाचे पदार्थ, नारंगी व पिवळ्या रंगाची काही फळे व भाज्‍या, आणि काही गडद हिरव्‍या रंगाच्‍या भाज्‍यांमध्‍ये हे जीवनसत्‍व आढळते. अ जीवनसत्व कमी पडत असल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या मुलामुलींना, लसीकरणाच्या वेळी किंवा विशेष राष्ट्रीय लसीकरण दिवसांच्‍या अंतर्गत, अ जीवनसत्वाच्या गोळ्या किंवा पातळ औषध द्या. अ जीवनसत्व हा गोवरावरील उपचारांचा देखील एक महत्वाचा भाग आहे.

महत्वाचा संदेश: मूल आजारी असले, त्याला काही पंगुत्‍व असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित असते

पालकांनी मुलास लसीकरण न करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी मूल आजारी असणे - त्याला खोकला, ताप, अतिसार किंवा असेच काहीतरी झालेले असणे. तथापि, किरकोळ आजाराच्‍या दरम्यान लसीकरण करणे सुरक्षित आहे.

काहीवेळा एखादा आरोग्यसेवकच पंगुत्‍व असलेल्या किंवा कुपोषित मुलाचे लसीकरण न करण्याचा सल्ला देतो - हा सल्ला चुकीचा आहे. पंगुत्‍व असलेल्या किंवा कुपोषित मुलाला लसीकरण करणे सुरक्षित आहे.

इंजेक्शन दिल्यानंतर, कदाचित त्याला ताप येऊ शकतो किंवा अंगावर पुरळ उठू शकते. ह्यामध्ये काळजी करण्याजोगे काही ही नाही. त्याला स्तनपान द्या किंवा भरपूर पातळ पदार्थ आणि आहार द्या. मात्र ताप खूपच वाढल्यास त्याला आरोग्यकेंद्रात घेऊन जा.

कुपोषित मुलांसाठी गोवर फारच भयानक ठरू शकतो म्‍हणूनच त्यांना लस द्या - कुपोषण गंभीर असल्यास तातडीने द्या.

महत्वाचा संदेश: गर्भवती चे व तिला होणार्‍या बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनस पासून रक्षण करणे आवश्यक आहे.

विश्वाातील काही भागांमध्येा, कित्येक माता अस्वच्छ परिस्थितिंमध्ये  बाळाला जन्म देतात. अशा परिस्थितीत दोघांनाही धनुर्वाताची लागण होऊन त्यांचे मरण ओढवू शकते.
गर्भवतीचे धनुर्वातापासून रक्षण न केल्यास तिच्या आय़ुष्याला धोका संभवतो.
टिटॅनसचे जंतू मुख्यतः घाणेरड्या जखमांमध्ये वाढतात. अस्वच्छ चाकूने नाळ कापल्यास किंवा नाळेच्या टोकास कोणत्या ही घाणेरड्या वस्तूचा स्पर्श झाल्यास तेथे हे जंतू लगेच शिरकाव करतात. कोणते ही हत्यार वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धुवा, उकळा किंवा तापवून थंड करा व नंतरच वापरा. जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळाची नाळ स्वच्छ ठेवा.
सर्व गर्भवतींनी आपले धनुर्वातविरोधी लसीकरण झाल्याची खात्री करून स्वतःला तसेच होणार्या बाळाला सुरक्षित ठेवावे.
गर्भवतीचे धनुर्वातविरोधी लसीकरण करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. खालील तक्त्यामध्ये त्यासाठीचे वेळापत्रक दिले आहे -
पहिला डोस -   गर्भ राहिल्याचे कळल्याबरोबर लगेच
दुसरा डोस  -  पहिल्या डोसनंतर एक महिन्याने व बाळंतपणाच्या संभाव्य तारखेच्या दोन आठवड्यापेक्षा जास्तए उशीरा नाही     
तिसरा डोस -   दुसर्या डोसनंतर सहा ते 12 महिन्यां्नी किंवा पुढील गर्भधारणेच्याद दरम्याान
चौथा डोस  -  तिसर्या डोसनंतर एका वर्षाने किंवा पुढील गर्भधारणेच्याक दरम्यान
पाचवा डोस  -  चौथ्या डोसनंतर एका वर्षाने किंवा पुढील गर्भधारणेच्याे दरम्यान
योग्य कालावधीने दिलेल्या पाच अशा डोसनंतर त्या मुलीस किंवा स्त्रीयस तिच्या उर्वरित आयुष्यात धनुर्वातापासून कायमचे संरक्षण मिळेल. तिच्या मुलांना ही पहिले काही आठवडे पूर्ण सुरक्षितता लाभेल.

महत्वाचासंदेश: प्रत्येकव्‍यक्तिच्‍या लसीकरणासाठी नवीन किंवा निर्जंतुककेलेली सुई च वापरा सर्वांनीच हे ध्यानात ठेवावे व तसा आग्रह धरावा  योग्य प्रकारे निर्जंतुक न केलेल्या सुया किंवा उपकरणांमुळे जीवघेण्या रोगांचा प्रसार होतो.

सिरिंज किंवा सुया सामाईकपणे वापरणे, अगदी एका कुटुंबातदेखील, म्हणजे मृत्यूला निमंत्रण असते. प्रत्येक वेळी नवीन किंवा निर्जंतुक केलेली सुई किंवा सिरिंजच वापरा.

महत्वाचासंदेश: लोकांच्या गर्दीमधून आजार लवकर पसरतात. दाट लोक वस्तीत, विशेषतः निर्वासितांच्या कॅम्‍पमध्‍ये किंवा नैसर्गिक आपदा स्थितिंमध्‍ये, राहणार्‍या सर्व मुलामुलींचे लसीकरण तातडीने केले गेले पाहिजे

आणीबाणीच्या परिस्थितीत लोक आपले घर सोडून पळ काढतात व जमेल तेथे, जमेल तसे राहतात. अशा वेळी संसर्गजन्य रोगांचा प्रसार चटकन होऊ शकतो. 12 वर्षांखालील सर्व विस्थापित मुलामुलींचे ते निर्वासित वसाहतीमध्ये आल्याबरोबर तातडीने लसीकरण, विशेषतः गोवरासाठी, करणे आवश्यक आहे.
अशा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जाणारे लसीकरण फक्त ऑटो-डिसेबल म्हणजे एकदाच वापरता येणार्या सिरींजद्वारे करणे आवश्यक आहे.
मुले कुपोषित असल्यास किंवा मलमूत्र-विसर्जनाची स्वच्छ व चांगली सोय नसल्यास गोवराच्या संसर्गाचा धोका अधिकच वाढतो.

  • गोवरासारखे रोग अतिशय वेगाने पसरत असल्यामुळे गोवर झालेल्या मुलास इतरांपासून वेगळे ठेवणे व तज्ञ आरोग्यसेवकातर्फे त्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
  • गोवरामुळे गंभीर स्वरूपाचा अतिसार उर्फ डायरिया होतो. गोवराचे लसीकरण केल्याने अतिसारास आपोआप पायबंद बसतो. मुलाचे सर्वसाधारण स्वरूपाचे लसीकरण झालेले नसल्यास, आरोग्यसेवकाचा सल्ला घ्या आणि राष्ट्रीय दिशानिर्देशांप्रमाणे लसीकरण पूर्ण करवून घ्या.

 

स्त्रोत : UNICEF

 

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate